Thursday, 26 January 2023

महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

 महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

            नवी दिल्ली, दि.25: दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 43 मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.


            राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2022’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील रविराज अनिल फडणीस यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर महेश शंकर चोरमले आणि सय्यद बाबू शेख यांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला.


            तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले असून, देशातील 43 नागरिकांचा समावेश आहे. यातील सात नागरिकांना ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’, दोन नागरिकांना मरणोपरांत पुरस्कार, आठ नागरिकांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. एकूण 28 नागरिकांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि पुरस्कार राशी असे आहे.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुण्याचे जिल्हाधिकारी

डॉ. राजेश देशमुख राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

            नवी दिल्ली दि.25: राज्यातील पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड' या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.


            दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे भारत निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजन करण्यात आले. केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            भारत निवडणूक आयोगाची यंदाची संकल्पना 'मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही', अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई यांचे द्वारा निर्मित 'मैं भारत हॅुं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.


            पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखांपेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारांवर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


            पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह सहकार्याने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.


            जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.


            जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.


            यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी राष्ट्रपती यांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.


००००


 

विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे

 विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे

-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.


            ‘परीक्षा पे चर्चा’ पर्व 6 या उपक्रमाअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय, गिरगाव, मुंबई या शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.


            या स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागातील ६३१ शाळेतील २३ हजार ९६७ विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील ४३० शाळेतील ५८९० विद्यार्थी, शिक्षण निरीक्षक दक्षिण विभागातील १३० शाळेतील २७२८ विद्यार्थी, ठाणे जिल्ह्यातील ६५६ शाळेतील १७ हजार ८७६ विद्यार्थी, रायगड जिल्ह्यातील ५७३ शाळेतील ९८८८ विद्यार्थी व पालघर जिल्ह्यातील ३३७ शाळेतील ८६४७ विद्यार्थी असे एकूण २७५७ शाळेतील ६८९९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली. यावेळी शिक्षण निरीक्षक देविदास महाजन उपस्थित होते.


            या चित्रकला स्पर्धेकरिता देण्यात आलेल्या विषयांमध्ये G-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोस्तव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नं. 1, प्रधानमंत्री जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजीनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाओ, बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय, हे विषय देण्यात आले होते.


            या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पंचवीस विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.


00000

Wednesday, 25 January 2023

ऑनलाईन गोष्टी सांगणारे बंधू / भगिनी हवेत... आकर्षक मानधन, घरबसल्या काम करा*

 *ऑनलाईन गोष्टी सांगणारे बंधू / भगिनी हवेत... आकर्षक मानधन, घरबसल्या काम करा* 


7 ते 14 वयोगटातील लहान मुलांसाठी घरबसल्या ऑनलाईन गोष्टी सांगणारे स्त्री - पुरुष हवेत. वयाची अट नाही, गोष्टी रंगवून, आकर्षक पद्‌धतीने सांगता आल्या पाहिजेत. निवड झालेल्यांना घरबसल्या काम मिळेल आणि रोज एक तास गोष्ट सांगून दरमहा रु. 5000/- मानधन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांची नावे 10 मार्च रोजी संकेस्थळावर प्रसिद्ध केली जातील.


या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी *रामायणातील हनुमान संजीवनी बुटी हिमालयातून घेऊन येतो* ही गोष्ट 8 ते 10 मिनीटांमध्ये सांगून आपल्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूब वर अपलोड करा. खाली दिलेल्या लिंक वर फॉर्म व व्हिडिओची लिंक जोडा. त्याबरोबर प्रक्रिया शुल्क म्हणून रू. 100/- फक्त 9860176279 या क्रमांकावर पाठवा. प्रक्रिया शुल्क भरल्याची ऑनलाईन पावती व्हॉट्सॲपला पाठवा. प्रक्रिया शुल्काविना पाठवलेला व्हिडिओ विचारात घेतला जाणार नाही.


 *व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023*


फॉर्म लिंक - https://www.bhishmaindics.org/story-teller 


संपर्क - भीष्म स्कूल ऑफ संस्कार, पुणे - मोबाईल - +91 93094 62627


कृपया हा संदेश शेअर करावा ही विनंती 


*लिंक -https://www.bhishmaindics.org/story-teller*

Shi उत्सुकता

 🌼....📝....🚘


एका गाडीच्या मागच्या काचेवर फ़क्त *'शि'* असे लिहलेले होते

मला उत्सुकता लागली की असं का??

शेवटी मी गाड़ी वाल्याला विचारले...

तसा तो भड़कूनच म्हणाला

सगळे इंग्रजीत *'L'* for Learning लिहितात

मी मराठीत लिहिलय

*'शि'* >.. शिकतोय.....😉


गाड़ी अर्थातच MH12..होती...😂😂😂😂


*मराठी भाषा संवर्धन सप्ताहच्या हार्दीक शुभेच्छा..!* 💐🌾🪷🦋

शांती भारतीय संस्कृती

 *🛑 जगाची भावना : खरी सुखशांती भारतातच : आपले लोक पैसे कमविण्यासाठी बाहेरच्या देशात जातात आणि परदेशी लोक सुखशांती मिळवण्यासाठी करोडो रुपये सोडून भारतात येतात आणि आपल्या देवी-देवतांचे स्मरण करून मनःशांती मिळवतात...आपली वाटचाल अधोगतिकडे..❓.आणि परदेशी पाहुण्यांची वाटचाल ईश्वराकडे...❓अजूनही वेळ गेलेली नाही...आपल्या भारतीय संस्कृतीचा स्वीकार करा.(टीप : या व्हिडीओ मधील महिलेचे नाव नीट ऐकावे...)*


सुप्रभात

 *तुमच्या आयुष्यातला आनंद,*

*गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,*

*अडचणी उंदरा इतक्या लहान असो,*

*आयुष्य सोंडे इतके लांब असो,*

*क्षण मोदका इतके असो.*

*माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा







.🙏*

Featured post

Lakshvedhi