सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 24 November 2022
स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने
स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा शासन निर्णय जारी.
मुंबई, दि. 23 : राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 10 हजार रुपये इतक्या निवृत्तीवेतनामध्ये 10 हजार रुपयांची वाढ करुन आता त्यांना दरमहा 20 हजार इतके निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे. ही वाढ 1 नोव्हेंबर, 2022 पासून लागू राहणार असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दुपटीने वाढविण्याचा निर्णय अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.
कर सहायकाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
कर सहायकाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - 2021 मधील कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.
खेळाडूसाठी आरक्षित पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यांचा अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दिव्यांग, माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.
अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी न्यायालय, न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्र्यरित्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मेडिकल test
आपण विविध आजारांनी त्रस्त आहात....
आता करा संपूर्ण शरीराची रक्त तपासणी फक्त २२००/-
आजच आपली नोंदणी करून घरपोच सुविधेचा लाभ घ्या.
कॉल : ९१५८६३५५९६
एमपीएससीकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध ,
एमपीएससीकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१" या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
१३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक - २ (स्वतंत्र पेपर लिपिक-टंकलेखक)" (लिपिक-टंकलेखक, - दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षा झाल्या होत्या. संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
*****
स्वीडनच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
स्वीडनच्या राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
पर्यावरण, डिजिटलायझेशन, व्यापार आदी विषयात
भारतासोबत सहकार्य वाढवणार
- राजदूत जॅन थेसलेफ
मुंबई, दि. 23 : स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बुधवारी (दि. २३) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
पर्यावरणासंबंधी आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वीडन भारतासोबत 'हरित संक्रमण भागीदारी' सुरु करीत असून यासंदर्भात मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजदूत श्री. थेसलेफ यांनी यावेळी दिली. या भागीदारी अंतर्गत स्वीडिश कंपन्या भारतातील सिमेंट, स्टील आदी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वीडन भारताशी पर्यावरण रक्षणासह डिजिटलायझेशन, व्यापार आदी क्षेत्रांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वीडनकडे पुढील वर्षी युरोपियन युनियनचे अध्यक्षपद येत आहे, तर भारत देखील २०२३ मध्ये जी २० समूहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांमध्ये मुक्त व्यापार करार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वीडनमध्ये 50 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक भारतीय विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयकिया, एरिक्सन, एच अँड एम आदी अनेक स्वीडिश कंपन्यांचे भारतात उद्योग असून भारतासोबतचे व्यापार व वाणिज्य संबंध अधिक वाढवण्यासाठी स्वीडनमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारचे व्यापार मंत्री डिसेंबर महिन्यात भारत भेटीवर येत असल्याची माहिती राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपालांना दिली.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राजदूतांचे स्वागत करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीला स्वीडनचे मुंबईतील प्रतिनिधी एरिक माल्मबर्ग हे देखील उपस्थित होते.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




