Thursday, 24 November 2022

अमृत महाआवास अभियान 2022-23’.

 अमृत महाआवास अभियान 2022-23’.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ.

मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम, मुंबई येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या अभियानामुळे 5 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.


‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतीने प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे हा या अभियानाचा हेतू आहे. या अभियान कालावधीत 1) भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, 2) घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, 3) मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे, 4) सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, 5) प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, 6) ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, 7) इंदिरा आवास योजनेंतर्गत उर्वरित सर्व घरकुले पूर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे, 8) सामाजिक लेखापरीक्षण वेळेत करणे, 9) शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे आणि 10) नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे, असे 10 उपक्रम राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.


या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व पुरस्कारार्थी उपस्थित राहणार असल्याची माहितीही मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कमी

 राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कमी

- आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह.

            मुंबई, दि. 23 : लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळत असून, राज्यात लंपी चर्म रोग प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.


            श्री सिंह म्हणाले की, लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आहेत.


            राज्यामध्ये आजअखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3712 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 292205 बाधित पशुधनापैकी एकूण 2,14,071 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 19,895 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 7,594 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 19.57 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 138.20 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे 98.77 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले.


००००

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार.

 दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार.

              मुंबई, दि. 24 : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.


            सन 2021 मध्ये श्री. अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) तसेच सन 2022 मध्ये श्री. जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था), दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे (सुगम्य भारत अभियानाची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य) यांना हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.


            जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते दि. 03 डिसेंबर,2022 रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


0000

फुलपाखरू

 *चिमटीत पकडलेल फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणा-याच्या बोटावर आपल्या पंखांचे रंग देते,*


 *काही माणसे ही अशीच भली असतात कुणी त्यांच कीतीही वाईट करायला बघीतले तरी ती समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनांनी जगतात.*


   🙏🏻❤️ *शुभ din* ❤️🙏🏻

प्रयोग करुन तर पहा

 


भारतात 1150 वृद्धाश्रम आहेत; पण यात एकही मुस्लिम नाही, असे का ?*

 *भारतात 1150 वृद्धाश्रम आहेत; पण यात एकही मुस्लिम नाही, असे का ?*


सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. काय म्हटले आहे त्यात पाहूया


काय तर म्हणे आपली संस्कृति जगांत महान आहे. बिनबुडाचा असला नेहमी दावा केला जातो. हिंदू संस्कृती महान संस्कृती कशी काय असू शकते. भारतात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे सपशेल खोटे आहे.


पहा एका अहवालानुसार भारतात ११५० वृद्धाश्रमे आहेत व या वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात. महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजले जाणा-या पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रमे आहेत.


महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत. हिंदूंना लाज वाटली पाहिजे की समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडली. आई वडिलांना न संभाळण्याची कुवृत्ती समाजात‌ वाढलेली दिसून येते.


या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे वाटते की, भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५० वृद्धाश्रमांत एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही. अहवालानुसार मुस्लिम समाज आईवडिलांना उत्तम सांभाळतात व त्यांची देखभाल चांगली करतात. कुराणमध्ये अल्लाह नंतर आईवडिलांच्या चरणी जन्नत आहे असं ते समजतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा एकही अगदी नावांलाही वृद्धाश्रम नाही. आणि तशी गरजही नाही पडली.


मात्र हिंदू समाजाचे सर्वत्र जिकडे तिकडे अनाथाश्रम व वृद्धाश्रम दिसून येतात. तसेच सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवशकता भासणे ही अत्यंत लाजीरवाणी व शरमेची बाब आहे. वृद्धाश्रम व अनाथाश्रम हा हिंदू संस्कृतीवरचा कलंक आहे. आपले आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच वृत्ती समाजात वाढली आहे.


पुणे या बाबतीत तर नंबर एक वर आहे सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यांत आहेत. मा. पंतप्रधान मोदीजींनी १०० जिल्ह्यांत वृद्धाश्रम उघडण्याची घोषणा केली आहे. किती शरमेची ही बाब आहे.. हा विकास असतो का?


वैद्यकिय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधनात्मक उपचारांने वयोमानांत वाढ झाली आहे. पण माणसांतील ओलावा मात्र पार आटला आहे. लोकांच्या घरातील कुत्रे गलेलठ्ठ झाले आहेत आणि मातापिता आठ आठ दिवस उपाशी आहेत. काय झालंय काय गाबडयांना यासाठीच का जन्माला घातले होते का त्यांनी.


शांतपणे विचार करा एवढ्या देशांत एकही वृद्धाश्रम मुस्लिमांचा नाही यावरुन काय बोध घ्याल बोला?


श्रावणबाळ योजना आणावी लागते.


संजय गांधी निराधार योजना राबवावी लागते.


कुठे तो श्रावणबाळ, कुठे आजची बिलंदर बाळे.


बरेचसे बैलोबा म्हणतात बायको ऐकत नाही. ती आणि तू सुद्धा एक दिवस म्हातारे होणार आहातच ना. हे विसरू नका


पोरगा शिकला न् जन्मदात्यांनाच विसरला.


कशाला जन्माला घालायची असली अवलाद त्यापेक्षा बिन औलादीचे रहा काय हरकत आहे.


सामाजिक जबाबदा-या शिकवल्याच जात नाहीत, आणि एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले एकुलता एक म्हणून दिवट्याचे फारच लाड होत आहे तोच घातक ठरत आहे.


आई-वडील एकच दिवटा आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका नजर अंदाज करत असल्याने ते गाबडं उदंड आणि उनाड होत चालले आहे. जरा आवरा लाडल्याला नसता हा लाडला तुम्हांलाच लावील धक्क्याला.


संस्कार द्या तरच वृद्धाश्रम कमी होतील नसता भयानक वास्तव आ वासून येत आहे. लक्षांत ठेवा.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   श्री गणेश परसरामजी जोहरे 

    नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष 

      राष्ट्रीय मानव अधिकार,

             नवी दिल्ली.

ज्ञानेश्वर माऊलींनीसंजीवन समाधी घेतली

 ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली


तो कार्तिक वद्य त्रयोदशी हा दिवस, या दिवशी माऊलींंना समाधी घेवून *७२५* वर्षे पूर्ण झाली. आजचा *७२६* वा संजीवन समाधी सोहळा परंतु आजही इतक्या वर्षा नंतर सुद्धा माऊलींची शिकवण समाजासाठी किती उपयोगाची आहे..हे आपण पाहतच आहोत, तर माऊलींना वंदन करून आजच्या दिवसाची सुरूवात करूया.आणि थोडे माऊली बद्दल माहिती घेवू या..🙏🙏


।। समाधी साधन संजीवन नाम।।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


जिवितकार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांना या देहाच्या पलिकडे जावं असं वाटू लागलं. ज्ञानेश्वरीचे सारस्वताचे झाड देशी लेण्यात सजवून त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला होता. भक्तीभावात डुंबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती. आजचे तिचे विराट भक्तीस्वरूप हे तिचे फलित आहे. अमृतानुभव हा त्यांचा ग्रंथ स्वतंत्र तत्वज्ञानच आहे. हरिपाठाचे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तांसाठी नामस्मरणाचे साधन दिले. भक्तीभावपूर्ण असे रसाळ अभंग लिहिले. सातशे वर्षांनंतर देखील हे संतसाहित्य पिढ्यान्‌पिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्नभांडार आहे.


 "पसायदान' ही प्रार्थना म्हणजे मराठी सारस्वताचा झळाळणारा एक कौस्तुभ अलंकारच! ज्ञानेश्वरी हा सुवर्णकलश आहे तर पसायदान ही महन्मंगल विश्वकल्याणाची प्रार्थना! थेट हृदयाशी संवाद करणारी भाषा, रसकल्लोळ आणि भक्तीचा महिमा यांद्वारे ज्ञानदेवांनी अवघे तत्वज्ञान सोपे करून उलगडून मांडले.


 आईच्या वात्सल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडविले. आपले आयुष्य केवळ समाजाच्याच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले. एवढे केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरले? अशी उत्कट भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली. या समाजकार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार त्यांच्या मनात आला असावा. आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात्मतेत विलीन झालं पाहिजे. या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केलं. या चिंतनातूनच त्यांनी संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. 


🌹लाखो भाविकांची मांदियाळी 🌹


संजीवन समाधी घेण्यामागची कारणं काहीही असू शकतात. पण समाधी घेणं ही काही सामान्य घटना नाही. ज्ञानदेव मात्र या समाधी सोहळ्याला शांतपणे आणि धीरोदात्तपणे सामोरे गेले. अनंतात विलीन झाले आणि देवरूप झाले! ज्ञानदेव तुम्हा आम्हा सर्वांचे देव झाले. या देवाचं दर्शन घेण्यासाठी आळंदीत लाखो भक्तांची मांदियाळी त्यांच्या समाधीभोवती भक्तीभावानं जमते.


संजीवन समाधीचा हा सोहळा घडला, हे पुढच्या पिढ्यांना कळालं यासाठी प्रत्यक्ष पाहिलेल्या समाधीविषयीचे अभंग संत नामदेव महाराजांनी लिहून अध्यात्माची ही शिदोरी सामान्यांच्या हाती सोपवली. 


ज्ञानदेवांनी स्वत:च्या मनाशी केलेला निर्णय प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा तसे निवृत्तीनाथ हादरलेच. "अरे ज्ञानदेवा, असा काय विचार करतो आहेस? जरा शुध्दीवर ये', ज्ञानदेव म्हणाले, "गुरुनाथदादा, आजपर्यंत आपण आत्मसात केलेलं अध्यात्माचं तत्वज्ञान समाजाला सांगितलं. त्याचा प्रचार, प्रसार केला. संतांच्या मनातही ते रुजविण्याचा प्रयत्न केला. आपणंच हे तत्वज्ञान आचरणात आणलं नाही तर आपणच आपल्या तत्वज्ञानाशी बेईमानानं वागलो असं होईल. म्हणून चिरस्वरुपाची संजीवन समाधी घ्यावी असं मनोमन वाटतं आहे'. "ज्ञानदेवा, तुझ्या या निर्णयाच्या आड कसा येऊ? पण ज्या संतांना तू आधार वाटतोस त्यांना पटवून देणं आवश्यक आहे. त्याहीपेक्षा सोपान, मुक्ताला अधिक समजून सांगितलं पाहिजे.'


 निवृत्तीनाथांची संमती मिळाल्यावर आनंदानं चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान, मुक्ताला ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचा निर्णय सांगताना निवृत्तीनाथांना भडभडून आले. दोघांनीही आक्रोश केला. दादा आता आम्हाला सोडून जाणार म्हटल्यावर मुक्ताईचा धीरच खचला. कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्र बोलावून ज्ञानदेवांचा हा संकल्प सांगितल्यावर सगळे संत हडबडून गेले. ज्ञानदेवांनी नामदेवाला हा निर्णय आधीच सांगितला होता. नामदेवांनी त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण व्यर्थ! नामदेव, गोरोबा, चोखोबा, सेना, बंका, सावता, जनाबाई ही संत मंडळी आळंदीच्या सिध्दबेटावर उतरल्याची बातमी गावात समजताच सगळा गाव वाळवंटात लोटला होता. संत मंडळी अभंग, किर्तनात दंग होती. ज्ञानदेवांच्या झोपडीभोवतालचं वातावरण हरिनामाच्या गजराने भारून गेलं होतं. 


🌸समाधीची तयारी 🌸

समाधीस्थानाची तयारी तीन-चार दिवस आधीच झाली होती. सिध्दबेटावरील सिध्देश्वर मंदिराजवळच असलेल्या पुरातन गुहेत ज्ञानदेव समाधी घेणार होते. ही गुहा आतून स्वच्छ करून घेतली होती. आतली भिंताडं शेणामातीनं लिंपून सारवून घेतली होती. समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती. कार्तिकी द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत मंडळींसमोर अखेरचं कीर्तन करणार होते. त्यानंतर ते संपूर्ण मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता. ज्ञानदेवांनी किर्तनाला सुरुवात केली. "संतसज्जनहो मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे. आता मी शिवस्वरूपात विलीन झालो आहे. आपल्यापुढे मी नाममात्र उरलो आहे. मीच भक्त अन मीच देव होऊन बसलो आहे. आता मी निघावं म्हणतो. आपल्या आशीवार्दानं आम्हास चिरशांती, शुध्द स्वरुपातला आनंद निरंतर मिळत राहील. आपणा सर्वांना माझा अखेरचा नमस्कार'. एवढं बोलून ज्ञानदेव उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वर माऊलींना चिरंतन आनंद वाटावा म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात विठोबाचा जागर घालण्याची विनंती केली. विठ्ठलाच्या अन्‌ ज्ञानदेवांच्या जयजयकाराच्या गजरात द्वादशीची रात्र हरिनाम संकिर्तनातच संपली.


कार्तिकी वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवादी भावंडांनी इंद्रायणीत पवित्र स्नान केलं. ज्ञानदेव आता कोणाशीही बोलत नव्हते. नामदेव सकाळीच समाधीस्थान पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी आत जाऊन साऱ्या गोष्टी नजरेखाली घातल्या. ज्ञानदेवांचे आसन तुळशी, बेल, दुर्वा, दर्भ आणि फुले अंथरूण सिध्द केलं होतं. समाधीस्थळावर वारकऱ्यांची भजनं टाळमृदुंगाच्या गजरात सुरू होती.


समाधीस्थानाकडं निघताना संत जनाबाईंनी ज्ञानदेवांना पंचारतीनं ओवाळलं. त्यांना मांड्याचा एक घास भरविला. अन्य स्त्रियांनी त्यांना ओवाळले. नंतर मुक्ताईनं ज्ञानदेवांस गंधाक्षता लावल्या. मांड्याचे अखेरचे दोन घास भरवून त्यांना भरल्या डोळ्यांनी पंचारतीनं ओवाळलं आणि ज्ञानदेवांना मिठी मारून हंबरडा फोडला. ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या पाठीवरून शेवटचा प्रेमाचा हात फिरविला. सोपानकाकांनाही स्वत:ला सावरणं कठीण झालं. 


🌸ज्ञानेश्वर माऊलींना अखेरचा निरोप 🌸


जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जयजयकार केला. टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा गजर सुरू झाला. ज्ञानदेव समाधीस्थानाकडे चालू लागले. त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ तर दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते. वाटेत लोक ज्ञानदेवांच्या पाया पडत होते. काहीजण दुरुनच हात जोडून त्यांना नमस्कार घालत होते. अखेर ज्ञानदेव समाधीस्थानापाशी आले. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानदेवांची मनोभावे पूजा केली. ज्ञानदेवांनी समाधीस्थानाला तीन प्रदक्षिणा घातल्या. अजान वृक्षाला प्रेमानं कुरवाळलं. संतांनी चरणाला स्पर्श केला. लोकांची नमस्कारासाठी झुंबड उडाली. निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली. 

आता विश्वात्मके देवें। येणें वाग्यज्ञे तोषावें।

तोषोनि मज द्यावें। पसायदान हे।।...


ज्ञानदेवांनी जनतेला शेवटचा नमस्कार केला. निवृत्तीनाथ व नामदेवांनी ज्ञानदेवांचे हात धरून समाधीस्थानात प्रवेश केला. बसण्यासाठी शुभ्र वस्त्र अंथरले होते. तुळशी, बेल, फुले यांची शय्या तयार होती. ज्ञानेश्वरांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरीची अगदी पहिली प्रत त्यांच्या आसनासमोर ठेवण्यात आली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना हळूवारपणे त्या आसनावर बसवले. नामदेवांनी त्यांना पंढरीचा बुक्का लावला. समाधीसाठी ज्ञानदेवांनी पद्मासन घातले आणि डोळे मिटून हात जोडले. दीर्घ स्वरांत ॐ चे उच्चारण केले. निवृत्तीनाथांनी हुंदके देत जड अंत:करणाने समाधीच्या द्वारावर शिळा लावली. द्वार कायमचं बंद झालं. निवृत्ती, सोपान, मुक्ताईनं हंबरडा फोडला. कार्तिकी वद्य त्रयोदशीला हा ज्ञानसूर्य मावळला.

*नामा म्हणे आता लोपला दिनकर l*

*बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ll*

----------------------------------------

          l रामकृष्ण हरि ll

Featured post

Lakshvedhi