Friday, 9 December 2022

पत्रकारांनी शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी

 पत्रकारांनी शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी :

वृत्तांकनात निर्भिडता असावी

            मुंबई, दि. 8 : व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा असावा, निर्भीडता असावी, राष्ट्रभाव असावा. परंतु खोडसाळपणा नसावा, असे सांगताना पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.


            'व्हॉइस ऑफ मिडिया' या प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेतस्थळाचे उदघाटन तसेच पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 7) राजभवन येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांनी संघटनेच्या सदस्यांना संविधानाच्या कक्षेत काम करण्याची तसेच पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रतिज्ञा दिली.


            पत्रकारिता करणे म्हणजे धारदार शस्त्रावर चालण्यासारखे कठीण काम आहे असे सांगून आज डिजिटल माध्यमे व समाजमाध्यमे आल्यामुळे माध्यमांचा सदुपयोग तसेच दुरुपयोग देखील होताना दिसतो, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले. माध्यम प्रतिनिधींनी राज्य घटनेच्या चौकटीत राहून काम करण्याची जी प्रतिज्ञा केली तशीच प्रतिज्ञा देशातील सर्व नागरिकांनी घेऊन त्यांनी देखील देशासाठी समर्पित भावनेने काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.


            व्हॉइस ऑफ मिडिया ही संघटना 21 राज्यात पसरली असून 18 हजार माध्यम प्रतिनिधी संस्थाना जोडले गेले असल्याचे संस्थापक संदीप काळे यांनी सांगितले. संस्थेची केवळ संख्यात्मक वाढ न करता संस्थेच्या माध्यमातून सक्षम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मल्टीमिडीयामध्ये काम करणारी पत्रकारांची चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.


कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला तसेच संस्थेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor inaugurates website of Voice of Media

            Mumbai 8 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the website launch and Induction Ceremony of office bearers of 'Voice of Media' a nationwide organisation of media persons at Raj Bhavan Mumbai on Wed (7 Dec). The Governor gave the pledge of upholding the Constitution and preserving the values of journalism to the members on the occasion.


            Founder of 'Voice of Media' Sandeep Kale, National General Secretary Chandramohan Puppala, State President Raja Mane and members of the National and State executive of the organisation were present.


Speaking on the occasion, the Governor asked media persons to uphold the values of journalism and shun sensationalism and emotionalism.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग निकाल

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित,गट-ब राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर.

            मुंबई, दि.८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ व २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट - ब मुख्य परीक्षा - २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण ६०९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन जाहीर करण्यात आला आहे.


            या परीक्षेमध्ये औरंगाबाद जिल्हयातील पडुळ अक्षय दिवाण हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून सांगली जिल्हयातील नम्रता ज्ञानदेव म्हस्के ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून जळगांव जिल्हयातील अक्षय अनिल परदेशी हे राज्यात प्रथम आले आहेत.उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे.


000

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) तांत्रिक सहायक,

विमा संचालनालय,संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

            मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

          या परीक्षेमध्ये सांगली जिल्हयातील मंजूनाथ गोपाळ पाटील हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीतून हिंगोली जिल्हयातील ओमेश किसन पायघन प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्हयातील श्रीमती अंकिता सुरेश पाचंगे ह्या प्रथम आल्या आहेत.उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

 अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


00000




G 20स्वागतासाठी सजतेय 'आपली मुंबई'

 G 20स्वागतासाठी सजतेय 'आपली मुंबई'


              मुंबई, दि. 8 :- देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेले मुंबई शहर जी -20 परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.


          जी 20 परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. रात्रीच्या वेळेस लखलखणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात मरीन ड्राईव्ह परिसर उजळून निघतो. या भागात जी20 परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनीधींचे मुंबईत स्वागत आहे, अशा आशयाचे फलक दिसून येत आहेत. 


          'वसुधैव कुटुंबकम', 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या आशयाचे घोष वाक्य लक्ष्य वेधून घेत आहेत. या फलकांवर मुंबई शहराची ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा गुंफा, फ्लोरा फाऊंटन, हॉटेल ताज, वांद्रे- वरळी सी लिंक, वारली चित्रशैलीची छायाचित्रे आकर्षक रंगसंगतीत दिसून येत आहेत.


   याशिवाय भारत हा लोकशाहीची मातृभूमी असलेला देश आहे. जी 20 परिषदेचा यजमान देश, मोठी जबाबदारी - मोठी महत्त्वाकांक्षा अशी घोषवाक्यही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


००००

फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार

 फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार


- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. ८ : सन २०२१ साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.


            साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. नक्षलवाद मोडून काढणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.


            “नक्षलवाद्यांमधील १०० टक्के भरती ही आदिवासी बांधवांमधून होत होती, ती बंद झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरी नक्षलवाद जो केला जातो, आपण जसे काही जगावेगळे करत असल्याचे भासवून जे साहित्य लिहिले जाते आणि यात काही लोक सहभागी होतात अशांना समाज क्षमा करु शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत नक्षलवादाचे उदात्तीकरण हे राज्य शासनाकडून होऊ शकत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशीनंतर काय कारवाई करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल’’, असे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.



Ye हैं जिन्दगी

 *जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते . आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते.*

*माणसं जितकी शरीराने थकत नाहीत,तितकी ती विचारांनी थकतात*.

*आणि*

*विचार देखील स्वतःचे नाही*.

*दुसऱ्यांचे विचार करून*.

*डोक्यावर ओझे घेण्याची सवय माणसाला थकवत असते*

*🙏🏿सुप्रभात🙏🏿*

पुस्तक वाचा



 

जिंदगी इतफाक हैं








 

Featured post

Lakshvedhi