Wednesday, 16 November 2022

राज्यातील गड - किल्ल्यांच्या विकासावर भर देणार

 राज्यातील गड - किल्ल्यांच्या विकासावर भर देणार

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. 16 : रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ला विकासासाठी पर्यटन विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.त्याचबरोबर राज्यातील सर्व गड - किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांना दिली.


            राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री.लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती, पर्यटन सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी,सहसंचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याला सन २०२४ मध्ये या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा इतिहास रूपी माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील तसेच याठिकाणी लेझर शोचे देखील आयोजन करण्यात येईल. प्रतापगडाबरोबरच राज्यातील इतर गड किल्ल्‌यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ला हा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ला परिसरात सुरू असलेल्या विकासकामांबाबत पर्यटन विभाग मदत करेल.राज्यातील सागरतटीय क्षेत्रातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी शासन आग्रही आहे.याबाबतीत आलेल्या सूचनांबर नक्कीच काम करू, असेही त्यांनी सांगीतले .


रायगड विकास प्राधिकरणमार्फत सुरू कामांसाठी पर्यटन विभागाचे सहकार्य आवश्यक : संभाजी राजे छत्रपती


            रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती म्हणाले,नवीन शासन छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे ही अत्यंत चांगली बाब आहे. रायगड विकास प्राधिकरणमार्फत रायगड किल्ला व परिसरात विविध विकासकामे चालू आहेत. त्यातील अनेक कामांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीची अपेक्षा आहे.किल्ले रायगड वरील दोन निवासी खोल्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असुन आहे सहयोग करारानुसार हस्तांतर लवकर करावे. तसेच जे बांधकाम पूर्ण झाले आहे ते देखील प्राधिकरणास प्राप्त झाले तर तेथे पर्यटक कक्ष, माहिती कक्ष , संग्रहालय , माहिती कक्ष उभ्यारण्यास मदत होईल.


            संभाजी राजे छत्रपती म्हणाले, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी खाली पाचाड येथे 88 एकर जागा रायगड प्राधिकरणाने संपादित केली आहे जेथे शिवसृष्टी,मराठा संशोधन केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, अत्याधुनिक संग्रहालय यांची उभारणी होणार आहे. एमटीडीसी मार्फत येथे सामंजस्य कराराद्वारे पर्यटक निवास व सुविधा केंद्राची उभारणी व्हावी. महाड रायगड हा राष्ट्रीय महामार्ग हेरिटेज हायवे करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात हेरिटेज हायवेचा प्रस्ताव सुध्दा प्राधिकरणास प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये जलवाहतूक, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट इ. गोष्टी अंतर्भूत आहेत. एमटीडीसी,रायगड प्राधिकरण, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय यांचे करारद्वारे येथे पीपीपी मॉडेल अंतर्भूत करून प्रकल्प पूर्ण करण्यात येऊ शकतो का तसेच याबाबतही कार्यवाही करता येईल का ते पहावे अशा सूचना संभाजी राजे छत्रपती यांनी केल्या.

जर्मनीचे महावाणिज्य दूत अचिम फॅबिग यांनी

 जर्मनीचे महावाणिज्य दूत अचिम फॅबिग यांनी घेतली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

        मुंबई, दि. 16 : जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्य दूत अचिम फॅबिग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री. फॅबिग यांच्यादरम्यान यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. जर्मनीमधील उद्योजकांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, राज्य शासनामार्फत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            येत्या सहा महिन्यांत जर्मनीतील उच्चस्तरीय शिष्टमंडळ महाराष्ट्रात भेट देणार आहेत. या शिष्टमंडळांना राज्याच्यावतीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. फॅबिग यांनी व्यक्त केली. त्यांचे राज्यात स्वागतच होईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आश्वस्त केले.

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 16 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

            राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, आमदार डॉ बालाजी किणीकर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते. 

राजगृहच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. यात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण दर्शविणारी छायाचित्रे आणि त्यांनी सुरू केलेल्या ' जनता ' वृत्तपत्राचा खास अंक, सभांना संबोधित करतानांची छायाचित्रे, पुस्तकांचा संग्रह पहिल्या मजल्यावरील चित्रदालनात ठेवण्यात आली आहे. याच मजल्यावर डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तूसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

राजगृहातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबीयांची देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट घेतली.

राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं मोठे भूषण आहे. त्यांनी वास्तव्य केलेले राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू, छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी केली. या खोलीतील वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले.


००००

Job in government

 सर्व B Sc, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर कमीत कमी साठ टक्के मार्कांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी.भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती साठी जाहिरात,एकूण 990 पदे, मराठी मुलांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी . फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण तीन वर्षात त्याला आपले चॉईस स्टेशन मिळते .


सर्व दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जून बसतात व त्यांचीच भरती मोठ्या. संख्येने होते.

त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा 


कळकळीची विनंती आहे की अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे.

https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

महाप्रित आणि कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार

 महाप्रित आणि कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार.

 

            मुंबईदि. 15 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

            या कराराअंतर्गत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रस्तावित कोल्ड स्टोरेज प्लांटची (Cold Storage Plant) उभारणीई-मोबिलीटी (E-Mobility) तसेच इतर प्रकल्पांवरही संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे. महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या नेतृत्वाखाली महाप्रितने विविध सरकारी कंपन्यामहाराष्ट्र शासनकेंद्र शासन तसेच आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक सामंजस्य करार केले आहेत.

            याप्रसंगी महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटीलकार्यकारी संचालक (संचलन) सुनील पोटेकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी  एल. के. वर्मा व अन्य मान्यवर उपस्थित होते.                                      



 

राज्यात अनुसूचित जनजाती आयोग स्थापन करणार -

 अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांना देवत्व मिळाले;

प्रत्येक आदिवासी हा बिरसा मुंडा होण्याची गरज

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळालेहेच कर्तृत्व अन् देवत्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवाने बिरसा मुंडा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            येथील गोल्फ क्लब मैदानावर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सावाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितबंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसेविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळखासदार हेमंत गोडसेआमदार सीमा हिरेहिरामण खोसकरदिलीप बोरसेआदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेआदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडमहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य सुरू आहे. आदिवासी बांधवांसाठी केवळ योजनाकार्यक्रम न घेता त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्याने आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण देशात जनजातीय दिवस म्हणून साजरी केली जाते. एवढ्यावरच न थांबता देशात सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांची निवड करून आदिवासी बांधवांचा यथोचित सन्मानही केला आहे.

            देशाच्या प्रत्येक आदिवासी बांधवांच्या उत्थान आणि सन्मानासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून त्यांच्या समस्या सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

            राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून वैयक्तिक स्वरूपाचे व सामुहिक स्वरूपाचे दावे मंजूर करून राज्याने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठीचा एक नवा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. कातकरी समाजाच्या घरकुलांसाठी राज्य शासनाने गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. आदिवासींची शिष्यवृत्ती डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर कशी जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याबरोबरच आदिवासी बांधवांची संस्कृती टिकवण्यासाठीत्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.


राज्यात अनुसूचित जनजाती आयोग स्थापन करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेजलजमीन आणि जंगलासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी लढा दिला असून देशातील सर्व आदिवासी क्रांतिकारकांचे कार्य हे प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. आदिवासी क्रांतिकारकांचा लढा हा देशाला स्वातंत्र्यापर्यंत घेवून गेला. आदिवासी बांधवांच्या कलासंस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब असलेला हा महोत्सव अभिनव असा आहे. आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या संकल्पनांसोबत त्यांच्या हस्तकौशल्याचे ब्रॅंडिंग व मार्केटींग करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न शासनामार्फत केले जातील. त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या मागणीनुसार राज्यात लवकरच अनुसूचित जनजाती आयोगाची स्थापना करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनजातीय क्रांतीकारकांची माहिती संकलित व्हावी - डॉ.भारती पवार

            यावेळी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्याप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनजातीय गौरव दिवस आज साजरा होत आहे. या दिवसाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या विकासाला दिशा मिळण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बिरसा मुंडामहिलांमध्ये राणी झनकारीबाई यांच्यासारख्या अनेक जनजातीय क्रांतिकारकांसह महिलांनीही सहभाग घेतलाघेतला होता. समाजाची प्रगती करण्यासाठी इतिहासातून प्रेरणा मिळत असते. त्यासाठी सर्व जनजातीय क्रांतिकारकांच्या शौर्याची नोंद होणे गरजेचे असल्याने आजच्या नव तंत्रज्ञानाच्या युगात सर्व जनजातीय क्रांतिकारकांची माहिती संकलित करून ती येणाऱ्‍या पिढीला माहिती होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.


वनहक्कासाठी मंत्रालयात वेगळा कक्ष स्थापन करणार - डॉ.विजयकुमार गावित.


            यावेळी बोलतांना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, आदिवासी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाच्या सन्मानार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून मागील वर्षीपासून 15 नोव्हेंबर हा दिवस देशात जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी समाजाच्या  विकासाच्या दृष्टीने  नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत असून वनपट्टे, वनहक्के दाव्यांबाबत कायद्याच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सुरू झाले आहे व यासाठी मंत्रालयात वेगळा कक्ष स्थापन करण्यात येईल. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावे, वाड्या व वस्त्या यांची कनेक्टीव्हीटी वाढविणे गरजेचे आहे. यासाठी  या भागात रस्ते, वीज, इंटरनेट या मुलभूत सुविधा विकसित करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून सुरू आहे


आदिवासी विकासाच्या योजना तळागाळात पोहोचवणार - दादाजी भुसे.


            आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजना असून या योजना तळागाळातल्या आदिवासी बांधवांपर्यंत अशा प्रकारच्या सांस्कृतिक महोत्सवातून पोहचवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. नाशिक हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील वाड्या-पाड्यातील शेवटच्या आदिवासी बांधवाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही बंदरे, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली


आदिवासी क्लस्टरच्या माध्यमातून कौशल्याला मिळणार न्याय - नरहरी झिर


            आदिवासी बांधवांच्या कौशल्याला न्याय देण्यासाठी जिल्ह्यात मडकीजांब येथे नियोजित आदिवासी क्लस्टर उभारले गेल्यास या क्लस्टरच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, कास्ट औषधे व छोटे उद्योग यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आदिवासी जनजाती गौरव दिनानिमित्त येथील प्रदर्शनात आदिवासी बांधवांचे विविध प्रकारची दालने आहेत. आदिवासी उत्पादक व्यावसायिक मार्गदर्शनातून निश्चितच विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू विकण्याचे कौशल्य आत्मसात करू शकतात. यादृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केली


            यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या ‘ग्रामसारथी’ या कॉफीटेबल बुकचे  प्रकाशन तसेच ‘आदि स्वयंम’ या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध कला, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या युवकांचा यावेळी सन्मान करण्यात आ


00





00ला..वाळ.सेत. त

मेरी दोस्ती मेरा प्यार


 

Featured post

Lakshvedhi