Wednesday, 21 December 2022

गतिमानपणे मुंबईचा कायापालट

 गतिमानपणे मुंबईचा कायापालट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही.

            नागपूर दि. २० : रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.


            मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. मुंबई बदलत असून आता महानगरातील सर्व रस्त्यांचे ६००० कोटी खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. सोबतच मुंबईच्या सुशोभीकरणाला देखील सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रस्ते, वाहतूक बेट, पदपथ, उड्डाणपुल यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे.


            मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून प्रत्येक वॉडमध्ये हा दवाखाना सुरू होणार आहे. त्याद्वारे उपचार आणि महत्वाच्या वैद्यकीय चाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. मुंबईत ५५०० आशा स्वयंसेविकांची सेवा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी ५००० स्वच्छतादूतांची नियुक्ती केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            जी २० परिषद बैठकीसाठी मुंबई सजली होती. त्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी देखील केले. विविध विकास कामांच्या माध्यमातून मुंबई बदलत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


००००

नागपूर येथील विधिमंडळ इमारतीतमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन.

 नागपूर येथील विधिमंडळ इमारतीतमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन.

            नागपूर दि. २० : येथील विधिमंडळाच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार श्रीमती सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्रीमती अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.   

            अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते. आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार श्रीमती अहिरे यांच्या हस्ते करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सकाळी हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.


००००

महानिर्मिती'च्या अभियंता पदासाठीअधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक

 महानिर्मिती'च्या अभियंता पदासाठीअधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            नागपूरदि. २० : राज्य शासनाच्या अंगीकृत वीज वितरणमहानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंता पदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. याबाबत ५ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

            याबाबत सदस्य चेतन तुपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवारसदस्य सर्वश्री जयंत पाटीलदीपक चव्हाणछगन भुजबळ आदींनी सहभाग घेतला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

            राज्य शासनाच्या सेवेत प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री. तुपेबच्चू कडू आदींनी सहभाग घेतला.

Tuesday, 20 December 2022

नववर्ष आणि नाताळ निमित्त एमटीडीसीद्वारे विविध सवलती

 नववर्ष आणि नाताळ निमित्त एमटीडीसीद्वारे विविध सवलती

          मुंबई, दि. 20 : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सर्वोत्तम सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी सज्ज झाले असून आरक्षणासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. निवासी आरक्षण www.mtdc.co या वेबसाईटवर सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास .


          औरंगाबाद विभागातील अजंठा (फर्दापुर), लोणार, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे ही पर्यटकांची मुख्य आकर्षण ठरत असून आतापर्यंत 90 टक्के आरक्षण झाले आहे.


       पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि व्हाट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातुन देण्यात येत आहे.          


          सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरा यांचा अनुभव घेता यावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचा मानस असुन स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपारीक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. पर्यटक निवासाच्या 100 किमी च्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे.


पर्यटकांना उत्तम सुविधा द्या : व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा


        महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे एकुण 30 निवास आणि उपहारगृह यांचे परिचालन होत आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज महामंडळाची ख्याती साऱ्या भारतभर पसरली आहे. केवळ महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशभरातुन असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा यांनी दिल्या आहेत.


                                                   सोयी – सुविधा


             पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींगचीही सोय करण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र नियोजन करण्यात येत आहे.


         पर्यटनाबरोबरच पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्याअंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग

 अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्याअंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग

- संजय राठोड.

            नागपूर, दि. २० : राज्यातील अनुसूचित जाती वस्ती योजनेतील कामांमध्ये दुबारता टाळावी आणि कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी या योजनांच्या माहितीचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

            विधानसभा सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते.

            अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. ग्रामसभेच्या माध्यमातून कामांची यादी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेकडे येते आणि नंतर ती जिल्हा नियोजन समितीकडे पाठविली जाते. सर्वच अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये विकास कामे मार्गी लावणे, त्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच हेतू त्यामध्ये आहे, अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली

            कामांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यासाठी जीआयएस मॅपिंग काम गतीने व्हावी यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी या योजनेत निधी दिला जातो. शहरी भागात नागरी वस्ती दलित वस्ती सुधार योजना राबवली जाते. वस्ती विकासासाठी दिलेला निधी त्याच कामांसाठी खर्च होईल.कामातील दुबारता टळेल, असे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

            लक्षवेधीवरील या चर्चेत विधानसभा सदस्य श्री. कानडे यांच्यासह सदस्य वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, ज्ञानराज चौगुले, जितेंद्र आव्हाड, दीपक चव्हाण आदींनी सहभाग घेतला.


000

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालावे


विधानसभा लक्षवेधी सूचना :

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालावे.

यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            नागपूर, दि. २० : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. यापूर्वी श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याप्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात ४० हून अधिक मोर्चे निघाले. विविध मोठ्या १५ हून अधिक संघटनांनी त्यात सहभाग घेतला. आंतरधर्मीय विवाहाला कोणाचा विरोध नाही. मात्र, जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग म्हणून असे विवाह काही जिल्ह्यात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात काही राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करून अधिक प्रभावी कायदा करण्याचा विचार करण्यात येईल. षडयंत्राचा भाग म्हणून कोणाची फसवणूक होऊ नये, हीच राज्य शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

            राज्यातील छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय कायद्याचा अधिक्षेप करून आपण तो कायदा करतोय त्यामुळे विविध विभागांचे म्हणने त्यामध्ये विचारात घ्यावे लागते. यासंदर्भात राज्य शासन पाठपुरावा करत असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

            लक्षवेधी वरील या चर्चेत विधानसभा सदस्य श्री. भातखळकर यांच्यासह सदस्य अबू आझमी, सुनील प्रभू, आशिष शेलार आदींनी सहभाग घेतला.

000




 

गतिमानपणे मुंबईचा कायापालट

 गतिमानपणे मुंबईचा कायापालट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

 

            नागपूर दि. २० : रस्त्यांचे काँक्रीटीकरणपदपथरस्तेउड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

            मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेमुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. मुंबई बदलत असून आता महानगरातील सर्व रस्त्यांचे ६००० कोटी खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. सोबतच मुंबईच्या सुशोभीकरणाला देखील सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रस्तेवाहतूक बेटपदपथउड्डाणपुल यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे.

            मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून प्रत्येक वॉडमध्ये हा दवाखाना सुरू होणार आहे. त्याद्वारे उपचार आणि महत्वाच्या वैद्यकीय चाचण्या देखील  मोफत करण्यात येणार आहेत. मुंबईत ५५०० आशा स्वयंसेविकांची सेवा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी ५००० स्वच्छतादूतांची नियुक्ती केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            जी २० परिषद बैठकीसाठी मुंबई सजली होती. त्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी देखील केले. विविध विकास कामांच्या माध्यमातून मुंबई बदलत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

००००


Featured post

Lakshvedhi