Thursday, 15 December 2022

जी-20 परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

 जी-20 परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

 

            मुंबईदि. 14 : जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.

            महाराष्ट्र राज्य समूह विकास योजना  तसेच  उद्योग विभागाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेले हे उद्योग आहेत. यावेळी प्रतिनिधींना औरंगाबादची हिमरू शाल भेट म्हणून प्रदान करण्यात आली. चार स्टॉलमध्ये सात कलांचे प्रदर्शन असूनपैठणी साडीहिमरू शालबंजारा कलाकुसरच्या वस्तूकोल्हापुरी चप्पलहुपरी दागिनेसांगली-मीरजेची संगीत उपकरण तयार करणारे समूहबिद्री कलाकुसर यांचा समावेश आहे.

            प्राचीन कला आणि हस्त कलेवर आधारित कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या उद्योजकांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल लावले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वातउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेउद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनात राज्याची गौरवशाली परंपरा जागतिक पातळीवर नेण्यासाठी या प्रदर्शनात उद्योग विभागाने स्टॉल उभारले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi