पुराने समय का सिनेमा हॉल । इसमें फिल्म देखने का जो आनंद था वो आज मल्टीप्लेक्स में नहीं । धक्का मुक्की करते हुए टिकट कटाना, टिकट का साईज छोटा होना, हाऊसफुल हो जाने पर ब्लैक में टिकट बेचने वाले को ढूंढना और ब्लैक में टिकट खरीद कर फिल्म देखना, इंटरवल में मूंगफली इत्यादि बेचने वालों का हॉल में इन और उनसे खाने का सामान खरीदना ।गाने के बुकलेट वालों से बुकलेट खरीदना । नृत्य के सीन में पर्दै पर सिक्का फेंकना, विलेन के कमीनेपन पर उसे गालियां देना । हीरो के द्वारा विलेन को पीटने पर हॉल में तालियां, सीटियां बजना । ये सब अतीत की बातें हो गई है।
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 11 February 2023
वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक
वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा.
मुंबई, दि. १० : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
तसेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला व एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गाचे आणि मालाडमधील कुरार गाव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात करत श्री. मोदी म्हणाले की,
भारतातील रेल्वे वाहतूक ही आपल्या प्रगतीची जीवनरेखा आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी, विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आतापर्यंत देशात एकूण १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. देशाला आज नववी आणि दहावी ‘वंदे भारत’ ट्रेन समर्पित करण्यात आली आहे. नाशिक आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांना जाण्यासाठी तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सिध्देश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ येथे भाविकांना जाता येणार आहे. शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी भाविकांचा प्रवास जलद होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे नव्या भारताच्या विश्वासाचा संकल्प असून आधुनिक भारताची प्रतिमा निर्माण करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या १० ट्रेन सुरू झाल्या असून त्यामुळे १७ राज्यात १०८ जिल्हे जोडले गेले असल्याचेही श्री. मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
मुंबई मध्ये पूर्व - पश्चिम उपनगरांना जोडणारे प्रकल्प सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे. रेल्वे, नवीन विमानतळ आणि बंदरे विकसित करण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वे साठी अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी विशेष लाभ देण्यात आला आहे. आयकर मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्याने महाराष्ट्रात
रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
श्री. शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, या सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार प्रधानमंत्र्यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.
नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्र्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी - केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे. ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास झाले आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या धावतील.
रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री यांचे योगदान महत्वपूर्ण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गतीने धावेल आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि भाविकांना आनंद मिळेल. मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा फायदा व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे प्रधानमंत्र्यांनी कौतुक केले.
वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी
· आरामदायी आणि आनंददायी रेल्वे प्रवास हे वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य
· वंदे भारत एक्सप्रेमसमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, झोपण्यायोग्य आसने, टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, एलईडी प्रकाश योजना, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाइट आणि कनसिंल्ड रोलर पडदे, 'आधुनिक मिनी-पॅन्ट्री' आणि चालक दलाशी संवाद साधण्याकरिता प्रवाशांसाठी 'इमरजन्सी टॉक-बॅक' युनिट कार्यान्वित
· उत्तम उष्णता वायुविजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यांसह वातानूकुलित प्रणाली सारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा
· इंटेलिजेंट वातानूकुलित प्रणाली हवामान परिस्थितीनुसार कूलिंग समायोजन
· स्वदेशात तयार झालेली सेमी-हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन सेट,१६० किमी प्रति तास वेग गाठण्याची वेळ १२९ सेकंद
· प्रवाशांसाठी ३.३ (राइडिंग इंडेक्स) सह उत्तम आरामशीर प्रवास
· स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे
· एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्विहंग सीट्स
· GSM/GPRS द्वारे नियंत्रण केंद्र / देखभाल कर्मचाऱ्यांना एअर कंडिशनिंग, कम्युनिकेशन आणि फीडबॅकचे निरीक्षण करण्यासाठी कोच नियंत्रण व्यवस्थापन प्रणाली
· जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यासह उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्रेसरचा वापर करून उत्तम उष्णता वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग नियंत्रण
· वातानुकूलित हवेच्या ध्वनीरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट
· दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय
· टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट
· ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल
· प्रत्येक कोचमध्ये ३२ प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम
· उत्तम ट्रेन नियंत्रण व्यवस्थापनासाठी स्तर –।। संरक्षा एकीकृत प्रमाणपत्र
· प्रमाणपत्रासह कवच प्रणाली (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) सुरू
· प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था,अग्निशमन सुरक्षा उपाय
· ४ प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य कॅमेरे
· सर्व डब्यांमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम व इलेक्ट्रिकल क्यूबिकल्स आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम यांसारखे उत्तम
· प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या
· इमर्जन्सी टॉक बॅक युनिट्स
· व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद
· अंडर- स्लंग इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी उत्तम फ्लड प्रूफिंग ज्यात ६५० मिमी पूर पाण्यामध्ये काही होणार नाही
मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये
· मुंबई ते सोलापूर अशी धावणारी ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन
·
दिलखुलास' कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60'
उपक्रमातील नवउद्योजकांची मुलाखत.
मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'कॉर्नेल महा-60' उपक्रमातील नवउद्योजक श्वेता ठोंबरे, शैलेश शिंदे, जिगर परीख, निहारिका कोलते-आळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 13, मंगळवार दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
राज्य शासन उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा लाभ राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून 'कॉर्नेल महा-60' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वर्षभर राज्यातील 60 निवडक तरूण उद्योजकांना याअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवउद्योजकांशी 'दिलखुलास' कार्यक्रमातून संवाद साधला आहे. श्वेता ठोंबरे, शैलेश शिंदे, जिगर परीख, निहारिका कोलते-आळेकर या नवउद्योजकांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000000
शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षण देणार
शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षण देणार
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
"अलजमिया- तूस – सफिया" अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण.
मुंबई, दि. 10 : युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले जात आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
अंधेरी - मरोळ येथील "अलजमिया- तूस – सफिया" अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, "अलजमिया- तूस – सफियाचे "कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन, दाऊदी बोहरा" समाजाचे शहजादा अलिअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन, दाऊदी बोहरा" समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की,"दाऊदी बोहरा" समाजाच्या चार पिढ्यांसोबत माझा संवाद आहे. कोणताही समाज काळानुसार कसा बदलतो करतो यावरच त्या समाजाचा विकास अवलंबून असतो. "दाउदी बोहरा" समाज ही काळाप्रमाणे बदलत आहे. काळाप्रमाणे नावीन्यपूर्ण शिक्षणाची कास धरत आहे. ही गोष्ट आनंदाची आहे. अलजमिया - तूस- सफियाह ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था स्थापन झाली या समाजाचे हे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न आज साकार झाले आहे. गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सूरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरतेसाठी काम केले त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी होती.आजही मला या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे.हे प्रेम खूप मोलाचे आहे असेही प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, "दाउदी बोहरा" समाज बांधव जगाच्या कुठल्याही देशात असले तरी देशाप्रती त्यांचे प्रेम आणि योगदान खूप आहे आणि भविष्यातही राहील. शिक्षण क्षेत्रातही या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षणाविषयी स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रयत्न करून पूर्ण करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे."अलजमिया- तूस – सफिया"या अरेबिक शिक्षण संस्थेत महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापुढेही महिलांचा विकास, महिलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ही संस्था आपले योगदान देईल, अशी मला आशा आहे. शासनाकडून युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे राबवली जात आहेत असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र हे दोन्हीही पूरक असले पाहिजेत, अशी धोरणे राबवत आहोत."दाऊदी बोहरा" समाज उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.उद्योगासाठी कर प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणामुळे नोकरी देणारे तयार होत आहेत. विकास करीत असताना हे शासन वारसा आणि आधुनिकता बरोबर घेवून पुढे जात आहे. देश पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्यात येत आहे. सण - उत्सवांना आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. जुन्या ग्रंथांचे डिजिटलायझेशन केले जात आहे. सरकार पर्यावरणावर भर देत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. जी 20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळालेला आहे हा मोठा बहुमान आहे."दाऊदी बोहरा" समाजातील प्रत्येक नागरिक जो जागतिक पातळीवर आहे तो आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे नाव पुढे नेईल, अशी आशा व्यक्त करतो असेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.
यावेळी "अलजमिया- तूस – सफिया " शैक्षणिक संस्थेची माहितीवर आधारित ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली."दाउदी बोहरा" समाजाच्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
"अलजमिया- तूस – सफिया "शैक्षणीक संस्थेविषयी
अलजमिया- तूस – सफिया "शैक्षणिक संस्था मुंबई (अंधेरी – मरोळ) येथे दहा वर्षापासून सुरू केली आहे. या संस्थेच्या शैक्षणिक शाखा देश – विदेशात येथे आहेत. या संस्थेच्या वतीने अंधेरी येथे पाच इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून एका इमारतीमध्ये महिला वसतिगृह व दुसऱ्या इमारतीमध्ये मुलांचे वसतिगृह सुरु केले आहे. या संस्थेमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य या विषयी मुलांना शिक्षण दिले जाते. या विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ आणि अलिगड विद्यापीठ येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी ग्राह्य धरले जाते. वयाच्या १३ व्या वर्षापासून या शैक्षणिक संस्थेमध्ये मुले व मुली शिक्षण घेतात. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या पदवी शिक्षण समशिक्षण गणले जाते. त्यानंतर अलिगढ़ विद्यापीठामध्ये विद्यार्थी पी.एच. डी.करू शकतात. संस्थेत सुमारे 500 विद्यार्थी शिकत असून 20 शिक्षक कर्मचारी व 30 शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
******
संकेत निसर्गाचे
👆👆👆Earthquake in Syria 🇸🇾 and Turkey 🇹🇷. *Please see early indications from the Almighty* before the Quake hit these countries 😢
Friday, 10 February 2023
राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढ
राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढमच्छीमार बांधवांना सक्षम करणार
- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार.
मुंबई, दि. 10 : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लहान मच्छिमारांना व रापणकाराना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात मच्छीमार संघटनांनी केलेल्या मागणीचा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विचार करुन हा निर्णय घेतला आहे.
१३ वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बांधवांना दिलासा मिळाला आहे. आता, सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांवर वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन व मोनोफिलामेंट जाळी खरेदीवर ५० टक्के पर्यंत व रांपण संघाच्या प्रत्येक सभासदाला रांपणीच्या तयार जाळ्यांवर तयार जाळ्याच्या किंमतीच्या ५० टक्के पर्यंत अनुदान देण्यात येईल.
बिगर यांत्रिकी नौकांच्या बाबतीत शासनाने लहान मच्छिमारांना अथवा रापणकारांना १० टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी /तयार नौका खरेदी करण्यासाठी सध्याच्या प्रचिलत दराने रु. १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) पर्यंतच्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये २,५०,०००/- ( रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) पर्यंत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लहान मच्छिमारांना किंवा रापणकाराना १० टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी /तयार नौका खरेदी करण्यासाठी प्रकल्प किंमत रु.5 लक्ष पर्यंत खर्चाच्या ५० टक्के अथवा रु.२,५०,०००/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळेल.
भूजल मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेताना शासनाने भूजलाशयीन मस्यव्यवसायांतर्गत नायलॉन/मोनोफिलॅमेंट तयार जाळी खरेदीवर प्रती सभासद/ वैयक्तिक मच्छीमारास 20 किलो ग्रॅमपर्यंत ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
भूजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. बिगर यांत्रिकी नौकेसाठी अनुदान देताना देखील शासनाने मच्छीमार बांधवांचा अतिशय संवेदनशीलपणे विचार केला असून यामध्ये लाकडी, पत्रा व फायबर नौकेला प्रकल्प किंमतीच्या ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
मासेमारी व्यवसायामध्ये मच्छिमारांना विविध साधनसामुग्रीचा उपयोग सुलभतेने करता यावा, त्यांचे जीवन सुलभ सुखकारक व्हावे, यासाठी शासनाने हे हितकारक निर्णय घेतले असून शासन मच्छीमारांना वेळोवेळी सहकार्य करेल, अशी ग्वाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.
0000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...

