Monday, 13 February 2023

मी श्री स्वामी समर्थ पाहिले

 🙏🌸 *: मी श्री स्वामी समर्थ पाहिले :* 🌸🙏


*"खरोखरच मनापासून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल.*


      एका भयाण रात्री *"मठाच्या* पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण *पंधरा वर्षाचा एक मुलगा* अभ्यास करताना पाहिला.

*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता. 


हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. 

दिवसा कधी दिसत नसायचा. 

खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. 

मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ. 

         

*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. 

मी त्या मठाकडे आलो. 

तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मठाच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला. 

मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.

मला बघून तो गालातल्या गालात *हसला.* 

जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 


सर माझ्या *घरात लाईट* नाही. 

माझी *आई आजारी* असते. 

दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास करायला. माझी *ऐपत* नाही.


बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ? 


सर तुम्ही *स्वामी* आहात !


नाही रे! 


सर तुम्ही माझ्या साठी *स्वामीच* आहात. 


ते जाऊदे तू *जेवलास* का? 

मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे. 


सर म्हणूनच मी *हसलो.* 

मला माहित होतं. 

माझे ( स्वामी ) कोणत्याही *रूपात* येतील पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार. 

मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, ते काहींना काही मला *देतातच.* 

कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* ते मला देऊन जातात. 

आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो. 

मला माहित होतं....ते काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.

तुम्ही *स्वामी* आहात ना !


मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं. 

रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *स्वामींना* कोसत होतो. त्यांनी आज मला *देवा ची उपाधी* देऊन लाजवलं होतं.


 त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.

माझे डोळे *तरळले.*

त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. 

त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती. 

सर, 

माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.


क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती कडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटले. 


नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.

*शाळा, कॉलेज, मंदिर,मठ बंद* झाले. 

देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर *शुकशुकाट* झाला.

असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *मठाकडे* डोकावलं.

रात्रीची वेळ होती.

मठाच्या पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही. 

वाईट वाटलं मला.  

या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?

काय खात असेल ?

कसा जगत असेल ?

असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले. 


कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले. 

असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला. 

मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.

सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो. 

पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे* धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

सर .... 


अरे तू *इथे* काय करतोस ? 

सर आता मी *इथेच राहतो.* 

आम्ही घर बदललं.

*भाडं* भरायला पैसे नव्हते. 

त्यातच लॉकडाऊन मध्ये *मठ* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.

 

मग मला घेऊन आई इथे आली. 

काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे. 

त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत. 

तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.* 

ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.

 

सर मी *हार* नाही मानली. 

*आई* सांगायची........

ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार. 


बरं..... तुझी आई कुठे आहे ? 

सर ती *कोरोनाच्या* आजारात *गेली.* 

तीन दिवस ताप खोकला होता. 

नंतर दम अडकला. 

मी कुठे गेलो नाही.  

इथे *पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला. 

*१४ दिवस* इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.

*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.

*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं. 

          

सर तरी मी *हरलेलो* नाही पण *दुःख* एव्हढच आहे की मी *पास* झालेलो पहायला *आई* ह्या जगात *नाही.* 

ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश* असेल हे माझं *यश* बघून.  

कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय. 

आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर *खरी अडचण* उभी राहिलीय. 

*ऑनलाईन* अभ्यास करायला माझ्या जवळ *मोबाईल* सुद्धा नाही. 


असो 

सर, 

तुम्ही का वाईट वाटून घेता ? 

तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ? 

सर, 

तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा. 


त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.

चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. 

सर *तोंड गोड* करा. 


तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.

*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*


सर, 

मला माहीत होते, *स्वामी* या जगात आहे आणि ते माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार. 

त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो. 

आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......

न सांगता. 


खरे स्वामी तर कधीच नाही दिसले पण, 

मी त्या *मुलाच्या डोळ्यात स्वामी* पाहिले ....

 

*स्वामी पाहिले....*


       🙏 *धन्यवाद !!* 🙏


हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं.. 

म्हणून मी *शेअर* करतोय.....

 

कारण मलाही कळले स्वामी आहेच🙏🏻🌹 *श्री स्वामी समर्थ*🌹🙏

अध्यत्म

 


संध्या छाया, भिवावती हृदयया

 


शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार

 शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार


                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई दि.१२- महाराष्ट्र विविध क्रिडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित 'बोरिवली खेल महोत्सव 2023' या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), आमदार प्रवीण दरेकर, बोरीवलीचे आमदार आणि खेळ महोत्सवाचे संयोजक सुनील राणे, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी , कांदिवलीचे आमदार योगेश सागर, कुस्तीपटू तथा ॲथलिट नरसिंग पंचम यादव, यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम सातत्याने राबवित असून खेळाडूंच्या कौशल्याची दखल घेऊन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना यापूर्वी शासकीय सेवेत नियुक्ती दिलेल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह कुस्तीमध्ये विविध किताब जिंकलेल्या खेळाडूंच्या मानधनात तीन पट वाढ केली आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरी साठी महाराष्ट्रात खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षण सुविधा, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषणतत्वे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह सर्व पूरक सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

            तसेच कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे. भारताला खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक कुस्तीमध्येच मिळवून दिले होते. आता ही आपले कुस्तीपटु वेगवेगळ्या ठिकाणी पदक मिळवत आहेत. खेलो इंडिया मध्येही विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाडूंनी बजावली असून सर्वात जास्त पदक महाराष्ट्राने पटकावली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र भविष्यात उज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे, राज्याचे नाव मोठे करेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

            मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील आणि एशियन चॅम्पियन इरानचे हुसेन रमजानी यांची विशेष लढत यावेळी झाली. या लढतीत विजयी झालेल्या पृथ्वीराज पाटीलचा आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटु हुसेन रमजानीचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फेटा ,गदा देऊन सत्कार करण्यात आला. रोमहर्षक कुस्ती या खेळ महोत्सवात बघायला मिळाली यात आपल्या महाराष्ट्र केसरीने इराणच्या कुस्ती पटुला चित करून कुस्ती जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री यांनी आनंद व्यक्त करत दोन्ही कुस्ती पटुंना शुभेच्छा दिल्या.


000


 


 


 

जीवन







 

Sunday, 12 February 2023

उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन

 उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’

विषयक दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयआयटी पवईत आयोजन.

            मुंबई, दि. १२ : ‘उष्णतेच्या लाटा - आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

            या कार्यशाळेचे उद्घाटन १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीस चौधरी, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.५० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ‘वातावरण बदल आणि उपाययोजना’ याविषयी दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहेत. दि. १४ तारखेला ‘उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’, राष्ट्रीय, राज्य, जिल्हे आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजना या विषयावर सकाळी ९.३० पासून दुपारी २.३० पर्यंत चर्चासत्र होणार आहेत.

उष्माघातामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळणे

            जगभरात वातावरणात अनेक बदल होत आहेत. अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरण बदल आणि मानाकनांनुसार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे. सन 2004 ते 2019 दरम्यान पंधरापैकी अकरा सर्वात उष्ण वर्षे आली होती. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विषयाच्या अनुषंगाने या दोन दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट

            उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था आणि या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांबाबत उपाययोजना, तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा बनविणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रम अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.


000



संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा व धवल सेवाध्वजाचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.

            वाशिम, दि १२: देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय परिसरात संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि १३५ फुट उंच धवल रंगाच्या सेवाध्वजाची स्थापना रिमोट कंट्रोलद्वारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आली.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ॲड निलय नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत शेखर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

            'ब' दर्जा प्राप्त या तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने ५९३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. याच विकास आराखड्यातील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पोहरादेवी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे शक्तिशाली चिन्ह असलेला नंगारा वाजवुन आनंद व्यक्त केला.

            भूमिपूजन झालेल्या विकास कामात पोहरादेवी येथील स्थानिक पायाभूत सुविधा व मंदिर सुशोभिकरण, नंगारा भवन वाढीव बांधकाम व अंतर्गत व्यवस्था, बायोलॉजिकल पार्क, संगमरवरी सामकी माता मंदिर, जगदंबादेवी मंदिर, प्रल्हाद महाराज मंदिर,जेतालाल महाराज मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर व संत रामराव महाराज मंदिर बांधकाम सुशोभीकरण, सुसज्ज यात्री निवास, भाविकांसाठी सोई -सुविधा, प्रवेशद्वार, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पथदिवे, प्रदर्शन केंद्र, लकिशा बंजारा सुविधा केंद्र इत्यादीचा समावेश आहे.

            नंगारा वास्तु संग्रहालय व परिसर विकासासाठी ६७ कोटी, उमरी व पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासाठी ३२६ कोटी २५ लक्ष रुपये तर संत रामराव बापु उद्यानासाठी २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यामधुन ही विकास कामे करण्यात येणार आहेत.


000


 


 



Featured post

Lakshvedhi