Sunday, 11 December 2022

पहेचान कौन है ?*

 Binod Rai 

*पहेचान कौन है ?*

इसका जवाब एक जानकार *राजनैतिक वैद्य* ने बड़ा सुंदर समझाया।

आयुर्वेद और मेडिकल सांईस में *शहद* को अमृत के समान माना गया हैं।

लेकिन आश्चर्य इस बात का है कि शहद को अगर *कुत्ता* चाट ले तो वह मर जाता हैं। 

यानी जो मनुष्यों के लिये अमृत हैं वह शहद *कुत्तों* के लिये जहर है।

शुद्ध *देशी गाय के घी* को आयुर्वेद और मेडिकल सांईस औषधीय गुणों का भंडार मानता हैं।

मगर आश्चर्य, गंदगी से प्रसन्न रहने वाली *मक्खी* कभी शुद्ध देशी घी को नहीं खा सकती।

गलती से अगर *मक्खी* देशी घी पर बैठ कर चख भी ले तो वो तुरंत तड़प तड़प कर वहीं मर जाती है।

आर्युवेद में *मिश्री* को भी औषधीय और श्रेष्ठ मिष्ठान्न माना गया हैं।

लेकिन आश्चर्य, अगर *गधे* को एक डली मिश्री खिला दी जाए, तो कुछ समय में उसके प्राण पखेरू उड़ जाएंगे।

यह अमृत समान श्रेष्ठ मिष्ठान, मिश्री *गधा* कभी नहीं खा सकता हैं।

*नीम* के पेड़ पर लगने वाली पकी हुई निम्बोली में कई रोगों को हरने वाले औषधीय गुण होते हैं।

आयुर्वेद उसे *"उत्तम औषधि"* कहता हैं।

लेकिन रात दिन नीम के पेड़ पर रहने वाला *कौवा* अगर निम्बोली खा ले तो उस कौवे की मृत्यु निश्चित है।

मतलब, इस धरती पर ऐसा बहुत कुछ हैं... जो हमारे लिये अमृत समान हैं, गुणकारी है, औषधीय है... 

पर इस धरती पर ऐसे कुछ जीव ऐसे भी हैं जिनके लिये वही *अमृत... विष है।*


*नेताजी वही गुणकारी अमृत औषधि है।*

लेकिन कुत्तों *(आतंकवादी-दंगाई),*

मक्खियों *(देशद्रोही-गंदगी),*

गधों *(वामपंथी सोच-राजनैतिक मूर्ख)*

और 

कौवों *(स्वार्थी कपटी मीडिया)* आदि के लिये... विष समान है।

इसलिये यह कुछ तत्व इतने भयभीत है

 *आपसे निवेदन करता हूं इस पोस्ट को सभी ग्रुप मे भेजिये | सादर धन्यवाद 

 *देश सर्वोपरि हे थोड़ा समय निकालकर पोस्ट जरूर पढ़ें।* 🇮🇳🌹मोदी हैं तो मुमकिन है।

    योगी है तो हड़कंम्प है |


https://kutumbapp.page.link/16nvSaANH7NuRVBr8?ref=1DWPD

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


*कम से कम पांच ग्रुप मैं जरूर भेजे*https://kutumbapp.page.link/16nvSaANH7NuRVBr8?ref=1DWPD


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

निबंध स्पर्धा

 


पाचवी पासपासून बीई, एमबीए पदवीप्राप्त उमेदवारांना मिळाली रोजगाराची संधी

 पाचवी पासपासून बीई, एमबीए पदवीप्राप्त उमेदवारांना मिळाली रोजगाराची संधी

मुंबईत महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील

९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न

कौशल्य विकासाबरोबर रोजगार उपलब्धतेला प्राधान्य


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


मुंबई, दि. १० : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळील राणीबाग मैदानात आज झालेल्या महारोजगार मेळाव्यात अगदी पाचवी पास उमेदवारांपासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पाचवी पास विद्यार्थ्यांसाठी डिलीव्हरी एक्झिक्युटीव्हच्या कामासाठी ३ हजार पदे उपलब्ध करुन देण्यात आली. होमकेअर नर्ससाठी एका कंपनीने २०० पदांसाठी मुलाखती घेतल्या. विविध कंपन्यांनी अशा एकूण ९ हजार २७८ पदांसाठी आज मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला.


कौशल्य विकास विभागांतर्गत मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित या मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरी इच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. याप्रसंगी माजी नगरसेविका सुरेखा लोखंडे, कौशल्य विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.


राज्यात होणार ३०० रोजगार मेळावे


मंत्री श्री. लोढा म्हणाले की, आमच्या विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबईमध्ये मागील ८ दिवसात हा दुसरा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार - मंत्री दीपक केसरकर


शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यात उद्योग आणण्याबरोबरच तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. १ लाख ४० हजार नोकऱ्यांसाठी राजभवन येथे विविध कंपन्यांबरोबर नुकतेच सामंजस्य करार करण्यात आले. ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शालेय शिक्षण विभाग पुढाकार घेत आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस, एचसीएल, ॲमेझॉनसारख्या नामांकीत संस्था, कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात येत आहेत. आपल्या देशात युवक लोकसंख्या अधिक आहे. कुशल माणसाला जगभरात मागणी आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकासासाठी राज्य शासनाने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत या कामात व्यापक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


ऑफिस बॉयपासून कौन्सेलर पदापर्यंतच्या जागांसाठी मुलाखती


पाचवी पास, दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, डीएड, बीएड पदवीधारक, एमबीए अशा विविध पात्रताधारकांसाठी मेळाव्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. बीपीओसाठी विविध प्रादेशिक भाषा जाणणारे उमेदवार, बँक जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्विस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाउसकीपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. घरबसल्या काम करण्यासाठीही रेसिडेन्ट जिओ असोसिएटसारख्या पदांकरीता काही कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.


मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग


एअरटेल, रिलायन्स जिओ, अपोलो होम हेल्थकेअर, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हीसेस, टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, कल्पवृक्ष स्टाफींग सोल्युशन्स, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, हिंदू रोजगार डॉट कॉम, पियानो प्रेसिडेल, केव्हीजी स्टाफींग सोल्युशन आदी कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.


स्वयंरोजगारविषयक विविध योजनांचे मार्गदर्शन


याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकासमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

Saturday, 10 December 2022

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मानव हक्क दिन साजरा

 राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मानव हक्क दिन साजरा.

समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ऱ्हास होणे चिंताजनक.

                                        - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई,दि.१० : एकीकडे समाज सुशिक्षित होत आहे, शिक्षणाचा स्तर वाढत आहे. मात्र दुसरीकडे मानवी मूल्यांचा ऱ्हास होत आहे. हा मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारांना महत्त्व दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

            राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले.


            कार्यक्रमाला आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) कमलकिशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या.सत्यरंजन धर्माधिकारी, आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे व एम. ए.सईद, आयोगाचे सदस्य सचिव रवींद्र शिसवे तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.


            भारतामध्ये नारी शक्तीला देवीचे स्थान दिले आहे. परंतु आज संस्कारांच्या अभावी महिलांशी दुर्व्यवहार केला जातो, हे खेदजनक आहे. महिला व मुलांवर संकट आले असताना लोक मदतीला धावण्याचे साहस न दाखवता बघ्याची भूमिका घेऊन फोटो काढत असतात. या पार्श्वभूमीवर महिला, अपंग, लहान मुले यांच्या अधिकारांप्रती समाजाने अधिक सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारतीय जीवन पद्धतीमध्ये केवळ मनुष्यमात्रांच्या कल्याणाचा विचार केला नाही तर, पशुपक्षी, झाडे वनस्पती व इतकेच नव्हे तर नदी, सरोवरे यांच्या देखील कल्याणाचा विचार केला आहे. सर्व प्राण्यांमध्ये विवेक बुद्धी केवळ मनुष्याला मिळाली असल्यामुळे माणसाने उपेक्षित समाज बांधवांच्या हक्काचा विचार केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. राज्य मानवाधिकार आयोग आपले काम निष्ठेने करताना ते अधिक लोकाभिमुख करण्याकरिता जनजागृती करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड यांचे अभिनंदन केले.

            मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी लागणारे अधिकार म्हणजे मानवाधिकार अशी व्याख्या करताना नागरिकांनी आपल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्याबद्दल देखील जागरूक राहिले पाहिजे असे न्या सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सांगितले. मानवाधिकार दिवस केवळ १० डिसेंबर या दिवसापुरता मर्यादित न राहता तो आयुष्याचा भाग झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष न्या. तातेड यांनी मानवाधिकार आयोगाने केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी 'अमर रहे मानवाधिकार' या नाट्याचे देखील सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आरोग्य अधिकार या विषयावरील टाटा समाज विज्ञान संस्थेच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

000

Governor Koshyari participates in Human Rights Day

          Governor Bhagat Singh Koshyari attended the International Human Rights Day celebrations organised by the Maharashtra State Human Rights Commission at Raj Bhavan Mumbai.

          Chairman of the Commission Justice (Retd) K K Tated, former Judge of the Bombay High Court Justice (Retd) S C Dharmadhikari, Members of the Commission B.D. More and M A Sayeed, In-Chage Secretary Ravindra Shisve, invitees and university students were present

राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना पुरस्कार प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना पुरस्कार प्रदान

            मुंबई,दि.१० : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू सुब्रमण्यम स्वामी यांना 'हिंदुत्वाचे आधारस्तंभ' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे येथे करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संस्थापिका व पत्रकार डॉ वैदेही तमन तसेच संतसमुदाय उपस्थित होता. 

            भारत पूर्वीपासून अध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे मनुष्य जीवनाचे सार्थक आहे, ही येथील संतांची शिकवण राहिली आहे. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी साक्षात परमात्म्याचे दर्शन घडवले. त्याप्रमाणे देशातील संत समाज देशाला दिशा दाखवून भारताला पुन्हा एकदा जगद्गुरू करतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. 

            यावेळी उपस्थित संत समाजापैकी सद्गुरू नारायण महाराज, गहिनीनाथ महाराज औसेकर, स्वामी कर्मवीर, स्वामी गिरीशनंद सरस्वती, महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन व डॉ उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना देखील राज्यपालांच्या हस्ते 'हिंदुत्वाचे आधारस्तंभ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्गुरू रितेश्वर महाराज यांच्या वैदेही तमन यांनी लिहिलेल्या जीवनचरित्राचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

000

सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

 सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख


            मुंबई, दि. १० : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण आवाज व ठसकेबाज शब्दफेकीमुळे सुलोचनाताईंनी अनेक लावण्या व गीते अजरामर केल्या. त्यांचा स्वर वर्षानुवर्षे लोकांच्या मनात घोळत राहील यात शंका नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे सुपुत्र श्री विजय चव्हाण व इतर कुटुंबियांना कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


000

Governor Koshyari condoles demise of Sulochana Chavan


            Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of renowned Lavani singer Smt Sulochana Chavan in Mumbai. In a condolence message to her son Shri Vijay Chavan, Governor Koshyari wrote: "Smt Sulochanatai Chavan was the undisputed Queen of lavani. She infused life in the poetry and immortalized many lavanis on the strength of her unique voice and diction. Her beautiful voice will live on for many more years. I offer my homage to the great singer and convey my condolences to Shri Vijay Chavan and other members of the bereaved family."


000



सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज : राज्यपाल भगतसिंग कोशियारी

 


सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज : राज्यपाल भगतसिंग कोशियारी


राजभवनात पार पडले व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेबसाईटचे लोकार्पण तथा पदग्रहण सोहळा


मुंबई, दि. ७ : सध्याच्या काळात पत्रकारितेचे व्रत कठीण आहे. तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे पत्रकारितेचे काम सध्या झाले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया, वेब पोर्टल आदी माध्यमांचा सदुपयोग आणि उपयोग यातील फरक समजून घेतला पाहिजे सध्याच्या युगात सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता नितांत गरजेची आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी केले. जर बी चांगले असेल तर झाड चांगलं होते आणि झाड चांगलं असेल तर त्याची फळेही चांगले येतात याच दृष्टिकोनातून मीडियाचे काम राज्यभरासाठी आणि देशभरासाठी चांगले आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून पत्रकारितेची एक चांगली पिढी तयार होईल, पत्रकारांचा एक नया आगाज यहा से होगा अशा विश्वास देखील यावेळी राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला


राजभवनातील जलविहार सभागृहात पार पडलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’वेबसाईट उद्घाटन समारंभ तथा पदग्रहण सोहळ्याला संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने व संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 यावेळी राज्यपालांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये सारिका महोत्रा, आरोग्य सेलचे राष्ट्रीय संचालक दिनेश मुतुला, राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील व उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हरून अ. कादिर खाटीक यांचा समावेश होता.


प्रारंभी श्री पुप्पाला यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या योजनांची माहिती दिली, तर प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी ही संघटना देशभरातील २० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली असल्याचे सांगितले, पत्रकारितेला नवा आयाम देण्याचे काम व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना देशभर करेल असा विश्वास देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला.


सुरुवातीला राज्यपाल महोदयांनी दीप प्रज्वलन केले तसेच राष्ट्रगीताने सुरू झालेला या कार्यक्रमाचा समारोप देखील राष्ट्रगीताने झाला.


प्रसंगी ऋषिकेश जोशी जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले संघटनेच्या कार्यालय सचिव दिव्या पाटील यांनी आभार मानले.


राज्यपालांना भावली शपथ


व्हाट्सअप मीडियाच्या वतीने यावेळी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांना नितीन मुले जपण्याची व राष्ट्रभावना वाढीस लागण्या संदर्भात कार्य करण्याची शपथ देण्यात आली राज्यपाल व शहरी यांना ही शपथ खूपच आवडली त्यांनी ही शपथ केवळ पत्रकारिते पुरती मर्यादित नसून ती समाजातील सर्व घटकांना लागू पडते अशा शब्दात गौरव केला.


पत्रकारांनी मारला राजभवनाला फेरफटका


संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध वृत्तपत्रांचे 150 पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अडीच तास राजभवनाच्या परिसरातील विविध वास्तू व निसर्ग सौंदर्याची पत्रकारांनी पाहणी केली.


 ………………………..


फोटो ओळ: ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वेबसाईट उद्घाटन समारंभ तथा पदग्रहण राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने व संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील व उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हरून अ. कादिर खाटीक यांचा समावेश होता.




नमस्कार,कृपया सदर बातमी आपण आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी.


दिव्या पाटील


(कार्यलयीन सचिव, व्हाईस ऑफ मिडिया)


९८६७४५४१४४


 ......................................

Featured post

Lakshvedhi