नागपूर येथील विधिमंडळ इमारतीतमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन.
नागपूर दि. २० : येथील विधिमंडळाच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार श्रीमती सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्रीमती अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते. आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार श्रीमती अहिरे यांच्या हस्ते करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सकाळी हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
००००
No comments:
Post a Comment