Monday, 14 November 2022

जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने पथदर्शी भूमिका बजावावी

 जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्यमहाराष्ट्राने पथदर्शी भूमिका बजावावी 

- केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 14 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यास प्राथमिकता दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘वॉर रुम’च्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन यासह विविध योजनांच्या कालमर्यादित आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            येथील सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय मंत्री श्री.शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय जल संपदा मंत्रालयाचे सचिव विनी महाजन, व्यवस्थापकीय संचालक विकास शील, सहसचिव आनंद मोहन, पंकजकुमार, 'एसपीआर'चे आयुक्त ए. एस. गोयल, केंद्रीय जल मंडळाचे चेअरमन सुनील कुमार, उपसचिव अरुणकुमार केम्भावी, जल आयोगाचे कुशविंदर व्होरा, विवेक चौधरी, आनंद मोहन, अरुणकुमार, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ग्रामविकास विभागाचे सचिव राजेशकुमार, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलजीवन अभियानाचे प्रकल्प संचालक ह्रषिकेश यशोद आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


            केंद्रीय मंत्री श्री. शेखावत म्हणाले, महाराष्ट्र हे योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यास आघाडीवर असलेले राज्य आहे. त्यामुळे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अटल भूजल योजना आदी योजनांची राज्यातील अंमलबजावणी गतीने पूर्ण करावीत. जलजीवन अभियानातील कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकारने या योजनांसाठी दिलेला निधी विहित वेळेत खर्च होईल आणि योजनांची कामे मार्गी लागतील, यासाठी राज्यस्तरापासून ते अगदी तालुकास्तरावर नियमितपणे आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यामध्ये जल शक्ती मंत्रालयाशी संबंधित राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांची अंमलबजावणी गतीने केली जाईल. केंद्र सरकारकडून राज्याला अधिकाधिक सहकार्य मिळत आहे. राज्य शासन सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सामान्य माणसांशी निगडीत असलेल्या स्वच्छ भारत मिशन, हर घर जल सारख्या योजना वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेतील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील कामे वेळेत पूर्ण करुन तेथील बळीराजाला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पुराचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा अवर्षणप्रवण भागाला लाभ देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प मार्गी लावला जाईल. केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी सरकार्य करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सनियंत्रण कक्ष स्थापणार – उपमुख्यमंत्री


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या सूचना उपयुक्त असून त्या दृष्टीने निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्राने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून खूप चांगले काम केले आहे. जलस्रोत बळकटीकरण चांगल्या प्रकारे झाले. त्या कामाला अधिक वेग दिला जाईल.


            पुराचे वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी नदी जोड प्रकल्प महत्वाचा आहे. त्यासाठी केंद्राने अधिक मदत करावी. बळीराजा जलसंजीवनी अभियानात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात काम सुरु आहे. या कामाला अधिक गती दिली जाईल. विविध प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. कामे वेळेत पूर्ण होण्याला प्राधान्य असून सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य पातळीवर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राज्यात राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे विविध योजनांची सद्यस्थिती, अमलबजावणीसाठी ची मााहिती दी ली

बाळ बाळ दिंन

 


बार बार दिन ये आये


 

Sunday, 13 November 2022

सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र' उपक्रम राबवणार

 सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र' उपक्रम राबवणार

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. १० : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत दि.१ डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय महिला वसतिगृहातील महिला व इतर गरजू महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती आर. विमला, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर, महिला व बाल विकासचे सह सचिव श्री. अहिरे एकात्मिक बाल विकास आयोगाचे विजय क्षिरसागर उपस्थित होते.


             मंत्री श्री.लोढा म्हणाले, महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकच व्यासपीठ असावे यासाठी तालुका ते राज्यस्तरापर्यंत सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुका ते राज्यस्तरापर्यंत तक्रारीचे निवारण होईपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येईल, यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना सर्वांना कळविण्यात येतील.


महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगारभिमुख प्रशिक्षण देणार


           शासकीय महिला वसतीगृहातील प्रवेशित तसेच इतर गरजू महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देवून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी मेंहदी, ब्युटीशियन, शिवणकाम, एब्रॉयडरी, आदरातिथ्य प्रशिक्षण सारखे रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. निवासी संस्थाची तपासणी करण्यासाठी आयुक्तालय स्तरावरून भरारी पथकांचे गठन करावे. दत्तक प्रक्रिया,अनाथ प्रमाणपत्र याचे वाटप विहीत वेळेत करावे, अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी दिल्या.


          महिला व बालविकास विभागाची पदभरतीची कार्यवाही तातडीने करावी. मुंबईतील एसआरए इमारतीत चालविण्यात येणा-या अंगणवाडी यांची सद्य:स्थिती, मुंबईमध्ये कंटेनर, अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत केलेली कार्यवाही, प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय राबविण्यात येणारे उपक्रम, गुजरात राज्याच्या धर्तीवर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.


            मानवी तस्करी, बालविवाह यासंदर्भात, राज्य महिला आयोगामार्फत महिलांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन तत्काळ मिळावे यासाठी लीगल क्लिनीक सुरू करणे, विधवा प्रथा निर्मुलन याबाबत सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.


*****

ओळखा पाहू झाड, सांगा काय नाव आहे


 

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार

 विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबई, दि. 11 :- आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 


            'टाइम टू ग्रो' मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत मंत्री श्री.केसरकर बोलत होते. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला, टाइम टू ग्रो मीडियाचे संस्थापक मनमीत खुराना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील एक सुवर्ण संधी आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण अधिक परिणामकारक ठरते यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात एक लाखांपेक्षा अधिक शाळा असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांवर अधिक भर दिला जात असून, कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणासाठी एचसीएल, टीआयएसएस या संस्थांसोबत करार करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नव्हती, तथापि त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले याचे विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व पटवून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


            शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी शिक्षणमंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी जाणून घेतल्या. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा त्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.


00000

तु असा जवळी राहा

 😊अनेक चांगले मेसेज पाठवूनही, *रिप्लाय न मिळाल्याने,* अर्जुनाने वैतागुन जेंव्हा *मोबाईल खाली* ठेवला...


तेंव्हा *श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये* समजावली...


- ज्यांना *तु आवडतोस,* ते न वाचताही *तुझ्या मेसेजला रिप्लाय* देतात .. कारण ते तुझे मित्र असतात .


- काहींना *तुझे मेसेज आवडतात,* पण पद ' प्रतिष्ठा ' व लोकं काय म्हणतील ? याचा विचार करून ते *रिप्लाय करीत नाहीत,* कारण ते चतुर असतात


- ज्यांना तु आवडत नाहीस त्यांना तुझा *मेसेज कितीही आवडला* तरी ते *कधीच रिप्लाय* करणार नाहीत..!!

कारण ते तुझे विरोधक असतात.


म्हणून हे पार्था ! 

 

तु *मोबाईल उचलीत* रहा!

तु *लिहीत* रहा !

तु *पाठवत* रहा !


*"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"*

ही वेळ सुद्धा निघून जाणार 

जय श्री कृष्ण 🌹🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi