Monday, 26 December 2022

जिवन ऐसे नाव

: *कोट्यवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि तुमच्या सारखे माणसं कमवावी लागतात.*     

 ________❤️_______

*कुठलीही गाठ बांधताना, धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके, समान ओढावी लागतात. तेव्हाच गाठ घट्ट बसते...*

*नात्यांचही असचं आहे, दोन्ही बाजुने समान ओढ असेल, तरच नात्यांची गाठ घट्ट बसते...!!*


     🙏🏻❤️ *शुभ सकाळ* ❤️🙏🏻

Jeevan गाणे

 




*
*



सुप्राभा

 *The loveliest day comes when you wake up and find that life still colours your world, through people who truly care & never fail to remember you*

         🌹🌹🌹🌹🌹

     *Good Morning*

*Have a great week ahead*

धुळे जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाकरिता निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील

 धुळे जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या

 बांधकामाकरिता निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील


-ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


            नागपूर, दि. २२ : धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 26 शाळांच्या 61 वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी विविध शीर्षकाखाली निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. निधीच्या उपलब्धतेसाठी लवकरच धुळे येथे बैठक घेण्यात येईल, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            विधानसभेत सदस्य कुणाल पाटील यांनी आज अर्धा तास चर्चेत धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 26 शाळांच्या 61 वर्ग खोल्या मोडकळीस आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत मंत्री श्री. महाजन बोलत होते.           


            मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेच्या शाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेचा स्व-निधी, जिल्हा वार्षिक योजना, सामाजिक उत्तर दायित्व निधीतून निधी उपलब्ध होण्यासाठी बैठकीचे आयोजन करून प्रयत्न केले जातील.            


             यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, देवराम होळी, प्रकाश सोळंके, प्रा. वर्षा गायकवाड, डॉ.भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला.


00000

Sunday, 25 December 2022

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद

 .



नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद

                                               - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

        औरंगाबाद, दि. 25 : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांसोबतच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून राज्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.


            डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबाद शहर व परिसरात आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यातून सकारात्मक कृतीची प्रेरणा मिळते. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशासाठी काय केले हा विचार रुजविण्याचे मोठे कार्य धर्माधिकारी कुटुंबियांनी केले आहे. आज राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली असून गावे आणि शहरांसाठी यातून प्रेरणा मिळते. त्यातील नागरिकांचा मोठा सहभाग इतर हजारो नागरिकांसाठी प्रेरणा देणारा ठरत असून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाजासाठी दिपस्तंभासारखे आहेत, असेही त्यांनी सांगितले.


            राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असून आज लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. हे सरकार आपले आहे ही भावना महत्वाची आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी चांगले काम करुया. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 74 हजार स्वयंसेवकांनी सहभागी होत 748 टन कचरा संकलन केला. या उपक्रमातून शहर स्वच्छ करण्यास मदत झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व सहभागी नागरिकांचे अभिनंदन केले.


            केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर तसेच परिसरात स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. राज्यातील अनेक शहरात याच धर्तीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. निरामयी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छता मोहिमेसोबतच संस्थेकडून आरोग्य, पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम राबविण्यात येतात हे महत्वपूर्ण आहे. प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेचा आदर्श घेत आपले शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी सर्व मिळून काम करुया, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले.


             श्री. सचिन धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छता आणि वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत आवाहन केले. या स्वच्छता अभियानासाठी राज्यभरातून आलेले स्वयंसेवक उपस्थित होते.

डा. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान का सामाजिक कल्याण उपक्रमों में दिया योगदान सराहनीय

 

डा. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान का सामाजिक कल्याण उपक्रमों में दिया योगदान सराहनीय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

         औरंगाबाद, दिसंबर २५:- ‘डा. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने महाराष्ट्र के लिए बड़ा योगदान दिया है तथा वृक्षारोपण, स्वास्थ्य एवं स्वच्छता अभियान सहित अनेक समाज कल्याण से संबंधित उपक्रम चलाएं हैं. समाज सेवा की विरासत प्रतिष्ठान के माध्यम से आगे चल पड़ी है जो राज्य के लिए वास्तव में गर्व की बात है,’ यह प्रतिपादन राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने आज यहां किया.

         डा. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान की ओर से औरंगाबाद शहर तथा परिसर में स्वच्छता अभियान को लेकर आयोजित कार्यक्रम में मुख्यमंत्री श्री शिंदे बोल रहे थे. इस अवसर पर केंद्रीय राज्य मंत्री डा. भागवत कराड, जिला के पालक मंत्री संदीपान भुमरे, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, विधायक संजय शिरसाट, विधायक प्रदीप जयसवाल, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी और अन्य गणमान्य उपस्थित थे.

         मुख्यमंत्री श्री शिंदे ने आगे संबोधित करते हुए कहा कि डा. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान के योगदान से सकारात्मक कार्य करने की प्रेरणा मिलती है. उन्होंने कहा कि धर्माधिकारी परिवार ने लोगों में इस विचार को लोगो के मन में बोया है कि -देश ने मेरे लिए क्या किया यह विचार ना करते हुए मैंने देश के लिए क्या किया इस दिशा में विचार किया जाना चाहिए. उन्होंने कहा कि आज राज्य में स्वच्छता अभियान चल रहा है और शहरों के साथ-साथ अनेक ग्रामों ने भी इससे प्रेरणा ली है. उन्होंने कहा कि इस अभियान में बड़ी संख्या में सहभागी हो रहे नागरिकों को देखकर अन्य हजारों नागरिक भी प्रेरणा लेकर इस काम में सम्मिलित हो रहे हैं. इससे यही प्रतीत होता है कि डा. नानासाहेब धर्माधिकारी के विचार समाज के लिए प्रेरणादायी है.


          मुख्यमंत्री श्री शिंदे ने आगे कहा कि राज्य के सर्वांगीण विकास के लिए सरकार हर संभव प्रयास कर रही है और आज लोगों के चेहरे पर आनंद दिखाई पड़ रहा है. उन्होंने कहा कि “यह हमारी सरकार है” इस प्रकार की भावना लोगों में दिखाई देना काफी महत्वपूर्ण है. उन्होंने आह्वान किया कि सब मिलकर सामान्य लोगों के कल्याण के लिए अच्छे कार्य करें. प्रतिष्ठान की ओर से चलाए जा रहे स्वच्छता अभियान में ७४ हजार स्वयंसेवकों ने भाग लेते हुए ७४८ टन कचरा इकट्ठा किया. इस उपक्रम के माध्यम से शहर को स्वच्छ करने में सहायता हुई है और इसके लिए मुख्यमंत्री ने स्वच्छता अभियान में सहभागी होने वाले सभी नागरिकों का अभिनंदन किया.


 


000000


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


वृत्त क्र. 3809


 


नाताळनिमित्त राज्यपालांची सेंट स्टीफन चर्चला भेट


 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाताळनिमित्त वांद्रे मुंबई येथील सेंट स्टीफन चर्चला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रभू येशूची प्रार्थना केली

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध

 रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न


सोलापूर, दि. 25 राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात 14 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तत्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


 करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. 


        यावेळी महसूल, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालक श्रीमती रश्मी बागल, महेश चिवटे आदि उपस्थित होते.


       प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून, मोळी टाकून कारखान्याचा 27 वा गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.


याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तत्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार असून करमाळा तालुक्यातील विकासाचे प्रकल्प पूर्ण केले जातील, असे त्यांनी सांगितले. 


श्री आदिनाथ कारखान्याचे संस्थापक गोविंदराव पाटील आणि दिगंबराराव बागल यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले, या कारखान्याचे 32 हजार सभासद असून, त्यांची कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी कारखान्याचे खाजगीकरण होऊ नये, हा कारखाना सहकारी तत्वावरच चालावा, ही भूमिका ठेवून सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित, एक दिलाने काम करा, सरकार पाठीशी राहील, असे सांगून त्यांनी कारखान्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


            महसूल व आरोग्य विभाग नाविन्यपूर्ण व चांगल्या योजना राबवत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेतून महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 4.5 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होत आहे.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने समयसूचकतेने निर्णय घेतला. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे हित कायम राखले गेले आहे. शेतकऱ्यांना व कारखान्याला नवसंजीवनी देण्याचा अध्याय या कारखान्याने सुरू केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्यासाठी भैरवनाथ उद्योग समुहाने आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचा आहे. तो सभासदांचाच राहणार आहे. सभासदांच्या हितासाठी व कारखान्याच्या प्रगतीसाठी भैरवनाथ उद्योगसमुहाकडून यापुढेही या कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.


        यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


00000


 


 


                                                             


 


 

Featured post

Lakshvedhi