Monday, 6 February 2023

का,कशासाठी,outlet imp

 🙏``` अप्रतिम लेख आहे नक्की आवडेल.


      "OUT LET" 


               लाखो जीव घेणार्‍या क्रूर "हिटलरने" शेवटी आत्महत्या केली !........

               सुंदर विचार देणारे "साने गुरुजी" आत्मघात करुन घेतात.

               मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे "स्वामी विज्ञानानंद" मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

              आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे "भैय्युजी महाराज" आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

                पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही "सुशांत सिंग राजपुतनं" नैराश्यातून आत्महत्या केली.

                -आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या "शीतल (आमटे) करजगी" आपलं जीवन संपवतात. 

               -आजची नागपूरची बातमी 'उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम' यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.


                या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ........


                पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.

     'माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.' त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

           भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक 'अध्यात्मीक गूरू' होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील 'स्ट्रेस' बाहेर काढायला त्याच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)

               इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?

होय !!!

              कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल 'धरण' बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir ...मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक 'धरणच' आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?

                 

  मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

               म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे

   outlet वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं       

  outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?

    म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!

हसा ! बोला ! रडा ! भांडा !

व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!


काळजी घ्या....


  🙏😊🙏सोडून गेल्यावर "ᴍɪss ʏᴏᴜ" म्हणण्यापेक्षा


🙏😊🙏सोबत आहे तोपर्यंत "ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ" म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 

 

          समस्तांना सकारात्मकासाठी समर्पित...```🙏

पोट तुझं भरलं असेल तर, देवा माझ्यासाठी घेऊ का,

 पोट तुझं भरलं असेल तर,

देवा माझ्यासाठी घेऊ का,

       तुझं राहिलेलं उष्ट,

माझ्या घरी मी नेऊ का.?


      देवा इथे मात्र तुमची,

मस्त अंगत पंगत रंगलीय,

       घरात पीठ नाही म्हणून,

सकाळीच आई बाबासोबत भांडलीय.


       आटवा भर पिठासाठी,

आई सगळ्या गल्लीत हिंडली,

      सगळ्या शेजारच्यांनी,

तुझ्या निवदाची सबब सांगितली.


      देवा आज सकाळी मला,

सडकून भूक लागली,

       अचानक तुला आठवून,

तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली.


       देवा मला तुझा ,

कधी कधी हेवा वाटतो,

     एका जाग्यावर बसून,

मस्त निवदाचा मलिदा लाटतो.


      दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,

नारळाचा तुकडा हातावर ठेवला,

      तुला मात्र देवा त्यांनी,

अर्धा नारळचं वाहिला.


     माफ कर देवा मला,

तुझा घास हिसकावतोय,

      अर्ध्या कोर तुकड्यासाठी,

भाऊ माझा घरात रडतोय.


     देवा मी आता ठरवलंय,

तुझ्यासोबत बंड करायचं,

     माझ्या भाकरीच्या


प्रश्नासाठी,

स्वतःच पेटून उठायचं!"

जराशीच डुलकी लागली.

 Tata Motors new technology. बर झालं...


जराशीच डुलकी लागली,

म्हणून.... मागून ठोकली😳


आता बंद होईल🥳🤠👍


साधी माणसे

 *सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही, मग ते वृक्ष असो की आईवडील.....*. *शुभ प्रभात*🙏


नाणे खातात का, छोटू ना दाखवा

 दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास राहणार वरखेड बु. तालुका शेगांव जिल्हा बुलढाणा येथील 14 वर्षीय

मंगेश विलास इंदोरे या शेतमजुराच्या मुलाने सहजच 10 रुपयाचे नाणे तोंडात ठेवले, व बघता बघता ते नाणे त्याच्या घशात गेले व त्याला घशात वेदना व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याने याबाबत वडिलांना सांगितले. वडील श्री विलास इंदोरे यांना शेगांव येथील बालरोगतज्ज्ञ डॉ सचिन प्रकाशराव सांगळे यांनी याआधी असे अन्न नलिकेत अडकलेले नाणे काढल्याचे ज्ञात असल्याने, मुलाला तात्काळ डॉ सांगळे यांच्या अग्रसेन चौक शेगांव स्थित प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले, तेथे पोहचताच मुलाचा एक्स रे काढून नाणे अडकल्याची जागा निश्चित करण्यात आली. व डॉ सांगळे व त्यांच्या टीम ने वैद्यकीय क्षेत्रात नविन अविष्काराप्रमाणे शोधून काढलेल्या पद्धतीचा वापर करून फोलिज कॅथेटरच्या मदतीने *अवघ्या 40 सेकंदात* मुलाला कुठलाही त्रास न होऊ देता विनाशस्त्रक्रिया अन्न नलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढले. व या कौशल्यात आपण निष्णात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

त्यांच्या या नविन पद्धतीमुळे आजवर अनेक मुलांचे प्राण वाचले असून, सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा नाणे काढतांनाचा विडिओ सर्व सोशल मीडियावर वायरल होत असून सर्वत्र कुतूहलाचा विषय बनला आहे.


कडक जोके बंड्या चा

 


ये जिवन हैं

 









Featured post

Lakshvedhi