Friday, 25 November 2022

खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांचीनिर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे

 खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांचीनिर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            नाशिक, दि. 24 (जिमाका) : केंद्र आणि राज्य शासन परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या योजना राबवित आहे. शासनाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी समाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एक्स्पोच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याच्या स्वप्नातले घर मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


            नाशिक मध्ये उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित गृह प्रदर्शन शेल्टर 2022 चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फरदे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, कृणाल पाटील, गौरव ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष किरण चव्हाण, ललित रूंगठा आदी मान्यवर व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काच घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रसेर असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


वाढत्या उद्योग व्यवसायांमुळे घरांच्या मागणीत वाढ


            समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी विविध संस्थांना भूखंडासाठी भाडे आकारणीचा नियम बदलल्याने या संस्थांना आर्थिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र भाडे आकारण्यात यावे, यासाठी नियमात सुधारणा करण्याकरिता निर्देश देण्यात आले आहे. तसेच मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिककडे विकसित शहर म्हणून पाहिले जात आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकची विकसनशील उद्योगनगरी म्हणून ओळख आहे. ज्या शहरांमध्ये उद्योग व्यवसायांचा विस्तार वाढतो तिथे घरांची मागणी वाढते आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.


बांधकाम क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन प्रयत्नशील


            नाशिक पर्यटन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विस्तारत आहे. त्यामुळे सुनियोजित विकासाची संधी नाशिकला आहे. नाशिकला वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा उच्च शिक्षणासाठीचे सर्व प्रकारचे महाविद्यालये वाढत आहेत. त्यामुळे साहजिकच नाशिककडे लोकांचा ओढा वाढतोय. नाशिक शहर व परिसरातील धरणांमुळे शेतीसाठी पाणी मुबलक असल्याने ॲग्रो इंडस्ट्रीही जोमाने उभी राहत आहे. दळणवळणाच्यादृष्टीने नाशिक शहर मध्यवर्ती असून शहरातील पायाभूत सुविधा दर्जेदार आहेत. पुणे- नाशिक अतिजलद रेल्वेचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करावा, अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्र हे रोजगार निर्मिती करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.


नाशिकचा विकास करतांना क्रेडाईचाही सहभाग घेतला जाईल - पालकमंत्री दादाजी भुसे


            गृह प्रदर्शन शेल्टर 2022 ने नाशिकच्या नावलौकिकात भर टाकली आहे. कारण शेल्टर हा उपक्रम नाशिक पुरता न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला आहे. नाशिक शहराच्या विकासाबाबत निर्णय घेत असतांना क्रेडाईलाही सहभागी करून घेण्यात येईल. जेणेकरून क्रेडाईच्या सदस्यांच्या अभ्यासाचा व अनुभवाचा नाशिकला फायदा होईल. येणाऱ्या कुंभमेळ्यात केंद्र सरकार व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून नाशिकच्या विकासाची कामे केली जातील. तसेच सर्वांच्या सहकार्याने नाशिकचा सर्वांगीण विकास करण्यात येईल,अशी ग्वाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.


            जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सर्वेक्षण अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.


            यावेळी खासदार हेमंत गोडसे व महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून गृह प्रदर्शन शेल्टर 2022 ला शुभेच्छा दिल्या.


00000



वेळ द्या

 *जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत रहा...!!*



   *"कदाचित" उद्या वेळ असेल पण आपलेच नसतील...!!*



     

जिवन ऐसे नाव

 *मागुन ढकलणारी व्यक्ती हत्तीला टृकमध्ये बसवू शकते असे आजिबात नाही; पण यातूनच हत्तीला कळते की माझ्या मागे कोणीतरी आहे, जो मला मदत करत आहे. आणि या भावनेने हत्ती टृकमध्ये चढतो. कधी-कधी आपल्यालाही असाच आधार हवा असतो. त्यामुळे एकमेकांना मदत करत रहा. हे परस्पर सहकार्य एकमेकांमध्ये आत्मविश्वास भरून काढते; आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्ती प्रत्येक अडचणीवर मात करु शकते. म्हणून समर्थन ही खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात एकमेकांना साथ देत राहू.* 🌸🙏🙏Shubh sakaal 🙏🙏🌸

बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

 बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

            नवी दिल्ली, 24 : स्वकष्टाने उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची स्टॉल धारकांनी प्रतिक्रिया दिली.

            येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून सहभागी झाला आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन आहे. या दालनात बचत गट, लघु उद्योजक, विविध वस्तू उत्पादन समूह केंद्रांच्यावतीने लावलेला आहे.

असे आहे महाराष्ट्र दालन


             महाराष्ट्र दालनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा आहे. येथे स्वागतासाठी तुतारी वादक आहेत. विविध विभागाकडून राज्याचा होत असलेला सर्वांगीण विकास दर्शविण्यात आला आहे. दालनाच्या मधल्या भागात इलेक्ट्रीकल ऑटो, दुचाकी, भारतीय नौदलाला लागणारे सुटे भाग, फिरत्या पृथ्वीची प्रतिमा, पैठणी परिधान केलेली महिलेची प्रतिमा असे दालनाचे रूप आहे. दालनाच्या बाहेरच्या बाजूस इलेक्ट्रीकल चारचाकी वाहन आहे. येथे राज्याच्या उद्योग वाढीचा आलेख दिसत आहे यासोबतच बचत गट, वस्तू उत्पादन समूहाअंतर्गत विविध उत्पादित वस्तूंची दालने मांडण्यात आलेली आहेत.


            सांगलीची हळद, मनुके, जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या केळींचे विविध पदार्थ, औरंगाबाद जिल्ह्याची साखळी हस्तकला, बंजारा हस्तकला, कोल्हापूरच्या चपला, दागिने, मुंबईतून आलेल्या समूहाची लेदर बॅग आणि कापडी बॅगचे स्टॉल्स आहेत.


            सांगलीच्या हळदीला, आणि जळगावच्या केळींना भौगोलिक मानाकंन (जियो टॅग) मिळाले आहे. या ठिकाणी असलेल्या या दालनांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे. उरमेरीक वस्तु उत्पादन समुह (कल्सटर) सांगलीवरून आलेल्या या समुहातील दालनात हळद, मनुके, कांदा लसून चटणी, तीळाची, जवस, नारळाची चिक्की आहे. या सर्व वस्तूंना ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.


            जळगाव जिल्ह्यातील यावल येथील संकल्प एन्टरप्राईजेसचे अशोक गडे यांनी केळींवर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविलेले आहेत. यात केळीचे बिस्कीट, चॉकलेट, लाडू आहेत. या पदार्थांचे स्वामित्व (पेटेंट) ही आहेत. येथे व्यापार मेळाव्यात प्रथम आलो आहे. अनेक व्यवसायिकांनी संपर्क साधून दरमहा मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती श्री. गडे यांनी दिली.


            या ठिकाणी अभिषेक बंजारा वस्तू उत्पादन समूहाचे स्टॉल आहे. या स्टॉलवर बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेतील जुन्या पैश्यांचे दागिने, पॅच वर्क, बॅग्स आहेत. स्टॉल अतिशय सुंदर सजविलेले आहे. विशेष म्हणजे या उत्पादन समूहाकडून प्लाजो-स्कर्ट धोती सारखे बनविले आहे. हा पॉल्जो-स्कर्ट मुलींना विशेष आवडत असल्याचे बालाजी पवार यांनी सांगितले.


            शिव समर्थ महिला उद्योग केंद्र, सांगलीच्या सुनंदा म्हेत्रे म्हणाल्या, प्रथमच व्यापार मेळाव्यात स्टॉल उभारण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. देशाच्या राजधानीत मंच मिळवून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले, आमच्या दालनात अव्वल दर्जाचा काजू, मनुके, हळद, कोकम हे पदार्थ आहेत. सर्वसामान्य लोकांकडून मालाची खरेदी होत आहे, अशी प्रतिक्रीया श्रीमती म्हेत्रे यांनी दिली.


हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक


            महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्यावतीने हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक याठिकाणी सादर करण्यात येत आहे. नंदिनी झुंझे आणि मीनाक्षी वावळ या प्रशिक्षित पैठणी बनविणाऱ्या महिला हे प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. या दालनास लोक आर्वजून भेट देत असून प्रात्यक्षिक पाहून पैठणी कशी विणली जाते आणि पैठणी या महावस्त्राबद्दल कुतूहलाने विचारणा केली आहे.


            हे प्रदर्शन दि.27 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. शनिवारी, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर येथील श्रीजा समूहातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम येथील खुल्या सभागृहात सादर केला जाणार आहे.


००००

जिवन गाणे






 

Thursday, 24 November 2022

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा

 कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा

- कृषी मंत्री अब्दुल सत्तार.

            मुंबई, दि. 24 : कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.


            मंत्री श्री. सत्तार यांच्या दालनात आज कृषी विभागाच्या विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, कृषी विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, डॉ. विकास पाटील, उदय देवळाणकर यांच्यासह योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणारे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे पाठपुरावा करून दरमहा अहवाल सादर करावा. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. कृषी योजनांच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्री, अवजारे, उपलब्ध साधनसामग्रीची माहिती कृषी विभागाने बांधावर उपलब्ध करून द्यावी. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती उपलब्ध करून द्यावी. पिकांवर वेगवेगळे रोग, किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो, अशा परिस्थितीत पिकांवरील कीड रोगांच्या प्रतिबंधासाठी सुरूवातीलाच उपाययोजना कराव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचनाही त्यांनी केली.


            केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभाग राबवित असते. आजच्या बैठकीत मंत्री श्री. सत्तार यांनी, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अन्न सुरक्षा अभियान, पीक स्पर्धा, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजना आदींचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हावा, यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करावे आणि योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि गतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.


             कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी योजनांची अंमलबजावणी, त्याची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन याची सविस्तर माहिती दिली.             

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार

 शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार

- उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबई, दि. 22 : बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू या गावात सुरु होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.

            या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजन साळवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी होणारे भूसंपादनपाणी पुरवठा आदी मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

            श्री. सामंत पुढे म्हणालेया प्रकल्पासाठी शिवणेदेवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्यात येईल आणि या भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल.

            या भागातील 70 ते 80 टक्के शेतकरी आणि स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दाखविला आहे. या प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, तसेच एकूण पॅकेजची माहिती शेतकऱ्यांनास्थानिकांना देण्यात येईलअसे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

            बारसू येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी एकूण 6200 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी 2900 एकर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार  आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

रिफायनरी बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय :

•          पाण्याची व्यवस्था : प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी आणण्यास आज तत्वतः मान्यता देण्यात आली. या  मार्गावरील  गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. या पाण्याचा वापर जिल्ह्यातील इतर भागालाही होईल. १६० एमएलटी पाणी कंपनीला लागणार आहे.

•          राजापूर शहर अर्जुना व खोदवली नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. राजापूर नगरपरिषदनाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपसा करण्यात येणार असून माध्यमातून किमान ५ लाख क्युबिक मीटर गाळ काढला जाईल.

•          प्रकल्पासोबत या भागात एक अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्माण करण्यात येईल. ओणी येथे उपलब्ध असणारे रुग्णालय तत्काळ सुरू करण्यात येईल. इथे लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

•          मुंबई गोवा महामार्ग रस्त्यालगत सुमारे एक लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. आंबेकाजू यांची झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येईल.

•          समाज माध्यमेमुद्रित माध्यमेदृकश्राव्य माध्यमे यांच्या साह्याने व्यापक जनजागृती करून नागरिकांचे प्रकल्पाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यात येतील.

•          या प्रकल्पासाठी शिवणेदेवाचे गोटणे या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.याच भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल.

---

Featured post

Lakshvedhi