Thursday, 17 November 2022

शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश.

 शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश.

            मुंबई दि. 16 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.


            या संदर्भात महसूलमंत्री श्री. विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महसूल‍ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            श्री. विखे- पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने वाटप जमिनीचे 7/12 करण्याची प्रलंबित प्रकरणे, अतिक्रमण प्रकरणे, जमीन मोजणी इत्यादि बाबींना प्राधान्य द्यावे.


            अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निमगांव कोऱ्हाळे, साकुरी आणि शिर्डी येथील जमिनींसंदर्भातील सार्वजनिक प्रयोजनासाठी प्राप्त झालेले विविध प्रस्ताव संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत सादर करुन याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.


            महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची आकारीपड जमिन, अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर येथील हरीगांव येथील शेती महामंडळाच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे, एक एकर पेक्षा कमी देय क्षेत्र असल्याने अपात्र ठरलेल्या खंडकरी यांना क्षेत्र वाटप करण्यासाठी धोरण ठरविणे, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालमत्तेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे तसेच याबाबत एक आराखडा तयार करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.



श्री स्वामी समर्थ, चर्म पादुका

Pl शेअर



मी आलो


 मुक्काम थळ आरसीएफ कॅम्पस,अलिबाग

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता

डॉ. पल्लवी सापळे यांची गुरुवारी मुलाखत.

            मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


            मुंबई, भिवंडी, मालेगाव (जि. नाशिक) परिसरात गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांची माहिती, रोगाची लक्षणे, रोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, लसीकरण अशा विविध विषयांवर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी विस्तृत माहिती 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.


००००

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021

 भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती 2021


भूकरमापक तथा लिपीक पदाची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार


            मुंबई, दि. 16 : भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28,29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र 2 मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. 29 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र 2 मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


            परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.


             सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.


            भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ०९/१२/२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्विकृतीचे काम करण्यात आलेले होते.


            ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची माहिती (DATA) प्राप्त झालेनंतर सदर DATA ची प्राथमिक तपासणी केली असता भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक पदाकरीता जाहिरातीत नमूद अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज सादर केल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरीता अर्ज सादर करण्याबाबत सूचना असून देखील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विभागाकरीता अर्ज सादर केलेले दिसून आले. या कारणास्तव विभागाकडून २८/०२/२०२२ ते १३/०३/२०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवित दुबार अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणत्याही एकाच विभागातील अर्ज कायम करण्याची तसेच अर्हता धारण करत असल्याबाबत प्रमाणपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.


            छाननी अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तसेच छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच पदभरती प्रक्रियेतील परीक्षेस बसण्याकरीता पात्र करण्यात येईल. जे उमेदवार अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड करुन छाननी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, अशा उमेदवारांना पदभरती परीक्षेसाठी अपात्र समजण्यात येईल, अशी सूचना एस एम एस द्वारे तसेच विभागाकडून देण्यात आलेली होती.


०००००


वर्षा आंधळे/विसंअ/16.11.2022



 


वृत्त क्र. 3349


 


औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


        मुंबई, दि. 16 : उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे काम राज्य सरकार करत असून येत्या काळात औरंगाबाद आणि राज्याच्या विविध भागात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी औरंगाबाद परिसरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या तसेच उद्योग विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसोबत चर्चा केली. केंद्रीय अर्थ 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट


राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

            राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, आमदार डॉ बालाजी किणीकर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते. 

राजगृहच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. यात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण दर्शविणारी छायाचित्रे आणि त्यांनी सुरू केलेल्या ' जनता ' वृत्तपत्राचा खास अंक, सभांना संबोधित करतानांची छायाचित्रे, पुस्तकांचा संग्रह पहिल्या मजल्यावरील चित्रदालनात ठेवण्यात आली आहे. याच मजल्यावर डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तूसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

राजगृहातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबीयांची देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट घेतली.

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं मोठे भूषण आहे. त्यांनी वास्तव्य केलेले राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू, छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी केली. या खोलीतील वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले.

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन

 ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणेइलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन

             मुंबई, दि. 16 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे.


            मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5 किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 14.20 पैसे होता, तो आता 15.33 पैसे केला आहे. टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये भाडेदर होता, तो आता 40 रुपये असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आली आहे.


            प्रवाशांना योग्यप्रकारे भाडे आकारणी करण्याकरिता ऑटो रिक्षा व टॅक्सी मध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये नवीन भाडेदराप्रमाणे दुरुस्ती करुन या संबंधित कार्यालयामार्फत रिकॅलिब्रेशन तपासून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारकांसाठी रिकॅलिब्रेट केलेल्या मीटरच्या चाचणीसाठी यंत्रणा कार्यरत आहे. तारखेनुसार पूर्व नियोजित वेळ घेवून इलेक्ट्रॉनिक मीटर रिकेलिब्रेट केलेल्या वाहनांची चाचणी पूर्व द्रुतगती महामार्ग ( गोदरेज कंपनी गेट क्र. ०२, विक्रोळी पूर्व, मुंबई) या ठिकाणी दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत करण्यात येत आहे.


            दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजीपर्यंत या कार्यालयात नोंदणीकृत सुमारे ८० हजार ऑटोरिक्षांपैकी केवळ २९ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. तसेच नोंदणीकृत सुमारे ८ हजार काळीपिवळी टॅक्सींपैकी केवळ १३ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करुन मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. हे प्रमाण अत्यल्प असून रिकॅलिब्रेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरसह वाहने या कार्यालयाकडून चाचणी करीता सादर करुन तपासून घेणे आवश्यक आहे.


            रिकेलिब्रेशनसाठीची मुदत प्राधिकरणाने दि. ३० नोव्हेंबर २०२२ अखेरची दिली असल्याने त्यानंतर मीटर रिकेलिब्रेशन चाचणीसाठी येणाऱ्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.


            विहित वेळेत रिकॅलिब्रेशन करून कार्यालयामार्फत घेण्यात आलेली चाचणी उत्तीर्ण केली नसल्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ठरावाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी 30 नोव्हेंबर, 2022 पूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर वाढीव भाडेदराप्रमाणे रिकॅलिब्रेट करून घ्यावे.


            रिकॅलिब्रेशनची मुदत दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत असली तरी वाढीव भाडेदर हे दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. रिकॅलिब्रेट होईपर्यंत सर्व प्रवाशांना व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना ठरवून देण्यात आलेल्या दराप्रमाणे प्रवासाचे भाडे अदा करता येतील व घेता येतील. दर हे क्यूआर कोडसह विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑटो रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ नवीन (New) या टॅबवर क्लिक करून ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व कूल कॅब टॅक्सीसाठी दराचा आधार घेवूनच भाडेदर प्रवाशांनी अदा करावेत. तसेच संकेतस्थळावर दर हे क्यूआर कोडसह प्रदर्शित केले असल्याने हा क्यूआरकोड ग्राह्य धरण्यात यावा. तसेच ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी देखील रिकॅलिब्रेट होईपर्यंत या दराचा वापर करावा आणि प्रवाशांकडून योग्य भाडेदर आकारावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दि. 1 ऑक्टोबर, 2022 नंतर आटो रिक्षा व टॅक्सी चालकांकडून विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास त्याविषयीची तक्रार संबंधित कार्यालयाकडे घटनेच्या इतर तपशीलासह करावी. ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर हे 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी रिकॅलिब्रेट

Featured post

Lakshvedhi