Monday, 21 November 2022

Suprabhat

 ‼️ *श्री ठाकुर वृंदावन बिहारी जी महाराज की जय* ‼️

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

      *श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी,*

    *हे नाथ नारायण वासुदेवाय!!!*

      *꧁!! Զเधॆ Զเधॆ !!꧂*

                 🍁

*कभी कभी बुरा वक्त कुछ अच्छे लोगों से मिलाने के लिए भी आता है।*

                 🍁

         🌹 *सुप्रभात* 🌹

  🌹 *Happy Morning* 🌹

  *आपका दिन मंगलमय रहे*

                🙏💐🙏

*जय हिंद वन्दे मातरम*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

कडवे सत्य

 *🙏कडवे सत्य*👍🏼


 *🙏कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत नाही*....

  *आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही*...

  *हॉटेलच्या बिर्याणी ला घरच्या खिचडी ची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा थिएटरची सर नाही*...

   *साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणा सारखं सौदर्य नाही*...

   *कितीही कलमं करा गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जुई आणि मोगऱ्याची सर नाही*...

   *शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही*...

  *भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गर ला नाही आणि ग्राउंड ची सर जिमला नाही*...

   *स्वता सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनांत प्रेम करणा-या जोडीदारासारखा आधार नाही*...

   *कितीही tally वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरमधे नाही*...

   *कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच चालत नाही*...

   *कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही कितीही पैसे असुद्या पण माणसांशिवाय काही भागत नाही*...

*खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही आपल्या आवडत्या व्यक्तिबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही*

   *अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही*...

   *मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही*...

   *शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही*...

  *स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही*...

   *सुखाच्या क्षणी माणसांशिवाय-मित्रांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतंच नाही*...

  *भक्त्ती सारखी शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीच नाही*...

  *घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटूंबाशिवाय-सच्च्या मित्राशिवाय कुणीच नाही*....

 *संतोष बबनराव वाळके सामाजिक कार्यकर्ते*

        *आपला माणुस*

             🌹🌹🌹🌹

चला खेळूया

 चला खेळूया’ उत्सवात चार हजारांहून अधिक मुलांचा सहभाग,

महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगयुनिसेफच्या सहकार्याने जागतिक बालदिन साजरा

 

            मुंबईदि. २०: खेळण्याच्या अधिकाराचा पुनरुच्चार करत जागतिक बाल दिनानिमित्त रविवारी सकाळी चार हजारांहून अधिक मुले प्रियदर्शनी पार्क येथील सुरू असलेल्या 'चला खेळूयाउत्सवामध्ये सहभागी झाली होती. फुटबॉलटेनिसक्रिकेटचे सामनेमल्लखांब आणि अनेक साहसी खेळांमध्ये मुलांनी आपला सहभाग नोंदवला.

 

महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगजिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई जिल्हा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २० आणि २१ असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था क्रायनाइन इज माइन आणि सिटीझन असोसिएशन फॉर चाइल्ड राइट्स यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले. 

 

            जागतिक बाल दिन हा २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्कावरील कन्व्हेन्शन ऑफ द चाइल्ड राइट्स’ (CRC) संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून अस्तित्वात आले. लिंगवंशधर्मअपंगत्वलैंगिकता किंवा इतर भेदभावांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंद मिळायला हवा यासाठी त्यांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाते. या वर्षीची संकल्पना खेळण्याचा अधिकार’ असल्याने भारतीय संघाची माजी बास्केटबॉल कर्णधार दिव्या सिंग मुलांबरोबर खेळामध्ये सहभागी झाली होती.

 

            या उत्सवासाठी प्रियदर्शनी उद्यानात २० आणि २१ नोव्हेंबर रोजी फुगेपोस्टररोषणाई आणि ध्वजांनी मुलांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी मातीची भांडीकला भिंतकथाकथनमॅजिक शोटॅटू आणि बबल मेकिंगचे विविध स्टॉल होते. मुलांनी त्यांच्या आवडीच्या कार्यशाळेचा आनंद घेतला. रोचीराम थडानी स्कूल फॉर हिअरिंग हँडिकॅप्डच्या मुलांनी सांकेतिक भाषेचा वापर करून अतिशय अभिनव पद्धतीने वंदे मातरम’ सादर केले. मुलांच्या एका गटाने दोरी मल्लखांब सादर करून त्यांचे संतुलन कौशल्य दाखवले. दुसर्‍या गटाने नृत्य सादर करून लोकांकडून प्रचंड टाळ्या मिळवल्या.

 

            भारतीय बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार दिव्या सिंगने या कार्यक्रमात मुलांना प्रोत्साहन देत त्यांच्यासोबत खेळ खेळले.  यावेळी बोलताना दिव्या म्हणाली कीमुलांसोबत असा वेळ घालवणे हा खूपच वेगळा अनुभव आहे. मला आनंद आहे की संयुक्त राष्ट्र संघाने या वर्षीच्या जागतिक बालदिनाची संकल्पना ही खेळण्याचा अधिकार अशी आहे. आपल्या देशात अनेक प्रतिभावान मुले आहेत, ज्यात जागतिक दर्जाचे खेळाडू बनण्याची क्षमता आहे. तथापिखेळाला गांभीर्याने न घेणेफारच कमी संधी उपलब्ध असणे आणि एकूणच खेळाप्रती असलेली उदासीनता यामुळे क्रीडाक्षेत्रात करिअर करणे कठीण होऊन बसते. खेळ हा आपल्या मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेहा संदेश समाजाला देण्यासाठी आपण ही संधी घेतली पाहिजे. आपण त्यांना त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली पाहिजे.

 

            यावेळी मुलांचे स्वागत करताना अॅड. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी बालस्नेही महाराष्ट्र करण्यावर आयोगाचा भर असल्याचे सांगितले. आम्ही बाल हक्कांचे संरक्षण करण्यावर विश्वास ठेवतो आणि स्वराज्यसत्य आणि अहिंसा या भारतीय मूल्यांचे पालन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलांवरील कोणत्याही अत्याचार किंवा हिंसाचाराला आम्ही तीव्र विरोध करतो आणि अशावेळी कडक कारवाई केली जाईल. महात्मा गांधींनी सत्याच्या मार्गावर चला असे सांगितले होते, तीच शिकवण देऊन आपण मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. जागतिक बालदिन हा केवळ उत्सव साजरा करण्यापुरताच नाही तर बालकांच्या हक्कांची ओळख देखील व्हावी. राज्यात प्रत्येक मुलाला शिक्षणउत्तम आरोग्यपौष्टिक आहार आणि खेळण्यासाठी जागा मिळावीअशी आमची इच्छा आहे.सुसीबेन यांनी यावेळी मान्यवरांना बालहक्क संरक्षण आणि बालस्नेही महाराष्ट्र घडविण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले.

 

            श्रीमती अल्पा वोराबाल संरक्षण विशेषज्ञयुनिसेफ महाराष्ट्र यांनी सांगितले कीमुलांच्या समस्या हाताळताना आव्हाने आहेत. महाराष्ट्राच्या झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे स्थलांतरित किंवा रस्त्यावर राहणारी मुलांचे संरक्षण आणि हक्क हे एक मोठे आव्हान आहे. हिंसाचार आणि गैरवर्तन यापासून ही मुले अधिक असुरक्षित आहेत. त्यांना अत्यावश्यक सेवाही मिळत नाहीत. बाल विवाहांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता कोविडनंतरच्या काळामध्ये कुटुंबांनापालकांना बरोबर घेऊन त्यासाठी उपययोजना करायला हव्यात आणि मानसिकता मानसिकता बदलायला हवी. महाराष्ट्रातील मुलांच्या विविध गरजा आणि हक्कांची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि समाजासोबत सहकार्य करण्यासाठी युनिसेफ वचनबद्ध आहे.


            महिला आणि बाल विकास आयुक्त श्रीमती आर. विमला म्हणाल्या, भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. ही मुले उद्या देशाचे नेतृत्व करतील आणि त्यांच्या निरोगी वाढीसाठी आपण संधी निर्माण केली पाहिजे. मुलांचे आणि तरुणांचे विचार ऐकायला हवेत कारण त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्याचा उपयोग होईल. आम्ही समाजाला मुलांच्या आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि सहभागाच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो.

 


            महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष निरीक्षक दीपक पांडे यांनी मुलांचे स्वागत करून त्यांच्या खेळाचा उत्साहाचे कौतुक केले. प्रत्येक मुलाला दररोज खेळण्याचे स्वातंत्र्य मिळावे कारण ते त्यांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे. पालक, शिक्षक आणि शाळा नेहमी आपल्या मुलांचे चांगले भविष्य सुनिश्चित करू इच्छितात. एक सरकारी अधिकारी या नात्याने, मला समजते की मुलांचे संरक्षण करणारे कायदे बनवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे आणि त्याची अंमलबजावणी ही तातडीची प्राथमिकता आहे. त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये न्यायाधीश, पोलिस अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते, आरोग्य अधिकारी आणि माध्यमांचाही सहभाग असतो. विशेषतः प्रसारमाध्यमांचा जनतेवर आणि राजकारण्यांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी मुलांचे विचार, मागण्या थेट प्रेक्षकांसमोर मांडण्यास मदत करावी.


            सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी एनएमआयएमएस मॉन्टेजच्या विद्यार्थ्यांच्या संगीत बँडसह संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत छंद कार्यशाळांचे आयोजन प्रियदर्शनी पार्कमध्ये करण्यात आले आहे.

अरे संसार संसार


 

Zindgi ek सफर







 

Sunday, 20 November 2022

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार

 पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार


-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            पुणे, दि.२०: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            वानवडी येथे एसआरपीएफ गट-२ परिसरात आयोजित ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ समारोप कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार महेश लांडगे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये झालेल्या पोलीस स्पर्धेदरम्यान असे क्रीडा संकुल निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोविडमुळे ते शक्य झाले नाही. आता लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. या क्रीडा संकुलात ॲथलेटीक ट्रॅक, सिंथेटीक टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदान, बहुउद्देशिय सभागृह, जलतरण तलाव, वसतीगृह आदी सर्व सुविधा असतील. यामुळे राज्यातील खेळाडूंना फायदा होण्यासोबत राज्याला मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळेल.

            आपल्या मन आणि बुद्धीला निकोप आणि सक्षम ठेवण्याचे कार्य खेळामुळे होते. खेळात खिलाडूवृत्तीला महत्व आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता खेळामुळे निर्माण होते. खेळामुळे जिंकण्याची सवय लागण्यासोबत पराभव पचवण्याची क्षमताही निर्माण होते. खेळाडू हार न मानता प्रत्येक पराभवानंतर नव्या यशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळेच सुरक्षा दलात खेळाचे विशेष महत्व आहे आणि खेळाडूंना विशेष महत्व दिले जाते. महाराष्ट्रही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचा नावलौकीक उंचावणाऱ्या खेळाडूंना पोलीस उपअधीक्षक पदावर थेट नियुक्ती दिली जाते, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे विशेष स्थान आहे. राज्याला देशाचे ‘इकॉनॉमिक पॉवर हाऊस’, मुंबईला आर्थिक राजधानी, तर पुण्याला उत्पादन, शिक्षण आणि इनोव्हेशनची राजधानी म्हणून ओळखले जाते, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.ज्याप्रमाणे सैन्यदले देशांच्या सीमांचे रक्षण करतात त्याप्रमाणे पोलीस दल आणि हे खेळाडू देशातील अंतर्गत सुरक्षेचे कार्य करतात. सैन्य आणि पोलीस दलामुळे देशातील जनता सुरक्षित आहे असे सांगून स्पर्धेत पुरुषांसोबत महिलांचा वाढता सहभाग हे बदलत्या भारताचे दृश्य असून देशासाठी अभिमानाची बाब असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

            पोलीस महासंचालक श्री. सेठ म्हणाले, स्पर्धेत ७ क्रीडाप्रकारांचा समावेश होता. कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांबरोबर या स्पर्धेत प्रथमच आर्म रेसलींग, पॉवरलिफ्टींग आणि बॉडी बिल्डींगचा सहभाग करण्यात आला. स्पर्धेत नामांकीत खेळाडूंनी सहभाग घेतला. यापूर्वी २०१० आणि २०१७ मध्ये महाराष्ट्राने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २५ राज्याचे आणि ५ केद्र शासीत प्रदेश आणि ६ निमलष्करी दल, रेल्वे पोलीस अशा ३७ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेत २ हजार पुरुष आणि ६०० महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस दलाला खेळाची गौरवशाली परंपरा आहे. राज्य पोलीस दलाने अनेक नामांकीत खेळाडूंना नोकरीत घेऊन चांगली संधी दिली आहे.

            अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाचे प्रतिनिधी व आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर यांनी प्रास्ताविक केले.विजेत्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सर्व सहभागी संघांनी आकर्षक संचलन करून मानवंदना दिली.

 पंजाब पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

स्पर्धेत पंजाब पोलीस दल १७ सुवर्ण, ९ रजत, १५ कांस्य पदकासह ४१ पदके मिळवून सर्वसाधारण विजेते ठरले. दुसऱ्या क्रमांकावरील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाने १५ सुवर्ण १० रजत व १६ कांस्य पदकासह एकूण ४१ पदके मिळवली. महाराष्ट्र पोलीस दलाने १२ सुवर्ण ७ रजत व ११ कांस्य पदकासह एकूण ३० पदके मिळवत सर्वसाधारण तिसरा क्रमांक मिळविला.

000






पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार

-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



            पुणे, दि.२०: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईलआणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            वानवडी येथे एसआरपीएफ गट-२ परिसरात आयोजित ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ समारोप कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटीलक्रीडा मंत्री गिरीष महाजनआमदार माधुरी मिसाळआमदार भीमराव तापकीरआमदार महेश लांडगेराज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठआयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखरराज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंगराज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसादपुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले२०१९ मध्ये झालेल्या पोलीस स्पर्धेदरम्यान असे क्रीडा संकुल निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोविडमुळे ते शक्य झाले नाही. आता लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. या क्रीडा संकुलात ॲथलेटीक ट्रॅकसिंथेटीक टर्फ हॉकी मैदानसिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदानबहुउद्देशिय सभागृहजलतरण तलाववसतीगृह आदी सर्व सुविधा असतील. यामुळे राज्यातील खेळाडूंना फायदा होण्यासोबत राज्याला मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळेल.


            आपल्या मन आणि बुद्धीला निकोप आणि सक्षम ठेवण्याचे कार्य खेळामुळे होते. खेळात खिलाडूवृत्तीला महत्व आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता खेळामुळे निर्माण होते. खेळामुळे जिंकण्याची सवय लागण्यासोबत पराभव पचवण्याची क्षमताही निर्माण होते. खेळाडू हार न मानता प्रत्येक पराभवानंतर नव्या यशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळेच सुरक्षा दलात खेळाचे विशेष महत्व आहे आणि खेळाडूंना विशेष महत्व दिले जाते. महाराष्ट्रही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचा नावलौकीक उंचावणाऱ्या खेळाडूंना पोलीस उपअधीक्षक पदावर थेट नियुक्ती दिली जातेअसेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.


            महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे विशेष स्थान आहे. राज्याला देशाचे इकॉनॉमिक पॉवर हाऊस’, मुंबईला आर्थिक राजधानीतर पुण्याला उत्पादनशिक्षण आणि इनोव्हेशनची राजधानी म्हणून ओळखले जातेअसे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.ज्याप्रमाणे सैन्यदले देशांच्या सीमांचे रक्षण करतात त्याप्रमाणे पोलीस दल आणि हे खेळाडू देशातील अंतर्गत सुरक्षेचे कार्य करतात. सैन्य आणि पोलीस दलामुळे देशातील जनता सुरक्षित आहे असे सांगून स्पर्धेत पुरुषांसोबत महिलांचा वाढता सहभाग हे बदलत्या भारताचे दृश्य असून देशासाठी अभिमानाची बाब असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.


            पोलीस महासंचालक श्री. सेठ म्हणालेस्पर्धेत ७ क्रीडाप्रकारांचा समावेश होता. कुस्तीकबड्डीबॉक्सिंगवेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांबरोबर या स्पर्धेत प्रथमच आर्म रेसलींगपॉवरलिफ्टींग आणि बॉडी बिल्डींगचा सहभाग करण्यात आला. स्पर्धेत नामांकीत खेळाडूंनी सहभाग घेतला. यापूर्वी २०१० आणि २०१७ मध्ये महाराष्ट्राने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २५ राज्याचे आणि ५ केद्र शासीत प्रदेश आणि ६ निमलष्करी दलरेल्वे पोलीस अशा ३७ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेत २ हजार पुरुष आणि ६०० महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस दलाला खेळाची गौरवशाली परंपरा आहे. राज्य पोलीस दलाने अनेक नामांकीत खेळाडूंना नोकरीत घेऊन चांगली संधी दिली आहे.


            अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाचे प्रतिनिधी व आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर यांनी प्रास्ताविक केले.विजेत्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सर्व सहभागी संघांनी आकर्षक संचलन करून मानवंदना दिली.


 पंजाब पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

स्पर्धेत पंजाब पोलीस दल १७ सुवर्ण९ रजत१५ कांस्य पदकासह ४१ पदके मिळवून सर्वसाधारण विजेते ठरले. दुसऱ्या क्रमांकावरील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाने १५ सुवर्ण १० रजत व १६ कांस्य पदकासह एकूण ४१ पदके मिळवली. महाराष्ट्र पोलीस दलाने १२ सुवर्ण ७ रजत व ११ कांस्य पदकासह एकूण ३० पदके मिळवत सर्वसाधारण तिसरा क्रमांक मिळविला.


000











 

 

 







 


 


 

भातुकली खेळते मी , तुम्ही पण या


 

Featured post

Lakshvedhi