सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 21 November 2022
एक चिमणी
*अलिबाग चोंढी गावचे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, व्यावसायिक, सुलेखनकार श्री. विलास समेळ सर यांचा एक स्वलिखित लेख व्हिडिओ रूपात. नक्की ऐका. अभिवाचन श्री. उमेश शिंदे👆🏼*
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन.
मुंबई, दि. 21 : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर , महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, महापालिका, पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. 21 : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आज करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, मातृभक्त शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे सदस्य सत्यशील राजगुरू, उमा संजीव महादेकर, स्मारक निर्मिती समितीचे ॲड. प्रथमेश पाडेकर आदी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 21: "स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी", असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.
स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा.स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीमती लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडीश आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडन देशसुध्दा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि. 21: "स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी", असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.
स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा.स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीमती लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडीश आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडन देशसुध्दा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.
हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय
हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि. 21 :''सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी '', असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांच्या सदिच्छा भेटीवेळी केले.
माईक हँकी यांनी अमेरिका - महाराष्ट्र द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी भेट घेवून माहिती दिली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शहरे, गावे आणि तालुके सार्वजनिक वाहतूकीने जोडलेले आहेत. ही वाहतूक व्यवस्था प्रदूषण विरहित करुन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी येत्या काळात राज्यात हरित ऊर्जा वापरावर भर देऊन हरित ऊर्जा उद्योगवाढीला चालना देण्यात येणार आहे. अमेरिकेने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात या क्षेत्रात तसेच कौशल्य आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र हरित ऊर्जा वापरावर भर देत असल्याचे उदाहरण सांगताना उपमुख्यमंत्री यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ई- बसेस सुरु केल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृत संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्यादृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावले उचलत असून, यासाठी अमेरिकेसारख्या देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासन आवश्यक सुविधांसह सर्व सहकार्य करण्यावर भर देत आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून, येणाऱ्या काळात अमेरिकेतून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यासाठी पोषक वातारण तयार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने कौशल्य विद्यापीठ राज्यात स्थापन केले असून, या विद्यापीठाअंतर्गत कौशल्य आधारित उद्योगांचे जाळे वाढविण्याच्या दृष्टीने अमेरिकन कंपन्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माईक हँकी यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राहणे त्यांना आवडत असून गेल्या काही काळात त्यांनी राज्याच्या विविध भागांना भेटी दिल्या आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी, हरित ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांत अमेरिकन उद्योजक आपला व्यवसाय करत असून येणाऱ्या काळात अमेरिकेतील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याही श्री.माईक हँकी म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबईचे वाणिज्यदूत यांचे राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, अमेरिकेच्या मुंबई वाणिज्यदूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया - नायक, डॉ. मनिष मल्के उपस्थित होते.
०००
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल.
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल. -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
पुणे दि.२०: पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर, बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करत असतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी २५ लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
राज्याला पुढे नेण्यासाठी विकास पत्रकारिता महत्वाची आहे असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकार सकारात्मक दृष्टिकोनातून काम करतात. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून ते सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात. स्वातंत्र्यपूर्व काळात दर्पणकारांपासून ही परंपरा सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार कठीण परीस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास पत्रकारितेचे महत्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील.
मराठी पत्रकार परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले आहे. मराठी पत्रकार परिषद देशातील पहिली संघटना आहे. ८३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेने गोवा, बेळगाव, बिजापूर, कारवार आणि महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शाखांसह सयुंक्त महाराष्ट्र साकारला याचा सर्वांना आनंद आहे. आचार्य अत्रे, बाळासाहेब भारदे, नरेंद्र बल्लाळ, नारायण आठवले, अनंत भालेराव अशा मोठ्या व्यक्तिमत्वांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले.
गतिमान वृत्तांकनात बातमीतील सत्यता राखण्याचे मोठे आव्हान असून आज समाज माध्यमांमुळे वृत्तांकन गतिमान होत आहे. चहूबाजूने सतत माहितीचा मारा होत असताना बातमीतील सत्यता राखण्याचे आवाहन पत्रकारांसमोर आहे. वाचकांचा विश्वास कायम ठेवण्याचे आव्हान असून संघटनेची प्रबोधनाची भूमिकाही महत्त्वाची आहे. चौथा स्तंभ असलेली माध्यमे आणि शासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. शासनाचे जिथे लक्ष जात नाही अशा भागातील समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचे काम पत्रकार करतात, त्यामुळे एकप्रकारे शासन प्रशासनाला मार्गदर्शन होते आणि नागरिकांना न्याय मिळतो असेही श्री. मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.
गेल्या चार महिन्यात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेण्यात आले. गेल्या चार महिन्यात शासनाने घेतलेल्या पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना यासारख्या चांगल्या निर्णयांना माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. समृद्धी महामार्गाचा १४ जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पुणेकरांना उपयुक्त ठरणार आहेत. कात्रज आणि विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याबाबतही प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. सर्वच शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्यची मर्यादा २५ हजारावरून ३ लाखापर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात दिली.
प्रास्ताविकात श्री.देशमुख यांनी अधिवेशनसंबंधी माहिती दिली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न अधिवेशनाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. श्री.कांबळे, शशिकांत झिंगुर्डे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
सुरेश भटांच्या सुंदर चार ओळी..
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...
🌹😊 *शुभ सकाळ ..*😊🌹
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...