Thursday, 15 December 2022

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तीन टक्‍के निधी राखीव

 ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेततीन टक्‍के निधी राखीव


- सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार 

            मुंबई, दि. 14 : राज्‍यातील गड-किल्‍ले, मंदिरे व महत्‍वाची संरक्षित स्‍मारके इत्‍यादींच्‍या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षासाठी ३ टक्‍के निधीची तरतूद करण्‍यासाठी शासन मान्‍यता देण्‍यात आली आहे.


            याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने १४ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित केला आहे. सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नियोजन विभागाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्‍ट्राच्‍या पुरातन व सांस्‍कृतिक परंपरेचे व वारशाचे जतन करण्‍यासंदर्भात घेतलेल्‍या या निर्णयाबद्दल सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री तथा नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्‍यक्‍त केले आहेत. या निर्णया अंतर्गत तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहेत.


            महाराष्‍ट्राला प्राचीन सांस्‍कृतिक परंपरा लाभलेल्‍या असून, त्‍यात कातळात खोदलेल्‍या जागतिक वारसा म्‍हणून सुप्रसिध्‍द अशा अजिंठा-वेरुळ लेण्‍या, रायगड व सिंधुदुर्ग यासारखे किल्‍ले, यादव व मराठा काळात उभी राहिलेली व सुंदर शिल्‍पाकृतींनी नटलेली गडचिरोली जिल्ह्यातील श्री मार्कंडेय व श्री त्र्यंबकेश्‍वर यासारखी मंदिरे, चंद्रपूर, बल्लारपूर येथील किल्ले, राजुरा येथील श्री सिध्देश्वर मंदिर, भद्रावती येथील विजासन लेणी, मध्‍ययुगीन दर्गे व मकबरे तसेच वसाहत कालीन स्‍थापत्‍यांचा समावेश आहे. ऐतिहासिक व प्राचीन स्‍मारकांपैकी केंद्र सरकारद्वारा भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण मार्फत २८८ स्‍मारके राष्‍ट्रीय महत्‍वाची म्‍हणून जतन केली आहेत. तसेच, महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाने पुरातत्‍व व वस्‍तुसंग्रहालये संचालनालयामार्फत ३८७ स्‍मारके संरक्षित म्‍हणून घोषित केलेली आहेत. यामध्‍ये घटोत्‍कच व धाराशीव ही लेणी, राजगड, सिंहगड, माणिकगड यांच्‍यासारखे किल्‍ले तसेच गड जेजूरी, निरानृसिंहपूर, श्री तुळजाभवानी यांसारखी मंदिरे, लोकमान्‍य टिळक, स्‍वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांची जन्‍मस्‍थळे व गेट वे ऑफ इंडिया अशा स्‍मारकांचा समावेश आहे. राज्‍यस्‍तरीय योजनांमध्‍ये सर्व संरक्षित स्‍मारकांचे संवर्धन करण्‍यासाठी उपलब्‍ध असलेला निधी कमी असल्‍याने, स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची बाब शासनाच्‍या विचाराधीन होती.


             यासंदर्भात सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना यापूर्वी विनंती केली होती, तर उपमुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली होती. या संदर्भातील सविस्‍तर मार्गदर्शक सूचना पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाकडून निर्गमित करण्‍यात येणार आहेत.

मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या बैठकी

 मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशीभारताच्या विकास कार्य गटाच्या प्राधान्यांविषयी व्यापक विचारमंथान.

            मुंबई, दि. 14 : विकास कार्य गट (डीडब्ल्यूजी) जाहीरनाम्यासाठी प्रस्तावित केलेल्या भारताच्या महत्त्वाच्या अग्रक्रमांवर भरीव चर्चेला आज महाराष्ट्रातील मुंबई येथे पहिल्या डीडब्ल्यूजी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सुरवात झाली - ज्यात 'शाश्वत विकास उद्दिष्टांवरील प्रगतीचा वेग वाढवणे' या विषयावरील सत्र 1 चे दोन भागांत आयोजन करण्यात आले आहे


            डीडब्ल्यूजी हा जी 20 शेर्पा ट्रॅक अंतर्गत 13 कार्यगटांपैकी एक असून, 2010 मध्ये जी 20 च्या स्थापनेपासून विकास जाहीरनाम्याचा एक अभिरक्षक आहे. सन 2008 च्या आर्थिक संकटानंतर संकल्पित करण्यात आलेल्या पहिल्या कार्य गटांपैकी तो एक होता


            विकास कार्य गटाची 13-16 डिसेंबर या कालावधीतील तीन दिवसीय बैठक, भारताच्या विकास कार्य गटाच्या प्राधान्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून सर्वसाधारण विकासात्मक मुद्दे अधोरेखित करेल, ज्यामध्ये - विकासासाठी डेटाच्या परिवर्तनीय शक्तीचा उपयोग करणे, पर्यावरणासाठी जीवनशैली (LiFE) एक जागतिक चळवळ म्हणून भारताच्या बांधिलकीला मुख्य प्रवाहात आणणे, आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुविधेद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीचा वेग वाढवणे, डिजिटल परिवर्तन आणि केवळ हरित संक्रमण यासारख्या मोठ्या गुणक प्रभावांसह सर्वसाधारण उपक्रमांचा समावेश आ


            भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्या व्हिडिओ संदेशाने आजच्या बैठकीची सुरवात झाली. जगातील विकसनशील राष्ट्रांच्या बहुआयामी हितांचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी ग्लोबल साउथचा आवाज म्हणून भारताची जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली. गेल्या वर्षी यशस्वी परिणाम देणाऱ्या इंडोनेशियाची दखल घेत, क्वात्रा म्हणाले की, "आम्ही आमच्या परीने, जी 20 मधील महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एकमत पुढे नेण्याचा आणि मजबूत करण्याचा संकल्प करतो


            भारताचे विकास कार्य गटाचे सह-अध्यक्ष, संयुक्त सचिव नागराज नायडू आणि एनम गंभीर यांनी दिवसभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन, भारताच्या प्राधान्य क्षेत्रांची रूपरेषा आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमधील महत्त्वपूर्ण जागतिक पीछेहाट यांचा संदर्भ देत चर्चासत्राची औपचारिक सुरुवात केली. चर्चासत्रात भारताचे प्रस्ताव तसेच अन्न, ऊर्जा आणि वित्तीय बाजारपेठेतील सध्याच्या व्यत्ययांचे तात्काळ विकासात्मक परिणाम यांचा समावेश होता


            चर्चासत्रातील विश्राम काळात, मान्यवर पाहुण्यांनी स्थानिक महाराष्ट्रीय हस्तकला प्रदर्शनाचा आनंद घेतला, ज्यामध्ये स्टार्ट-अप व्यवसायांचा समावेश होता आणि मातीची भांडी बनवण्याचा स्टॉल हो


            शाश्वत विकास उद्दिष्टांवरील गतीमान प्रगती यावरील सत्र 1 च्या दुसऱ्या टप्प्यात 2030 जाहीरनाम्यात केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रांना आवश्यक असलेल्या संरचनात्मक आराखड्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले - ज्यात विकसनशील देशांची लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी कौशल्य आणि क्षमता वृद्धी, चालू असणाऱ्या कामाला गती देणे आणि आवश्यक तेथे नवीन कृती योजना तयार करणे याचा अंतर्भाव होता. भारताने देश, गट आणि ट्रॅक मध्ये प्रभावी सल्लामसलत सुलभ करण्यावर जोर देत बहुपक्षीय संस्था आणि प्रक्रियांमध्ये विकसनशील देशांसाठी बहुमताच्या गरजेवर भर दिला


            वित्तीय सहकार्य आणि विकास संस्था (OECD) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे (ILO) अनुक्रमे लिंगभेदाचे दूरगामी परिणाम तसेच केवळ हरित संक्रमण आणि डिजिटल परिवर्तनाच्या संभाव्यतेवर सादरीकरण केले गे


            वित्तीय सहकार्य आणि विकास संस्थेच्या फेडेरिको बोनाग्लिया यांनी मान्यवरांना माहिती दिली की लैंगिक भेदभाव दूर केल्याने जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात 6 ट्रिलियन डॉलर ची भर पडे


            आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुस्तफा कमल गुएई यांनी शाश्वत आर्थिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी हवामान आणि विकास धोरणे यात सुसूत्रता आणण्याची जागतिक आवश्यकता अधोरेखित करून, हवामान बदल हे श्रमिक बाजारावर कसा परिणाम करतात हे दाखवून दिले. ते म्हणाले, "चक्राकार अर्थव्यवस्थेकडे वळल्याने 2030 पर्यंत 100 दशलक्ष हरित नोकऱ्या निर्माण होण्याची क्षमता आहे


            शाश्वत वित्तपुरवठ्यासाठी विद्यमान आराखडा आणि अडथळे, रोजगार, शिक्षण आणि जागतिक स्तरावर डिजिटल दरी दूर करण्यासाठी आवश्यक पावले याद्वारे लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांना बळकटी देण्याची गरज यावरही देशांनी चर्चा केली


             भारताचे विकास कार्य गटाचे सह-अध्यक्ष नागराज नायडू आणि ईनम गंभीर यांनी देशाच्या हस्तक्षेपाविषयी थोडक्यात माहिती देऊन आणि आपल्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या योगदानासाठी आणि समर्थनासाठी त्यांचे आभार मानून दोन सत्रांचा समारोप के


            ताज लँड एंड हॉटेलच्या लॉनवर रात्रीचे जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने दिवसाची सांगता झाली, जिथे मान्यवरांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध बॉलीवुड चित्रपट उद्योगाची ओळख करून घेतली



समन्वयातून सीमावाद सोडवावा

 समन्वयातून सीमावाद सोडवावा

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मंत्र्यांची समिती नेमण्याच्या निर्देशाची अंमलबजावणी महाराष्ट्र करेल : मुख्यमंत्री

 

            नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले.

            केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर महाराष्ट्र लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी या प्रकरणात संवेदनशीलपणा दाखवून मध्यस्थी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

            केंद्रीय गृहमंत्री यांनी संसद परिसरातील ग्रंथालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर श्री. शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला.

            श्री. शाह पुढे म्हणालेसीमावाद प्रश्न हा संवैधानिकरित्या सोडविला पाहिजे. सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत आरोप - प्रत्यारोप करु नयेत. दोन्ही राज्यांनी तीन-तीन मंत्री नेमून ज्या भागात सीमावादावरून तणाव आहेत्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करावा. यासह कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती नेमावी.

            सीमावादावर अलीकडच्या काही दिवसात सामाजिक माध्यमांतून गैरसमज पसरविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे. विशेषत: फेक (बनावट) ट्विटरच्या माध्यमातून अधिक प्रमाणात  गैरसमज पसरविले गेले आहेत. यापुढे अशा फेक ट्विटर खात्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईलअसे श्री. शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले.

            सर्व राजकीय पक्षांनी सीमावादाचा प्रश्न चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावीअसे  विनंतीपूर्वक आवाहन केंद्रीय गृहमंत्री यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील : मुख्यमंत्री

            महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातीलअशी ठाम भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे मांडली.

            केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना श्री. शिंदे म्हणालेसीमाभागातील मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील. महाराष्ट्र शासन येथील जनतेसोबत खंबीरपणे उभे आहे. सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. जोपर्यंत यावर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेल्या सूचनांवर कार्यवाही करून या भागात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जाईलअसे मुख्यमंत्री म्हणाले. आजची बैठक सकारात्मक वातावरणात पार पडल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

महाराष्ट्राकडून कायदा सुव्यवस्था राखली जात आहे : उपमुख्यमंत्री

            महाराष्ट्र राज्याकडून सीमावाद प्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काही ठराविक संघटना मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. अशा संघटनांवर कायदेशीर कारवाई केली जाईलअशी भूमिका केंद्र शासनाने मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

              महाराष्ट्राकडून आतापर्यंत कोणत्याही कायद्याचा भंग झालेला नाही. सीमाभागातील लोकांविरोधात खटले दाखल केले जातात. कधी मराठी शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कधी मराठी भाषेचा विषय येतो. अशा विविध प्रश्नांवर मंत्र्यांची समिती अभ्यास करून मार्ग काढणार असल्याची माहिती, श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. 

०००

जियो जी, एश से

 


सुप्रभा





 

रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरपंचांना मार्गदर्शन

 रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरपंचांना मार्गदर्शन

- मंत्री संदिपान भुमरे.

            मुंबई, दि. 13 : रोजगार हमी आणि फलोत्पादन योजनांची गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर सरपंचांना मार्गदर्शन करण्याकरिता ‘सरपंच मार्गदर्शन कार्यक्रम’ घेण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.


             महाराष्ट्रातील रोहयोंच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात राज्यातील सरपंच प्रतिनिधींबरोबर मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.भुमरे म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे सुरू आहेत. पानंद रस्ते, विहिरींना मंजुरी देण्यात येत आहे. अनेक उपक्रमांचे नियम व अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. सरपंचांनी शासन निर्णयांचा अभ्यास करावा. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी रोहयो अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. भुमरे यांनी सरपंचांना दिल्या.


            रोजगार हमीची बिले वेळेत उपलब्ध करण्यात यावीत. अकुशल कामांची दर आठवड्याला तर कुशल कामांची बिले एक महिन्याच्या आत मिळावीत. कुशल कामांच्या बिलांच्याबाबतीत आढावा तसेच थकीत बिलांचा आढावा घेऊन ती अदा करण्यात यावीत.


            खोट्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत व्हावी यासह इतर समस्या सरपंच शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केल्या. त्यावर मंत्री श्री भुमरे यांनी राज्य शासनाच्या स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.


            या बैठकीस पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणचे

जी-20 परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

 जी-20 परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

 

            मुंबईदि. 14 : जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.

            महाराष्ट्र राज्य समूह विकास योजना  तसेच  उद्योग विभागाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेले हे उद्योग आहेत. यावेळी प्रतिनिधींना औरंगाबादची हिमरू शाल भेट म्हणून प्रदान करण्यात आली. चार स्टॉलमध्ये सात कलांचे प्रदर्शन असूनपैठणी साडीहिमरू शालबंजारा कलाकुसरच्या वस्तूकोल्हापुरी चप्पलहुपरी दागिनेसांगली-मीरजेची संगीत उपकरण तयार करणारे समूहबिद्री कलाकुसर यांचा समावेश आहे.

            प्राचीन कला आणि हस्त कलेवर आधारित कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या उद्योजकांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल लावले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वातउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेउद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनात राज्याची गौरवशाली परंपरा जागतिक पातळीवर नेण्यासाठी या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल उभारले आहे.

Featured post

Lakshvedhi