Monday, 20 February 2023

हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य 'महाशिव आरती' संपन्न

 हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य 'महाशिव आरतीसंपन्न

 

जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी

                       - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            पुणेदि.१९: जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतीलतसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईलअसे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

 

            शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादपोलीस अधीक्षक अंकित गोयल,  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलमाजी आमदार शरद सोनवणेजिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.

 

            मंत्री श्री. लोढा म्हणालेयावर्षी शिवजयंतीला  उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करुअसेही ते म्हणाले.

 

            यावेळी हातात दिवेपणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरतीशिव वंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी  आमदार श्री. दरेकरह.भ.प. पंकज महाराज गावडेह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

 

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi