Saturday, 26 November 2022

येथे माझे कर जुळती

 






जपानी माणसांकडून खुप शिकण्या सारखं आहे

 फुटबॉल विश्व चाषकाचा उद्घाटन सामना संपला .जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम साफ करायला सुरुवात केली.यजमान कतार च्या प्रेक्षकाने त्यांना आश्चर्याने विचारले ." तुम्हीं का हे करताय ? कामगार येतील ना !"

 जपानी प्रेक्षक म्हणाले 

" आमच्या देशाने आम्हांला हे शिकवलंय. "

   असं म्हणंत त्यांनी सार स्टेडियम साफ केलं.कतार च्या यजमान प्रेक्षकांस प्रेमळ आलिंगन द्यायला देखील ते विसरले नाहीत.

   भारतीय प्रेक्षकासाठी टायटलस मुद्दाम भाषांतरित केलेत.

 जपानी माणसांकडून खुप शिकण्या सारखं आहे.

 त्यांना उगीच फिनिक्स पक्षी म्हणत नाहीत .

  राखे तून उठून ते झेपावले


आहेत.

गोवर संसर्ग ; पाच वर्षांखालील मुलांवर विशेष लक्ष द्यावे

 गोवर संसर्ग ; पाच वर्षांखालील मुलांवर विशेष लक्ष द्यावे

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचना

            मुंबई, दि. २५ : गोवर संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी. तसेच जिल्हानिहाय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करुन पाच वर्षांखालील बालकांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.


            यावेळी आरोग्य विभागामार्फत राज्यभरात शहरी तसेच ग्रामीण भागातील उपाययोजनांसंदर्भातील माहिती त्यांनी जाणून घेतली.


            सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गोवरचे वाढते प्रमाण लक्षात घेता याकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्यात यावे. आरोग्य विभागातील वेगवेगळ्या टीम तयार करून तात्काळ सर्व्हेक्षण करावे. प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हानिहाय कृती दल कार्यान्वित करावे.


            गोवरचा संसर्ग जास्त असणाऱ्या भागांमध्ये Vitamin ‘A’ + MR 1 & MR 2 चे डोसेस देण्यात यावेत. सर्व परिस्थितीचा दररोज आढावा घ्यावा. उपचार घेत असलेल्या मुलांचे विलगीकरण करणे, कुपोषित मुलांची माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.


            गोवरचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात यावे व गोवर संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासंदर्भातील सूचना आरोग्य विभागाला दिल्या.


            लसीकरण विषयीच्या जागृतीसाठी विविध धर्मगुरू, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, लोकप्रतिनिधी अशा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.


            या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार, महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, भिवंडी, महानगरपालिका आयुक्त व संबंधित अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


०००

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली

 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

            मुंबई, दि. 26 : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.


            पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट वे ऑफ इंडिया येथे 26/11 हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


            या कार्यक्रमात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.


            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यासह देशाच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वार झालेला हल्ला आहे. हा हल्ला परतविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा दलातील वीर शहिदांप्रती सहसंवेदना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आज आपण मोठ्या संख्येने येथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत, असे ते म्हणाले.


            ज्या समाजात वीरांचा सन्मान होतो तोच समाज प्रगती करतो. पोलीस, सुरक्षा कर्मचारी आपले कर्तव्य अविरतपणे बजावत असतात. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही समाजात वावरतांना अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांबाबत सुरक्षिततेच्यादृष्टिने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. या निमित्ताने आपण सर्वजण सदैव सतर्क राहण्याचा निर्धार करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केले.


उपमुख्यमंत्र्यांकडून कमांडर सुनील जोधा यांचा सन्मान


            26/11 च्या ताज हॉटेलवरील हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या नेतृत्त्वात झालेल्या ऑपरेशनमध्ये कमांडर सुनील जोधा यांनी 7 गोळ्या अंगावर झेलून ताज हॉटेलमधील नागरिकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्‍न केले होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सुनील जोधा यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कमांडर श्री.जोधा यांनी आजही एक गोळी त्यांच्या शरीरामध्ये असल्याचे यावेळी सांगितले.


शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई ‘शहीद दौड’


            26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई मशालीसह ‘शहीद दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथील सुमारे 25 तरुणांनी या हल्यातील शहिदांना या वेगळ्या उपक्रमातून श्रद्धांजली वाहिली. 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांसाठी केलेल्या या विशेष उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी तरुणांचे कौतुक केले.

            या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


००००





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन.

समता पर्वचा प्रारंभ, सहभागाचे आवाहन.

            मुंबई, दि. २६:- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांत सहभागाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ग्रामसडक योजनेचा राज्यस्तरीय आढावारस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा

 ग्रामसडक योजनेचा राज्यस्तरीय आढावारस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा

- मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि 25 : ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होणारे रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. यात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड करू नये. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले.


            प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन्ही योजनांची राज्यस्तरीय आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीना, योजनेचे सचिव खंडेराव पाटील, मुख्य अभियंता संभाजी माने तसेच मंत्रालयीन अधिकारी व क्षेत्रीय अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.


            अति ग्रामीण, आदिवासी भागात कामाला विशेष गती देण्याबरोबरच कामाकरिता निधी उपलब्ध असताना याकामास प्रशासकीय दिरंगाईमुळे विलंब होऊ नये. यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे देखील वेळेवर पूर्ण करण्याबाबत सूचना मंत्री श्री.महाजन यांनी संबंधितांना दिल्या. वन विभागातील अडचणी, भाव वाढ फरक याबाबत सुसूत्रता आणण्याबाबतच्या सूचनाही श्री.महाजन यांनी केल्या. यावेळी योजनेच्या सद्यस्थिती बाबत सादरीकरण करण्यात आले तर मुख्य अभियंता संभाजी माने यांनी आभार प्रदर्शन केले.


000

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार

 नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी

27 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार


-संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था


            मुंबई, दि. 25: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबईचे संचालक डॉ. के. एस जैन यांनी दिली आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडेमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी दि. 4 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असा होता. आता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.


             ही प्रवेश परीक्षा दि. 4 डिसेंबर 2022 रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार असून याबाबतची सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. के. एस जैन यांनी केले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi