Saturday, 12 November 2022

राज्यात ५३ मॉडेल आयटीआयसहवर्ल्ड स्किल सेंटर, एकात्मिक कौशल्य भवन प्रस्तावित

 राज्यात ५३ मॉडेल आयटीआयसहवर्ल्ड स्किल सेंटरएकात्मिक कौशल्य भवन प्रस्तावित

-         उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ११ - जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १ मॉडेल आयटीआय आणि राज्यात मुलींसाठी १७ मॉडेल आयटीआय असे एकूण ५३ मॉडेल आयटीआय निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व सुविधांनीयुक्त असे जागतिक स्किल सेंटर उभारण्यात येणार आहे. एकात्मिक कौशल्य भवन उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. केंद्र शासनाला सादर करण्यासाठी या प्रस्तावास मान्यता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी  एन.व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकरकौशल्य विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी रवींद्र धुर्जडकौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे तसेच जागतिक बँकेच्या सहकार्यातून राबविण्याचे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेले शिक्षण मंडळ आणि इतर संस्थांचे जागतिक बँकेच्या प्रकल्पामधून बळकटीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी मायक्रो इन्क्युबेशन सेंटर सुरु करणेउद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगाराला चालना देणेस्टार्टअप्ससाठी भांडवलाची उपलब्धतापीएमयूसह डाटा सेंटर तयार करणे असे विविध उपक्रम तथा प्रकल्प याअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तिला चांगले कौशल्य प्रशिक्षण मिळवून देण्याबरोबरच त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना चालना देण्यात येईल. यासाठी विभागाला वित्त विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले कीकारखाने आणि उद्योगांमधील बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञानानुसारच आता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील आयटीआयचे अद्ययावतीकरण करण्याकरीता विभागाने पुढाकार घेतला आहे. येत्या काळात कौशल्य विकास विभागाचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी विविध उपक्रम आणि प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेतअसे त्यांनी सांगितले.

०००००

अंधेरीतील गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

 अंधेरीतील गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

- मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

          मुंबई, दि,11:अंधेरीतील गोखले उड्डाणपूल लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


        मंत्रालयात गोखले उड्डाणपुलासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत श्री. लोढा बोलत होते.


         बैठकीस आमदार अमित साटम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


       पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम रेल्वेकडून 3 ते 4 महिन्यांत करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पुलाच्या प्री कास्टिंगचे काम याचदरम्यान सुरू राहिल. मे 2023 अखेरपर्यंत गोखले पुलाची किमान 1 मार्गिका (लाईन) सुरू करण्याचा विचार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. या पुलासंदर्भात रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा व पुल देखील पूर्ण व्हावा, याकरिता प्रयत्न केले जात आहेत, असेही पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले.


0000


 

Mediclaim insurance

lakshvedhi mass mediya9876824365

नमस्तुबी

 


मी आलोय, मोदक करा

 


आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

 *सर्वांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा*

 लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी:

  1. बीपी: 120/80

  2. नाडी: 70 - 100

  3. तापमान: 36.8 - 37

  ४. श्वास : १२-१६

  5. हिमोग्लोबिन: पुरुष -13.50-18

 महिला - 11.50 - 16

  6. कोलेस्टेरॉल: 130 - 200

  7. पोटॅशियम: 3.50 - 5

  8. सोडियम: 135 - 145

  9. ट्रायग्लिसराइड्स: 220

  10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: PCV 30-40%

  11. साखरेची पातळी: मुलांसाठी (70-130) प्रौढांसाठी: 70 - 115

  12. लोह: 8-15 मिग्रॅ

  13. पांढऱ्या रक्तपेशी WBC: 4000 - 11000

  14. प्लेटलेट्स: 1,50,000 - 4,00,000


  15. लाल रक्तपेशी RBC: 4.50 - 6 दशलक्ष.

  16. कॅल्शियम: 8.6 -10.3 mg/dL

  17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली.

 18. व्हिटॅमिन बी 12: 200 - 900 pg/ml.

 *ज्येष्ठांसाठी खास टिप्स म्हणजे 40/50/60 वर्षे:*

 *१- पहिली सूचना:* तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या, आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात. दररोज किमान 2 लिटर.

 *२- दुसरी सूचना:* शरीराकडून जास्तीत जास्त काम करवून घ्या , शरीराची हालचाल झाली पाहिजे, जसे की चालणे, पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने.

 *३-तिसरी टीप:* कमी खा...जास्त खाण्याची लालसा सोडून द्या...कारण ते कधीच चांगले आणत नाही. स्वत: ला वंचित करू नका, परंतु प्रमाण कमी करा. प्रथिने, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ जास्त वापरा.

  *४- चौथी सूचना:* अगदी आवश्यक असल्याशिवाय शक्यतो वाहन वापरू नका. तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी, कोणाला भेटायला किंवा काही कामासाठी जात असाल तर, पायावर चालण्याचा प्रयत्न करा. लिफ्ट, एस्केलेटर वापरण्याऐवजी पायऱ्या चढा.

  *५- पाचवी सूचना* राग सोडा, काळजी करणे थांबवा, गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्रासदायक परिस्थितीत स्वत: ला गुंतवू नका, ते सर्व आरोग्य खराब करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात. सकारात्मक लोकांशी बोला आणि त्यांचे ऐका.

 *६- सहावी सूचना* सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या

 तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा, हसवा आणि बोला! पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे, पैशासाठी आयुष्य नाही.

 *7-सातवी टीप* स्वत:बद्दल, किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकत नाही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका.

  त्याकडे दुर्लक्ष करा आणि विसरा.

 *८- आठवी सूचना* पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता, सौंदर्य, जात आणि प्रभाव;

 या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवतात. नम्रता ही लोकांना प्रेमाने जवळ आणते.

 *९- नववी टीप* जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही. ही एका चांगल्या जीवनाची सुरुवात आहे. आशावादी व्हा, स्मृतीसह जगा, प्रवास करा, आनंद घ्या. आठवणी निर्माण करा!

 *१०- दहावी सूचना* तुमच्या लहान मुलांना प्रेमाने, सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा! काही उपहासात्मक बोलू नका! चेहऱ्यावर हसू ठेवा!

 तुम्ही भूतकाळात कितीही मोठे पद भूषवले असले तरी ते वर्तमानात विसरून जा आणि या सर्वांशी मिळून मिसळून राहा!


 *#आरोग्य दिनाच्या शुभेच्छा*

💐🌹🙏🏻🌹💐

राष्ट्रीय लोक अदालत

 राज्यात उद्या एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत

 

        मुंबई, दि.11 : राज्यातील उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठे, जिल्हा व तालुका न्यायालये तसेच न्यायाधिकरण येथे उद्या शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोकअदालतीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांनी केले आहे.

        राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली यांच्या आदेशान्वये या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ज्युपिटीस (JUPITICE) या कंपनीच्या सहकार्याने ई-लोक अदालतीचे आयोजन केले आहे. लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची दिवाणी दावे, धनादेश अनादर प्रकरणेबँक वसूली प्रकरणे, अपघात प्रकरणेकामगार वाद प्रकरणेवीज, पाणी व कर यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, तसेच वैवाहिक वादाची प्रकरणेनोकरी बाबतची प्रकरणी ज्यात पगारइतर भत्ते व निवृत्ती वेतनाचे फायदे समाविष्ट आहेत असे प्रकरण, महसूल बाबतची प्रकरणे तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगाची प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.

        राष्ट्रीय लोकअदालतीत  वाद मिटविण्यासाठी सहभाग घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळतोपैशांची आणि वेळेची बचत होतेनिकाल लवकर लागतो तसेच लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. त्यामुळे यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

0000

 

 


Featured post

Lakshvedhi