सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 16 November 2022
Tuesday, 15 November 2022
सावध करा *अलिबाग मधे दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा*
🎯सावध करा
*अलिबाग मधे दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा*
आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत अलिबागमधील (alibaug) तब्बल 4 हजाराहून अधिक नागरिकांची कोटयवधींची फसवणूक (Cheated) करण्यात आली आहे. हा आकडा 25 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. नॅशडॅक (Nasdaq) या अमेरिकन शेअरमार्केट मधील नावाजलेल्या कंपनीचा वापर करुन हा हायटेक गंडा घालण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेकांचे धाबे दणाणले आहे. (more than 4 thousand people in alibaug have been cheated of crores of rupees)
ही कंपनी सुरुवातीला 500 रुपयांच्या बदल्यात 1 हजार 200 रुपये देत होती. लोकांची हाव वाढत गेली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहुन कंपनीने 14 दिवसात 1 लाखावर 2 लाख 40 हजार परतीची योजना काढल्यावर अनेकजण तुटुन पडले. अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले. मात्र काही दिवसातच या कंपनीने वेबपोर्टल बंद केल्याचं लक्षात आलं. आपली फसवणुक झाल्याने सर्व गुंतवणुकदार बोंबाबोंब करु लागले. दिवाळी चांगली मजेत घालवण्याची स्वप्न रंगवणाऱ्या गुंतवणुकदारांवर आता आर्थिक संकट ओढावलंय.
फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी अलिबाग पोलीस ठाण्यात सामुहिक तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांसमोर या हायटेक फसवणुकीचा गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान आहे. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आयपी अॅड्रेस हा कॉलिफोर्नियातील आहे. तर गुंतवणुकीसाठी जे संपर्क क्रमांक वापरण्यात आलेले होते ते देखील बंद आहेत. बहुतांश वेळा व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅटींगद्वारे गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आता कोणीही प्रतिसाद देत नाहीये. त्यामुळे गुंतवणूकदारांना हात चोळत बसण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.
अशाच प्रकारे नॅशडॅक कंपनीच्या नावाचा वापर करुन नाशिक, शिक्रापुर, पुणे, डोंबवली आणि आता अलिबागमध्ये प्रकार घडला. अजब म्हणजे फसवणुक झालेल्यांमधील अनेक लोकांना ही बोगस कंपनी आहे, एकनाएक दिवस बंद पडेल हे चांगले माहिती होते. पण सुरुवातील हमखास मोबदला मिळाल्याने जितके दिवस दामदुप्पट मोबदला घेता येईल अशा प्रयत्नात हे गुंतवणुकदार होते.
आपल्याला पैसे मिळतात म्हणून मित्रालाही मिळवून देण्यासाठी अनेकांनी आग्रह केला. अखेर आठवड्यापुर्वी कंपनीचा वेबपोर्टल बंद झालं. नंतर सबंधितांचे सर्व फोन बंद होत गेले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे गुंतवणुकदारांच्या लक्षात आलं. हा सर्व प्रकार केवळ 3 महिन्यात पूर्ण झाला. या 3 महिन्यात फसवणुकीचा आकडा अंदाजे 25 कोटींवर पोहोचला असल्याचं म्हटलं जातंय.
*पंचक्रोशीने राबवली एकत्रीत स्कीम*
गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील एकट्या कुरुळ गावात असे 4 ग्रुप कार्यरत होते. या गावातील लोकांनी लगतच्या गावातील आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही यात सामावून घेतले. आपल्यानंतर तिघांना सहभागी करुन घेतल्यावर पहिल्या लेव्हलसाठी 1 हजार रुपये, सहाजणांना सहभागी करुन घेतल्यानंतर दोन हजार रुपये मासिक पगार सुरु केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करुन घेण्याची चढाओढ या पंचक्रोशीत सुरु झाली होती. तीन महिन्यात या स्किममध्ये अलिबाग तालुक्यात 5 हजाराहुन अधिक लोकांनी आपले पैसे गुंतवल्याचे उघड होत आहे.
*दुसरा वेबपोर्टल कार्यान्वीत*
फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला गुगल पे वरुन थेट पैसे ट्रान्सफर करता येत असत, परंतु त्यानंतर युटीआर पासवर्ड वापरावा लागत असे. यासाठी दररोज संध्याकाळी बोनस जाहीर केला जात असे व्हॉटसअॅप मेसेज करुन कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली जात असे. हे सर्व काही दिवस सुरळीत होते. नॅशडॅक कंपनीच्या नावाने सुरु केलेला वेबपोर्टल बंद केल्यानंतर हीच पद्धत वापरुन फसवणुक करण्यासाठी एनवायएससी नावाचा नवा वेबपोर्टल सुरु करण्यात आला आहे. त्याच्या वेबलिंक येथील नागरिकांच्या मोबाईलवर येऊ लागल्या आहेत.
हा एक हायटेक गंडा आहे, मोबाईल तंत्रज्ञानातील कमतरतेचा पुरेपुर वापर करण्यापुर्वी लोकांच्या मानसिकतेचा त्यांनी पुर्ण अभ्यास केलेला आहे. कोणत्या भागातील लोकांकडे पैसे असतील याचीही या फसवणुक करणाऱ्यांकडे माहिती असून हे सर्व परदेशात राहून ऑपरेट होत असल्याचा संशय असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली.
कोणीही प्रतिसाद देत नसल्याचे समजल्यावर फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही एकत्र येऊन सायबर क्राईमकडे तक्रार दिलेली आहे. तपासासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यास आम्ही गुंतवणुकदार तयार आहोत , असे स्वप्नील पाटील यांनी सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा
मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा
- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, महापालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी तसेच सहआयुक्त, उपआयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, “मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे करावे. तसेच ज्या बालकांना गोवरची लागण झाली आहे त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावेत”.
स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमासाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म, उद्याने, मंडई, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, सागरी किनारे, पर्यटन स्थळे, फ्लायओव्हर या ठिकाणांची मिशन मोडमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. ३९०० स्वच्छतागृहांची दुरूस्ती, नव्याने उभारणी करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली.
स्वच्छ व सुंदर मुंबई अभियानात शासकीय तसेच निमशासकीय संस्थांबरोबरच नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले यांना सहभागी करून अभियान सर्वसमावेशक करणे, अभियान कालावधीत सर्वस्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमुलाग्र बदल (Behavioral Change) घडवून आणणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांतील असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचा-यांचे चांगले सहकार्य लाभले, असेही पालकमंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.
******
श्रीक्षेत्र कनकेश्वर*
*श्रीक्षेत्र कनकेश्वर*
अलिबाग, रायगड
संकलन - सुधीर लिमये पेण .
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते. असे हे अलिबागच्या ईशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वर स्थानाबद्दल दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासूर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासूर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासूराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिध्यर्थ शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव पडले.
सर्व पृथ्वी जिंकून परशुरामाने ती ब्राम्हणाला दान दिली. हे दान घेतल्यावर ब्राम्हणाने परशुरामाला सांगितले की, दान दिलेल्या भूमीवर तुला राहता येणार नाही. तेंव्हा या भूमीचा तू त्याग कर. ब्राम्हणाचे हे वाक्य ऐकून परशुरामाने सह्याद्री पर्वतावर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाशवाणी होऊन, तुझ्याजवळ असलेला परशु समुद्रात फेकून दे, तो समुद्रात जेथे पडेल तेथपर्यंत नवीन भूमी तयार होईल. या आकाशवाणीप्रमाणे परशुरामाने समुद्रात परशु फेकला. त्याप्रमाणे भूमी तयार झाली. असा हा कनकेश्वर परशुराम सृष्टीतला आहे. रेवसपासून कन्याकुमारीपर्यंत परशुरामाने प्रवास करुन अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले आहेत.
कनकेश्वर देवस्थान प्राचीन असून त्यास पौराणिक पार्श्वभूमी आहे. देवस्थान पर्वतावर ७५० पायऱ्या चढूनच दर्शनाला जावे लागते. या पायऱ्यांचे व पुष्करणीचे बांधकाम अलिबागच्या सरखेल राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकांनी १७६४ मध्ये स्वखर्चाने करवून घेतले. या सर्व पायऱ्यांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत.
कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा - अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असे. मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे कनकेश्वर देवासाठी वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्याकडून इ.स. १७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे जत्रा. ही कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला भरत असते. कार्तिक शु.१४ ला भरणाऱ्या श्री नागेश्वराच्या मोठ्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव येतो.
पूर्वी यात्रेच्या दिवशी आवास येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. या देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे.
कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. त्रिपुरी पोर्णिमेला येथील दीपमाळेला दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.
असे हे कनकेश्वर एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे श्रेय मिळते.
चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे.
स्त्रोत: विकिपीडिया.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...






