Thursday, 16 February 2023

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

 आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार.

            मुंबई, दि. 15 : आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.


            छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. शिवछत्रपतींनी आग्रा येथील याच किल्ल्यात बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. अशा ‘दिवाण-ए- आम’ मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याने आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.


            आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.


            या सोहळ्यामुळे मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे, याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.



Wednesday, 15 February 2023

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक

 अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या

प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 15 :- राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मेघदूत शासकीय निवासस्थान येथे राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समिती यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधी सर्वश्री अजय देशमुख, मिलिंद भोसले, आनंद खामकर, सुनील धिवार, रावसाहेब त्रिभुवन, प्रकाश म्हसे, दीपक मोरे, डॉ. आर. बी. सिंग, राजा बढे हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कृती समितीच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचा सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कायम ठेवण्यात येईल. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीनुसार अनुज्ञेय थकबाकी देण्यात येईल. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे व इतर प्रलंबित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असून याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


-----0000------



श्रीमद्भगवद् गीता 14 वा अध्याय वाचावा.

 चला आपण सव्वा कोटी लोकांची साखळी बनवूया *|| भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे ||* हा मंत्र फक्त एकदा वाचा आणि पुढे पाच लोकांना पाठवूया जगाच्या कल्याणासाठी ही साखळी तुटता कामा नये 🙏🏻 *!! श्री स्वामी समर्थ !!* 🙏🏻महाराजांची आज्ञा आहे. *धन्वंतरि मंत्र*


येत्या 3 दिवसात जेवढा जमेल तेवढा श्रीमद्भगवद् गीता 14 वा अध्याय वाचावा.

खाली दिलेला मंत्र आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आहे. या मंत्राची सलग साखळी तयार व्हावी याकरिता तुम्ही तो मंत्र पठण करून पुढे दहा जणांना 

पाठवा ( मला सोडून )।

  

न पाठवू शकल्यास मला परत सेंड करा म्हणजे साखळी तुटणार नाही.

*धन्वंतरि मंत्र* -


ॐ नमो भगवते

महा सुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरये

अमृत कलश हस्ताय

सर्व भय विनाशाय

सर्व रोग निवारणाय

त्रैलोक्य पतये

त्रैलोक्य निधये

श्री महा विष्णु स्वरूपाय

श्री धन्वंतरि स्वरुपाय

श्री श्री श्री औषधचक्रनारायणाय स्वाहा ।।

                                               प्लीज पुढे पाठवा... 🙏


कृपया १० ठिकाणी पाठविणे शक्य नसेल तर...

 मला परत सेंड करा . म्हणजे साखळी ब्रेक होणार नाही ....

🙏🌹😊🌳🏡🚩🇮🇳

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोचा १७ फेब्रुवारीपासून प्रारंभ*

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोचा १७ फेब्रुवारीपासून प्रारंभ*


*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत थेट संवाद साधण्याची संधी*


*एक्स्पोत राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी, उद्योजकांचा सहभाग*


मुंबई : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चे आयोजन केले आहे. मुंबईत सकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मायटेक्स एक्स्पोचा शानदार भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्य संस्थाच्या वतीने हा भव्य एक्स्पो संपन्न होत आहे. ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. या मायटेक्समध्ये जगभरातील व्यापारी आणि उद्योजकांचा सहभाग असल्याने उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी मांदियाळीच ठरणार आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत थेट संवाद साधण्याची संधी सहभागी होणाऱ्या उद्योजक, व्यापारी बंधूना मिळणार आहे. सकाळी आठ ते नऊ या कालावधीत मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या समवेत संवाद साधता येणार आहे. त्यानंतर `मायटेक्स एक्स्पो`चा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.


भव्य असलेल्या या एक्स्पोमध्ये आर्टस्, क्राफ्टस्, शॉप, कल्चरची पर्वणीच १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मिळणार आहे. एक्स्पोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, डायमंड मार्केट समोर एक्स्पो भरले आहे. यामध्ये इंटरनॅशनल, स्टेटस् पॅव्हेलियन, खादी, हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट, लाइफस्टाइल, फॅशन, इंटिरिअर, होम युटिलीटी, हाऊसवेअर, पॅकेजड् फुडस्, अँपलायसेन्स, हेल्थ आणि ब्युटी प्रॉडक्ट, गिफ्ट आर्टिकल, स्टेशनरीसह नानाविध प्रकारच्या नमुन्याच्या वस्तूचा खजिना या एक्स्पोमध्ये खुला होणार असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. या एक्स्पोसाठी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड यांच्यासह चेंबरचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह चेंबरची व्यवस्थापन समिती, कार्यकारिणी समिती, गव्हर्निग काऊन्सिल सदस्य, तज्ज्ञ समिती सदस्य परिषदेचे नियोजन करत आहे.


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी अधिक माहिती देताना म्हणाले, राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स)चे आयोजन केले आहे. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजक सहभागी होणार आहेत. या मायटेक्समुळे महाराष्ट्रातील व्यापार, उद्योगाचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल. राज्यातील व्यापार उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) मार्गदर्शक आणि पथदर्शी ठरणार आहे. राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारी शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरने गेल्या ७५ वर्षापासून राज्याच्या व्यापार, उद्योगाच्या हितासाठी कार्य करत देश आणि जागतिक स्तरावर राज्यातील व्यापार उद्योगाला व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात महत्वाची भूमिका बजाविली आहे. महाराष्ट्र चेंबरचे कार्य गौरवास्पद असून राज्याच्या व्यापार उदयोगाला दिशा देणारे आहे.

आम्र पर्ण


 

आर्ट क्राफ्ट


 

All in one certificate


 

Featured post

Lakshvedhi