Monday, 19 December 2022

विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी'महाअसेंब्ली ॲप' उपलब्ध.

 विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी'महाअसेंब्ली ॲप' उपलब्ध.

            मुंबई, दि. १९ : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत दिली.


            नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ॲप (MH Assembly) तयार केले असून विधिमंडळ कामकाजाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.


***

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे

 सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

           

            नागपूरदि. १९ :  सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेमराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली.

            केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडविल्या जातातही बाब लोकशाहीला धरून नाही, ही माहिती दिली. कुठल्याही परिस्थ‍ितीत अशा प्रकारची घटना  होऊ नये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री अणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

            सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

***


 

49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे

 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

 

            नागपूरदि. 19 :राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता विधानपरिषद सभागृहविधानभवननागपूर येथे उद्घाटन होणार आहे.

            भारतातील संसदीय लोकशाही कशा पध्दतीने कार्यरत आहेकार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जातेत्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातोअर्थसंकल्पीय प्रक्रियाविधिमंडळाची समिती पद्धतीकायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना मिळत असते.

            या उद्घाटन समारंभास विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रकुल संसदीय मंडळमहाराष्ट्र शाखेचे सह-अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरविधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटीलराष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे खजिनदार ॲड. आशिष शेलारराज्यातील 12 विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित राहणार आहेत.

            49 वा संसदीय अभ्यासवर्ग 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत विधानभवननागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

           

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

            बुधवार दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. विविध संसदीय आयुधेविधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.

            गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धवासाठी युवक चळवळीचे योगदान’ या विषयावर विधानसभा सदस्य कु. प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

            शुक्रवारदि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मार्गदर्शन करणार आहेत.

            शनिवारदि.24 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रजि.चंद्रपूर येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली आहे.

            रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचनाकार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

            सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळनागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थानकर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

            मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. अर्थसंकल्पाची प्रक्रिया : कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन’ या विषयावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मार्गदर्शन करणार आहेत.

            सकाळी 10.35 वा. पीठासीन अधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागी विद्यार्थीप्राध्यापकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण व अभ्यासवर्गाचा समारोप होणार आहे.

या अभ्यासवर्गाचे प्रसारण महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

००००

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही

 नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही.

            नागपूर, दि. १९ : नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ‍दिली. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता.


            यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल. विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


०००००

विधान सभा, विधान परिषदे

 नवनिर्वाचित सदस्य ऋतुजा लटके यांचा विधानसभेत परिचय


            नागपूर, दि. १९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य ऋतुजा लटके यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला करून दिला.


            नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व भागातून त्या निवडून आल्या आहेत.


००००


विधानसभा तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा


            नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित केली.


            सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावत, सुभाष धोटे, सुनिल भुसारा यांचा यात समावेश आहे.


०००

विधानपरिषद तालिका सभापतींच्या नावांची घोषणा


            नागपूर, दि. 19 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अभिजीत वंजारी यांच्या नावांची घोषणा केली.


००००

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही

 नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही.

            नागपूर, दि. १९ : नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ‍दिली. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता.


            यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल. विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


०००००



Featured post

Lakshvedhi