Wednesday, 9 November 2022

रेल्वेसाठी लागणार्‍या उत्पादनांमध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग वाढवु

 रेल्वेसाठी लागणार्‍या उत्पादनांमध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग वाढवु - रावसाहेब दानवे

------- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या मागणीला यश------------

नवी दिल्ली ः रेल्वे विभागासाठी लागणार्‍या विविध उत्पादनांपैकी खाजगी उद्योगांसाठी अधिक उत्पादने खुली करू अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ललित गांधी यांना दिली.

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली मधील रेल भवन येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वे विभागासाठी लागणारी अधिकाधिक उत्पादने खाजगी उद्योगांसाठी खुली करून देण्यासाठी केलेल्या मागणीचा पाठपुरावा व अन्य मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.


रेल्वेसाठी लागणारे विविध सुटे भाग, उपकरणे उत्पादन करण्याची परवानगी खाजगी उद्योगांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग वाढण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी उपयोगी ठरेल अशी भुमिका ललित गांधी यांनी मांडली.


यावेळी रेल्वे माल वाहतुक, प्रवासी वाहतुकीसंबंधी विविध मागण्याही सादर करण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पुणे नवीन रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणार्‍या मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, नाशिक- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे, कोरोना नंतर सेवा बंद केलेल्या सर्व गाड्या पुर्ववत सुरू करणे, कोरोना काळानंतर विविध एक्सप्रेस चे बंद केलेले सर्व थांबे पुर्ववत सुरू करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश होता.

तसेच कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ येथे पार्सल सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

यासर्व मागण्यांसाठी आवश्यक तो अहवाल तात्काळ तयार करण्याचे निर्देश रेल्वे राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

तसेच 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत लखनौ येथे संपन्न होणार्‍या रेल्वे च्या डिझाईन व संशोधन केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स' च्या शिष्टमंडळाला विशेष निमंत्रण दिले.


नेत्रदीपक दृश्य चंद्राचे भ्रमण

 कॅनडा, अलास्का आणि रशियाच्या सीमेदरम्यान आर्क्टिक सर्कलमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हे फक्त काही सेकंद टिकते, परंतु नेत्रदीपक दृश्याचे कौतुक करणे योग्य आहे. ही घटना केवळ वर्षातून एकदाच 36 सेकंदांसाठी पाहिली जाऊ शकते; चंद्र त्याच्या सर्व वैभवात दिसतो आणि नंतर अदृश्य होतो. ते इतके जवळ आहे की ते पृथ्वीशी आदळणार आहे असे दिसते, त्यानंतर लगेचच 5 सेकंदांसाठी संपूर्ण सूर्यग्रहण होते जेथे सर्व काही अंधारून जाते. ही घटना केवळ पेरीजी येथे घडते (ज्या ठिकाणी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे) आणि तेथूनच आपला ग्रह किती वेगाने फिरतो हे आपण जाणू शकतो. अप्रतिम व अद्भुत !!! 👇🏻


प्रपंच

 *प्रपंच* करतो *आवडीने*,

*परमार्थ* मात्र *सवडीने*.

नाही *पूजा* नाही *ध्यान*, 

*मोबाईलशी अनुसंधान*


नामस्मरण *boring* फार 

त्याने काय *होणार* यार ?

*देवाने* करावी कृपा *खास* 

*गप्पा* मारतो *तासनतास*


*जप* करतो *माळेवर* 

पण *खरे* प्रेम *पैशावर*

*खिचडीसाठी* करतो *उपास*

*भक्तीमध्ये* पूर्ण *नापास*


*स्वतःच्या* पानात वाटयांची *दाटी*,

*नैवेद्याला* छोटी *वाटी*

*संकट* आल्यावर देव *आठवतो*,

*नवस* बोलून *deal* करतो.


*अभिषेक* मोठ्या *थाटात* करतो, 

*return* वरती *डोळा* असतो.

*सर्व* करतो *स्वतःसाठी*,

पण *देव* हवा *सदा* पाठी.


*देवाकडं* सारख *मागणं*,

*माणसा* तुझं काय हे *वागणं* ?


*शक्ती* दे, *युक्ती* दे, *बुद्धी* दे, 

*विद्या* दे *नोकरी* दे, *घर* दे, 

*बायको* दे, *मुलं* दे *सुख* दे, 

*समाधान* दे, *यश* दे, *कीर्ती* दे 

आणि हे सारं *कायम टिकू* दे,  

*असाही* देवा *वर* दे ! 


*हसून* देव *म्हणतो*,

*माणसा* थकलो तुला *देऊन* सारखा 

*मागण्या* मागतोस फारच *मस्त*,

पण *एवढा* मी नाही *स्वस्त*


*मागून* मागून *थकत* नाहीस 

*थँक्यू* सुद्धा *म्हणत* नाहीस !

*भक्तीमध्ये* करतोस *लबाडी*, 

अरे *चाललीये* कुठे तुझी *गाडी*.


*एवढं* सगळं *द्यायचं* म्हणतोस,

पण *माझ्यासाठी* काय *करतोस*?

*थोडीफार* आठवण *काढून*, 

*मलाच* तुझी *सेवा* सांगतोस.


अरे *एकदा* तरी म्हण *राजा*, 

*देवा* मला *भक्ती* दे.

*मनी* तुझे *प्रेम* दे 

*पायी* तुझ्या *मुक्ती* दे.


तुझे *गीत* गाण्यासाठी 

*कंठामध्ये सूर* दे 

तुझे *रूप* बघण्यासाठी 

डोळ्यांमध्ये *भूक* दे 


तुझा *महिमा* ऐकण्याची 

कानांना या *आस* दे

*तुझे नाम घेण्यासाठी* 

*माझा* *प्रत्येक* *श्वास दे. .!* 


*सुटो* माझी *आसक्ती*,

*लाभो* मला *विरक्ती*.

*अंतकाळ साधण्या इतके* 

*नामामध्ये प्रेम दे*

 

*अंतकाळ साधण्याइतके*

*नामामध्ये प्रेम दे*


*।।रामकृष्ण हरि।।*

येथुन पुढे धर्मादाय अंतर्गतील सर्व रुग्नालयांना धर्मादाय हा शब्द नावात वापरणे बंधनकारक*

 *येथुन पुढे धर्मादाय अंतर्गतील सर्व रुग्नालयांना धर्मादाय हा शब्द नावात वापरणे बंधनकारक*


कार्यसम्राट आरोग्यदुत आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त आरोग्य निधी मिळवणारे एकमेव आमदार अॅड. राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नाला यश.


पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार.

पुणे शहरातील *रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल* ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते.मुळात ही सर्व मोठमोठी

धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.

याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार राहुलदादा कुल यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, वेळोवेळी पाठपुरावा करुन शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या प्रयत्नाला यश आले आहे. याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे.

उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयांसह अशा 56 रुग्णालयांचा धर्मादायमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर धर्मादाय कार्यालयाचे नियंत्रण आहे. म्हणूनच याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे हॉस्पिटल असोसिएशनला डिगे यांनी आदेश दिले आहेत. या 56 पैकी नऱ्हे येथील नवले_रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.


*राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू*

धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.

जिंदगी

 *Mistakes are painful,but as a time goes by,they become collection of experiences called "lessons".*

        🌹🌹🌹🌹🌹

   

     *Have a wonderful Wednesday*

वेळ , मित्र आणि नाती

 *"वेळ , मित्र आणि नाती*


 *ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.*


   *"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"*  

          

   

    

जन हितार्थ

 आपके बैंक/एनबीएफसी/ई-वॉलेट द्वारा 30 दिनों के भीतर शिकायत का निपटान नहीं किया गया/प्राप्त जवाब से आप संतुष्ट नहीं हैं? आरबीआई के लोकपाल को https://cms.rbi.org.in पर संपर्क करें । -RBI

Featured post

Lakshvedhi