Friday, 25 November 2022

सिक्युरिटी पोस्ट


 

जिंदगी

 *🌹कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे!*

*नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे?*

*जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही,*

*पाप विचारात असतं, शरीरात नाही!*

*आणि गंगा शरीर धुते, विचार नाही . . . . !!!!!*


     *||💐शुभ 💐||*

संविधान दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान.

 संविधान दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान.

            मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक तसेच निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे माहितीपर व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शुक्रवार दि. 25 व शनिवार दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


            भारतीय संविधानाचे वेगळेपण, देशभरात साजरा केला जात असलेला संविधान दिन, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश तसेच संविधानाची वैशिष्ट्ये, भारतीय राज्य घटनेची उद्देशिका याबाबतची सविस्तर माहिती श्री. खोब्रागडे यांनी 'दि

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य

 मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य

दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला

जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे 

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बेस्टसाठी इलेक्ट्रीकल बसेस, कौशल्य विकास प्रकल्प, पोक्रा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत 

            मुंबई, दि. 24 : राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून, त्यासाठी जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.


            जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळात शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मोजुमदार, झियांग वाँग सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.


            आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रीक बसेस याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


            राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बॅंकेचे अर्थसहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


            पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध होईल तसेच लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            यावेळी अपर मुख्य सचिव श्री. कपूर, प्रधान सचिव श्रीमती वर्मा, श्री. गुप्ता, श्री. डवले यांनी आपापल्या विभागाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.


००००

स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल

 स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट


            मुंबई, दि. 24 : ‘स्मार्ट’ प्रकल्प हा राज्यातील कृषि क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे. राज्यातील कृषिक्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची आज राजभवन येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.


            यावेळी शिष्टमंडळातील शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मुजुमदार, झियांग वाँग या सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंपदा विभागाचे सचिव राजन शहा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोक्रा - 2 हा जवळपास 600 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूक प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. कृषि क्षेत्रासाठी राज्यात स्वतंत्र फिडर असून या फिडर्सचे सोलरायझेशन करण्यात येत आहे. कृषि क्षेत्रामध्ये राज्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) येणाऱ्या गावांमधील देखील कृषि फिडर्स सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे .


            राज्यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकासाच्या विविध योजनांची ‘मित्रा’ या संस्थेशी समन्वयाने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. वातावरणीय बदलामुळे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात, तर काही भागाला अवर्षणाचा सामना करावा लागतो. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुराचे पाणी अवर्षणग्रस्त भागात वळवण्याचा राज्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत कृष्णा नदी पात्रातील पुराचे पाणी भीमा नदीच्या पात्रात वळवण्याचा विचार आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील 14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुरामुळे कोल्हापूर, सांगली भागातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, या भागातील कृषि क्षेत्राला ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, पोक्रा योजना,जलसंपदा प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जळगाव विमानसेवेसाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी दिली जाईल - ज्योतिरादित्य सिंधीया

 जळगाव विमानसेवेसाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी दिली जाईल - ज्योतिरादित्य सिंधीया


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांना आश्‍वासन


मुंबई ः जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी नवीन विमान कंपनीला जबाबदारी देऊन लवकरात लवकर विमानसेवा सुरू केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ललित गांधी यांना दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाम. ज्योतिरादित्य सिंधीया यांची त्यांच्या कोल्हापूर दौर्‍यात भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्‍नांसंबंधी निवेदन देऊन चर्चा केली त्या प्रसंगी ते बोलत होते.

विशेषतः जळगाव विमानसेवा सुरू करणे, नाशिक येथुन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करणे, औरंगाबाद पूणे हवाई सेवा, कोल्हापूर येथुन नवीन विमानसेवा मार्ग, अकोला, रत्नागिरी, चिपी विमानतळाबाबतही चर्चा करण्यात आली.

सोलापूर विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी असलेल्या अडचणी दुर करण्याची मागणीही ललित गांधी यांनी केली.

केंद्रीय मंत्री नाम. ज्योतिरादित्य सिंधीया या संदर्भात नवी दिल्ली येथे चेंबरच्या पदाधिकार्‍यांसमवेत लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे सांगितले.

यावेळी खासदार धनंजय महाडीक, समरजित घाटगे, सतीश माने,

एमएडीसी आणि एमआयडीसीमार्फत विमानतळांचा विकास करणार.

 एमएडीसी आणि एमआयडीसीमार्फत विमानतळांचा विकास करणार.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यामार्फत संयुक्तिकरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे; याचबरोबर अमरावती बेलोरा विमानतळांवर रात्री विमान उतरण्याची सुविधा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे एमएडीसी, उद्योग व नगरविकास विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, पायाभूत सुविधा वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रतिभा भदाणे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुरंदर विमानतळासंदर्भात तालुक्यातील परवानगी प्राप्त जागा निश्चित करुन तातडीने त्याचे अधिग्रहण करावे. शिर्डी विमानतळाचा प्रमुख विमानतळात समावेश झाल्याने केंद्र सरकारकडून विकासासाठी निधी प्राप्त होणार आहे. ३५० कोटी रूपये खर्च करून या विमानतळाचा विस्तार करावा, तसेच प्रवासी सुविधा तत्काळ निर्माण करावी, असेही ते म्हणाले. याचबरोबर, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, कराड, गोंदिया येथील विमानतळाच्या विकासासंदर्भातील कामे जलदगतीने करावी, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


०००

Featured post

Lakshvedhi