Monday, 16 January 2023

संक्रांतीचं वाण (खास पुरुषांसाठी)

 संक्रांतीचं वाण (खास पुरुषांसाठी) वान द्या हो वान घ्या हो 


ळ चे महात्म्य




 

केरळ संस्कृती


 

भारतातील १२ज्योतिर्लिंगे.

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

         *🔸भारतातील १२ज्योतिर्लिंगे.🔸*


*देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे - तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी ठाण मांडले, त्यालाच " ज्योतिर्लिंग " म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाचे पाच ज्योतिर्लिंग स्थापित आहे. ह्या ज्योतिर्लिंगा सोबत शिवाची एक एक आख्यायिका आहेत.*


*१. श्री सोमनाथ, सोरटी ( गुजरात )*

*२. श्री मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आंध्र प्रदेश )*

*३. श्री महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश )*

*४. श्री ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश )*

*५. श्री वैद्यनाथ, परळी ( महाराष्ट्र )*

*६. श्री औंढ नागनाथ, हिंगोली / परभणी ( महाराष्ट्र )*

*७. श्री केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल प्रदेश )*

*८. श्री त्र्यंबकेश्वर, नाशिक ( महाराष्ट्र )*

*९. श्री रामेश्वर, रामेश्वरम / सेतूबंधनं ( तामिळनाडू )*

*१०. श्री भीमाशंकर, डाकिनी / पुणे ( महाराष्ट्र )*

*११. श्री विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश )*

*१२. श्री घृष्णेश्वर, वेरूळ / देवसरोवर ( महाराष्ट्र )*


❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

प्रॉब्लेम समजला पाहिजे

 *प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे* .... नुसते प्रयत्न करून उपयोग नाही 😀😀😀😀


*पु.ल. आणि वारा*

 *पु.ल. आणि वारा*


 *पुलंचा हजरजबाबीपणा, उस्फुर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…* 


१९६०-६१ आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती..त्यातील संवाद पाहा:


वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे हे खरं आहे काय?


पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”


“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”


“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”


“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”


“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”


“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”


“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”


“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”


“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”


“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!


“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”


“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!

लाइफ style

 


Featured post

Lakshvedhi