Thursday, 26 January 2023

संविधानाने आपल्याला काय दिले?*

 🌕🙏🌹 *धम्म प्रभात* 🌹🙏🌕

  

    *संविधानाने आपल्याला काय दिले?*


---------------------------

डॉ. श्रीमंत कोकाटे

---------------------------

                                    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान सभेच्या दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसाच्या अथक प्रयत्नातून भारतीय संविधान निर्माण झाले. संविधानाने आपल्याला सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व दिले.


                               सनातनी धर्मव्यवस्थेने कष्टकरी, स्त्रिया, श्रमकरी, शेतकरी वर्गाचे नाकारलेले अधिकार संविधानाने दिले. भारतीय संविधानातील कलम एकने आपल्या देशाचे नाव निश्चित केले. ते म्हणजे भारत तथा इंडिया, म्हणजे आपला देश कोणत्याही एका विशिष्ट घराण्याचा, जातीचा, धर्माचा नाही, तर तो सर्व भारतीयांचा देश आहे. आपला देश हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा अनुनय करणार नाही किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात राहणार नाही, म्हणजेच धर्मनिरपेक्षता आपल्या संविधानाचे वैशिष्ट्ये आहे.


                                   भारतीय संविधानाने समता दिली. जात, धर्म, वंश, लिंग,प्रांत,भाषा आणि जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही, याची हमी भारतीय संविधानाने कलम १४,१५,१६ ने दिलेली आहे. कलम १४ अंतर्गत कायद्यासमोर सर्वांची समानता. संविधानाने कायद्याचे अधिराज्य स्थापून दिले असून कायद्याच्या चौकटीतच राज्य कारभार करणे, राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या मनमानी, बेकायदेशीर कार्याला आळा बसतो.


                            तसेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिका स्वतंत्र असल्याने राज्यकर्त्यांच्या मनमानी कारभारास चाप बसतो. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळता येणार नाही,याची तरतूद संविधानाने कलम १७ नुसार केलेली आहे.


                                  प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. आपले विचार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने कलम १९ नुसार दिलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संशोधन, लेखन आणि प्रबोधन करणाऱ्या अनेक महापुरुषांचा छळ झाला, त्यांच्या हत्या झाल्या, त्यामुळे असंख्य सृजनशील पूर्वजांना व्यक्त होता आले नाही. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देते.


                                   आपल्याला कोणताही वैध व्यवसाय करण्याचे, देशांतर्गत संचार करण्याचे, देशांतर्गत स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देते. एखाद्या गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्याला जामीन मिळवण्याचा अधिकार संविधान देते. जीविताचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कलम 21 नुसार दिलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक भारतीय मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार याच कलमाअंतर्गत संविधान देते. 


                                   शासन-पोलीस यंत्रणा जर एखाद्या असहाय्य व्यक्तीवर अन्याय करत असेल, तर न्यायालयात रिट दाखल करून न्याय मागता येतो. जय भीम चित्रपटात तपासादरम्यान पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या आरोपीला जेंव्हा फरार घोषित केले तेंव्हा ऍड. चंद्रु हेबिअस कॉर्पसची (where is body) रिट दाखल करून त्याच्या पत्नीला न्याय मिळवून देतात, हा अधिकार संविधानातील कलम 32 नुसार दिलेला आहे. या कलमाद्वारे थेट सर्वोच्च न्यायालयात पाच प्रकारच्या रिट दाखल करता येते. हा मूलभूत अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलम ३२ ला संविधानाचा आत्मा म्हणतात.( Article 32 is heart of Indian constitution). तर कलम २२६ नुसार उच्च न्यायालयात रिट दाखल करता येते.


                                 भारतीय संविधानाने वेठबिगारी, बालमजुरी संपुष्टात आणली. कोणत्याही स्त्री-पुरुषांची किंवा लहान मुलांची खरेदी विक्री करता येणार नाही, तसेच कोणत्याही लहान मुलांना कामगार म्हणून ठेवता येणार नाही, याची तरतूद भारतीय संविधानाने कलम २३, २४ नुसार केलेली केली. म्हणजे संविधानाने गुलामगिरी नष्ट केली.


                                   आपापल्या धर्मानुसार धार्मिक आचरण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कलम २५ नुसार दिलेला आहे. अल्पसंख्यांक, आदिवासी, अनुसूचित जाती, शेतकरी, महिला यांच्या विकासाची तरतूद संविधानाने केलेली आहे.सर्व जातिधर्मातील महिला आज सर्व क्षेत्रात आहेत,हे संविधानाने शक्य झाले. कलम १५, २१, ३९,५१ इत्यादी कलमानुसार महिलांचा आदर, सन्मान आणि हक्काबाबतची तरतूद आहे.


                                       संविधानाने ज्याप्रमाणे आपल्याला हक्क अधिकार दिले, तशीच आपल्याला जबाबदारीदेखील दिलेली आहे. संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगणे, संमिश्र संस्कृतीचा आदर करणे. आपल्या देशाची संस्कृती एकप्रवाही नाही, आपल्या देशात वारकरी, नाथ, शाक्त, शैव, वैष्णव, महानुभव, लिंगायत, सुफी, हिंदू,जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादी धर्म-संप्रदाय आहेत. चिकित्सेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्या सर्वांचा आदर बाळगणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे, असे संविधान कलम ५१ मध्ये सांगते. महिलांचा आदर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, इत्यादी कर्तव्य संविधानाने सांगितलेली आहेत.


                                 संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा, नेता निवडण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार दिला. एखाद्या उद्योगपतीचे, नेत्यांचे आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या मताचे मूल्य एकच आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळ, लोकसभा यामध्ये नेतृत्व करता येते.


                                उपेक्षित वर्गाला राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे, याची तरतूद संविधानाने केलेली आहे, यालाच आपण आरक्षण म्हणतो. भारतीय संविधानातील कलम 340, 341, आणि 342 या कलमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांना भारतीय संविधानाने आरक्षण दिलेले आहे.


                                   अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे. 


                      आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो, त्या पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, कारण पर्यावरणाचे रक्षण झाले तरच मानवाचे अस्तित्व टिकणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणाच्या जबाबदारीची तरतूद देखील संविधानातील कलम 48 कलम 51 आणि कलम 21 नुसार करण्यात आलेली आहे.


                                    भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे जितके कर्तव्यकठोर आहे तितकेच लवचिक आहे. मूळ चौकटीत बदल न करता घटनादुरुस्ती करण्याची तरतूद संविधानात आहे. लोकोपयोगी अनेकवेळा घटनादुरुस्ती झालेल्या आहेत.

                                             संविधानाचा आदर करणे, संविधानाचे संवर्धन करणे आणि संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा लोककल्याणकारी संविधाची अंमलजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली. यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत.

            मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत प्रसिद्धीद्वारे देण्यात आली आहे.


            मराठा प्रवर्ग व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमार्फत उद्योगधंदे उभारण्याकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न या योजनांमार्फत केला जाणार आहे.


            वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत (IR-I) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता वयोमर्यादा कमाल ६० वर्षे आहे. या योजनेची मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. ४.५ लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा व व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी उद्योगाच्या दृष्टीने बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे.


             तसेच, गट कर्ज व्याज परतावा (R-II) योजने अंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीच्या गटास कर्ज देण्यात येते. दोन व्यक्तीसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, किंवा तीन व्यक्तीसाठी रु. ३५ लाखाच्या, चार व्यक्तीसाठी रु. ४५ लाखाच्या किंवा पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यंतच्या व्यवसाय उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत १२ टक्के व्याज किंवा रु १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.


            या योजनेमध्ये FPO गटांनी त्याच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.


            महामंडळाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा हे महामंडळ नियमानुसार करीत आहे. सदर योजनांची अंमलबजावणी २ फेब्रुवारी, २०१८ पासून सुरु करण्यात आली असून, सद्यस्थितीत कालानुरूप व लाभार्थीभिमुख अनेक बदल योजनामध्ये केलेले आहेत.


000

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक

 कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक


सुधारित कार्यक्रमानुसार 26 फेब्रुवारी रोजी मतदान.

            मुंबई, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 - चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. यासंदर्भात आता सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून, या निवडणूकीसाठी मतदान, रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.


            सुधारित कार्यक्रमानुसार मंगळवारी, 31 जानेवारी 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार 7 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी छाननी होईल. शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार, 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होईल. गुरुवार, 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होईल. शनिवारी, 4 मार्च 2023 रोजी निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईल.    


०००

महाराष्ट्रातील 4 जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर.

 महाराष्ट्रातील 4 जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर.


            नवी दिल्ली, 25 : होमगार्ड (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी) सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्रातील 4 जवानांना "राष्ट्रपती पदक" आज जाहीर झाले आहेत.


            दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला होमगार्ड आणि नागरी संरक्षणामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवानांना राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून "राष्ट्रपती पदक" जाहीर केले जातात. यात राज्यातील 4 जवानांचा समावेश आहे.


होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :


· श्री काशिनाथ रडका कुरकुटे, सहायक उपनियंत्रक (सीडी)


· श्री. एकनाथ जगन्नाथ सुतार, प्लाटून कमांडर (एचजी)


· श्री. परमेश्वर केरबा जवादे, ऑफिसर कमांडिंग


· श्रीमती मोनिका अशोक शिंपी, होमगार्ड

महाराष्ट्राला 74 ‘पोलीस पदक’ जाहीर

 महाराष्ट्राला 74 ‘पोलीस पदक’ जाहीर

            नवी दिल्ली, दि. 25 :पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत.


            प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 901 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 93 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक' (पीपीएम), 140 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 668 पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत. 


          देशातील 93 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्राच्या चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.      


चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)


 1. श्री.देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा कोऑपरेशन, मुंबई


2. श्री.अनुप कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,


3. श्री. संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई,


4. श्री.दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरिक्षक, ठाणे


राज्यातील एकूण 31 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी)


1. मनीष कलवानिया, आयपीएस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (1st BAR To PMG)


2. संदिप पुंजा मंडलिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक (2nd BAR To PMG)


3. राहूल बाळासो नामाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक


4. सुनिल विश्वास बागल, पोलीस उपनिरीक्षक


5. देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक-पोलीस हवालदार


6. गणेश शंकर दोहे, पोलीस हवालदार


7. एकनाथ बारीकराव सिडाम, पोलीस हवालदार


8. प्रकाश श्रीरंग नरोटे, पोलीस हवालदार


9. दिनेश पांडुरंग गावडे, पोलीस हवालदार


10. शंकर दसरू पुंगटी, पोलीस हवालदार


11. योगीराज रामदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक


12. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक


13. सदाशिव नामदेव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक


14. प्रेमकुमार लहु दांडेकर, पोलीस उपनिरीक्षक


15. राहूल विठ्ठल आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक


16. देवाजी कोटूजी कोवासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक


17. राजेंद्र अंतराम मडावी, मुख्य हवालदार


18. नांगसू पंजामी उसेंडी, नाईक पोलीस हवालदार(1st BAR To PMG)


19. देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार (1st BAR To PMG)


20. प्रदिप विनायक भासरकर, नाईक पोलीस हवालदार


21. सुधाकर मानु कोवाची, पोलीस हवालदार


22. नंदेश्वर सोमा मडावी, पोलीस हवालदार


23. सुभाष भजनराव पाडा, पोलीस हवालदार


24. भाऊजी रघू मडावी, पोलीस हवालदार


25. शिवाजी मोडु उसेंडी, पोलीस हवालदार


26. गंगाधर केरबा कऱ्हाड, पोलीस हवालदार


27. रामा मैनु कोवाची, पोलीस हवालदार


28. महेश पोचम मदेशी, पोलीस हवालदार


29. स्वप्नील केसरी पाडा, पोलीस हवालदार


30. तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक


31. नामदेव महिपती यादव, पोलीस हवालदार


राज्यातील 39 पोलीसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (PM)


 1. श्री जयकुमार सुसाईराज, विशेष पोलीस महानिरीक्षक,कुलाबा, मुंबई


2. श्री लखमी कृष्ण गौतम, पोलिस अधिक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,कुलाबा, मुंबई


3. श्री निशीथ वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपाडा, मुंबई


4. श्री संतोष गणपतराव गायके, पोलीस उपअधिक्षक, गोरेगाव ,मुंबई


5. श्री चंद्रकांत विठ्ठल मकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दादर (पूर्व),मुंबई


6. श्री दिपक राजाराम चव्हाण, पोलीस निरीक्षक, मांटुगा (पूर्व) ,मुंबई


7. श्री. रमेश विठ्ठलराव कठार, पी.डब्ल्यु.आय (इजिनिंअर) औरंगाबाद परीक्षेत्र


8. श्री. देविदास काशीनाथ घेवारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती


9. श्री. सुधाकर पंडितराव काटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे


10. श्री. शैलेश दिगांबर पासलवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई


11. श्री. मनोज श्रीकांत नेर्लेकर,पोलीस उपअधिक्षक, वरळी , मुंबई


12. श्री. शाम खंडेराव शिंदे , पोलीस निरीक्षक, नवी मुंबई


13. श्रीमती अलका सदाशिव देशमुख, पोलीस निरीक्षक, ठाणे शहर


14.श्री. दत्तात्रय भंगवतराव पाबळे, पोलीस निरीक्षक, डी.एन. रोड, मुंबई


15. श्री. बापू तुळशीराम ओवे, पोलीस निरीक्षक, गोरेगांव (पूर्व), मुंबई


16. श्री. प्रसाद दशरथ पांढरे, पोलीस निरीक्षक



प्राचीन मंदिरे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत

 प्राचीन मंदिरे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राजस्थानमधील भीनमालच्या श्री नीलकंठ महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थिती.

            जालोर, दि. 25 :- राजस्थानमधील जालोर-भीनमाल येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार तथा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले. 


            याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त राव मुफतसिंह ओबावत, मंदिर समितीचे पदाधिकारी आदी तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवादही साधला. हे प्राचीन मंदिर आपल्या सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. अशा श्रद्धास्थानांचे जतन, संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. तरच पुढच्या पिढीला आपली प्राचीन संस्कृती आणि तिचा वारसा समजून घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 


            जालोर - भीनमाल येथील हे निलकंठ महादेव मंदिर पंधराशे वर्षे जुने आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्रांगणाचा कायापालट करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मंदिर समितीने विशेष निमंत्रण दिले होते.

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कारझाकीर हुसेन यांना पद्मविभूषण,

 महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कारझाकीर हुसेन यांना पद्मविभूषण,

कुमार मंगलम् बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण.

            नवी दिल्ली 25: देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तसेच महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.


             केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते व गजानन माने, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला (मरणोपरांत), कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया, साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.


             या वर्षी देशातील एकूण 106 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 19 महिला तर 2 हे परदेशी नागरिक आहेत. 7 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.


०००


 

Featured post

Lakshvedhi