Monday, 7 November 2022

आनंदी पहाट* *त्रिपुरारी पौर्णिमेची*

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩       


           🌻 *आनंदी पहाट* 🌻


              *त्रिपुरारी पौर्णिमेची*


🚩🔱🚩🔆🪔🔆🚩🔱🚩


        *भारतीय संस्कृतीतील पौराणिक कथांमुळे सण निर्माण झालेत पण अजूनही त्याचे संदर्भ भविष्यात अधिकाधिक स्पष्ट होत आहेत.*

        *त्रिपुर.. अर्थात तीन अशी नगरे जी आकाशातही फिरू शकत होती. येथील असूर शक्तीशाली झाला. मानव.. देवदेवतानाही अर्थातच सज्जन शक्तीला त्रास देवू लागला. मग सारे शरण गेले ते शंकरांना.*

        *मानवाची चिंता परमेश्वरच करतो. चातुर्मासात भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत विश्वाचा गाडा भगवान शंकर हे चालवून मानवाला आश्वस्त करतात.*

        *मदमत्त त्रिपुरासूराने मानवाला.. देवादिकांना वेठीस धरले होते शिवाय त्याला मरणाचे भय नव्हते. त्याने तपस्येने ब्रह्मदेवाकडून अभयाचे वरदानही प्राप्त केले होते. पण तरीही सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या असूराचा अंत हा होतोच.*

        *या त्रिपुरासूर दैत्याला शंकराने आजच्याच पौर्णिमेला नष्ट केले म्हणून आज भयमुक्तीची.. आनंदाने दिवे, काकडा लावून संपन्न त्रिपुरारी पौर्णिमा.*

        *जीवनातील आनंदाचे मूळ दडलेय ते मानवी स्वभावात. लोभ.. मोह आणि अहंकार हे स्वभावातील त्रिपूर. त्यांच्यामुळे जीवनात दुःख निर्माण होत जीवन अंधकारमय होते. चांगल्या मनुष्याचाही असूर होतो. या जाणिवेसाठीच कथा आहेत.*

        *लोभ.. मोह.. अहंकार हे दैत्याचे गुण. ते वाढले की सामान्य मनुष्यही दैत्य होतो. पण हे दैत्य गुण नष्ट झाले की जीवन उजळणारच. आज दैत्य गुणांचा अर्थात अवगुण नष्ट व्हावेत म्हणून शेकडो दिवे उजळणार. मंदिरांच्या दगडी दीपमाळातीलही दिवे हा अंधार नष्ट करणार. गावगंगेत दान केलेले.. वाहात जाणारे दिवे गावोगावाचा अंधार नष्ट करणार. अंधार कितीही असू दे.. पणतीच्या या लहानश्या वातीने लाखो दिवे लागणार. लाखोंचे जीवन उजळणार.*

       *भगवान शंकराचे पुत्र कार्तिक यांचे दर्शन आज सर्वांना मिळणार. तर कोकणात आज देवदिवाळी साजरी होणार.*

         *मानवाची काळजी परमेश्वर सदैव करतो. भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीत मानवाचे रक्षण केले ते भगवान शंकरांनी. आज ते पुन्हा स्वगृही कैलासी परतणार. आज या दोघांची भेट होते म्हणून आज शिवाला तुळस तर विष्णूंना बेल वाहतात.*

        *या त्रिपुरासूराला नष्ट केल्याने शंकराचे नाव पडले त्रिपूरारी. आज त्यांच्याकडे हीच प्रार्थना की या जगातील हे भयावह अंधारपर्व संपवून चराचर चैतन्याने उजळवून टाका. हे भोलेनाथा संकटाना दूर सारणारा अशी तुझी कीर्ती आहे.*


🌷🔱🌸🔆🙏🔆🌸🔱🌷


  *_शंभो, शंकरा, करुणाकरा,_*

  *_जग जागवा !_*


  *_अंधार हा लोपवा_*

  *_द्यावा प्रकाश नवा_*

  *_चराचर उजळाया चैतन्याची_* 

  *_ज्योत चेतवा, हे शिवा !_*


  *_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*

  *_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*


  *_संमार्जिली अंगणे_*

  *_पान्हावली गोधने_*

  *_आसावला आसमंत अमृताने_* 

  *_चिंब नाहवा, हे शिवा !_*


  *_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*

  *_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*


  *_तू आपदा वारणारा_*

  *_तू दु:खिता तारणारा_*

  *_होई कृपावंत, विश्वातले आर्त,_*

  *_अभयंकरा शांतवा, हे शिवा !_*


  *_सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !_*

  *_हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !_*


🌹🔱🌷🪔🌻🪔🌷🔱🌹


  *गीत : सुधीर मोघे* ✍

  *संगीत : सुधीर फडके*

  *स्वर : अनुराधा पौडवाल*

  *चित्रपट : थोरली जाऊ (१९८३)*


  🎼🎶🎼🎶🎼 🎧


        ‼ *ॐ नमः शिवाय* ‼

         

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०७.११.२०२२*


🌻🪔🌸⚜🔱⚜🌸🪔🌻

चलो कोलाड*

 *चलो कोलाड*

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांच्या मानवी साखळी आंदोलनात सहभागी व्हा!

🙏🙏🙏


*नमस्कार मित्रहो,*


मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पत्रकारांनी आंदोलन उभे करीत चौपदरीकरण करण्यास शासनाला भाग पाडले. मात्र आज ११ वर्षे काम सुरु होऊन उलटून गेल्यानंतर या महामार्गाची दुरवस्था कायम आहे. चौपदरीकरणाचे काम देखील अपूर्णच आहे. *पेण ते इंदापूर दरम्यान महामार्गावर भले मोठे खड्डे* पडले आहेत. या खड्डयांमुळे महामार्गच गायब झाला आहे. त्यामुळे सदर महामार्गावर पुन्हा मोठया प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने या महामार्गाची दुुरुस्ती करण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी अनेकदा आश्‍वासने दिली आहेत. मात्र महामार्गाची दुर्दशा कायमच आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुुरुस्ती व्हावी या मागणीसाठी *रायगड प्रेस क्लबच्या* वतीने कोकणासह रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे *बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता कोलाड* ता.रोहा येथे महामार्गावर शांतता आणि लोकशाही मार्गाने मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार *मा.श्री.एस.एम.देशमुख सर* यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात *मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त मा.श्री.किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे* यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या आंदोलनासाठी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार सदस्यांसह वेळेवर आंदोलनाला उपस्थित राहून आपल्या एकजूटीची ताकद पुन्हा एकदा निद्रीस्त शासन आणि प्रशासनाला दाखवून देऊ. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान दहा ते पंधरा सदस्यांनी उपस्थिती रहावे असे आवाहन करत आहोत.

कळावे.


*बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२*

*सकाळी १०:३० वाजता*

*कोलाड ता.रोहा*


निमंत्रक :- 

*रायगड प्रेस क्लब कार्यकारिणी व सर्व सदस्य.*

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

            मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.


००००

पायाभूत सुविधांबाबतची माहिती प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेसोबतप्राधान्याने जोडावी

 पायाभूत सुविधांबाबतची माहिती प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेसोबतप्राधान्याने जोडावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 7 : प्रधानमंत्री गतीशक्ती योजना पायाभूत सुविधांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. आपल्याकडे विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे. तथापि संबंधित विभागांनी ही माहिती एका पोर्टलवर एकत्रित ठेवावी. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटरने (एमआरसॅक) सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, एमआरसॅकचे संचालक डॉ. ए.के.जोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधांसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांना प्रधानमंत्री गती शक्ती योजनेशी जोडण्यासाठी त्या प्रकल्पांची माहिती एकत्रितपणे पोर्टलवर ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने नियोजन करून तातडीने ही सर्व माहिती अपलोड करण्यात यावी. सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्राधान्याने पुढाकार घ्यावा. तसेच एमआरसॅकला ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.


00000

राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा

 राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना

आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 7 : राज्यातील विकास प्रकल्पांना एशियन डेव्हलमेंट बँकेचे मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले.


            एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत एडीबीच्या प्रतिनिधी मंडळासह राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, संबंधित विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, ‘देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. राज्य शासनामार्फत सामाजिक आणि आर्थिक विकासाचे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून ग्रामीण भागात विकासाचे आणखी प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदल आणि अनिश्चित पाऊस यामुळे कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागातील पाणी, नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कमी पावसाच्या भागात वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. 


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 परिषदेत केलेल्या आवाहनानुसार राज्य शासन प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागांतर्गत पारंपरिक इंधनावर चालत असलेल्या बसेस ग्रीन आणि स्वच्छ इंधनावर परिवर्तित केल्या जाणार आहेत. एडीबीच्या सहकार्याने शासनाचे मेट्रो प्रकल्प देखील सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये यापुढे देखील एडीबीचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.


            ऊर्जा क्षेत्रात राज्य महत्त्वपूर्ण योजना राबवित असून शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळावी यासाठी सौर उर्जेवर फिडर चालविण्यात येणार आहेत. यामुळे वीज उपलब्ध होण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाला देखील लाभ होईल असे सांगून राज्याचे महत्वाकांक्षी प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूम मध्ये निर्णय घेतले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एडीबीच्या प्रतिनिधींना दिली. राज्याच्या विकासाचे आणि पर्यावरणपूरक असे हे सर्व प्रकल्प दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण केले जातील, असे सांगून राज्याच्या प्रस्तावित प्रकल्पांना एडीबीने निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


            यावेळी जलसंपदा, परिवहन, ऊर्जा विभागांमार्फत प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सादरीकरण करण्यात आले.


00000

दिव्य दिवाळी


 

वास्तु शास्त्र*

 *वास्तु शास्त्र*

*ईशान्य दिशा (देवघर)*

साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,


 संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे


१) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल


२) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा


३) ईशान्येला नेहमी उतार असावा


४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये


५) या कोपऱ्यात संडास कचराकुंडी, संडासची टाकी, चप्पल, जिना, विजेचा मीटर, मोठी झाडे स्वयंपाकघर, वाहनतळ असणे अशुभ


६) वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वास्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अशा जागी वंश नाश होतो दारिद्रय येते. विनाकारण संकटे येतात.


७ ) काही महाभाग (ज्योतिष) ईशान्येला संडास असेल तरी विना तोडफोड उपाय करतो असे सांगून पैसे घेतात अशा गोष्टीवर ते तोडल्याशिवाय खरोखरच उपाय नाही उगीचच खोटे उपाय करू नका आणी कुणाला हि ईशान्ये ला संडास असताना विनातोड्फोड उपाय करून फरक पडला असल्यास मला नक्की कळवा


८) विनातोड्फोड उपाय वास्तूमध्ये होतच नाही असे नाही पण विनातोड्फोड ६० ते ७० % उपाय नक्कीच होतात.


९) या जागी रोज देवपूजा करावी , दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा.


१०) इथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच , अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले चालतील


      *पूर्व दिशा*


१) या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य ,धन व बुद्धी मध्ये वाढ होते 


२) हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धन नाश होतो


 ३) पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते 


४) या दिशेला घराचा दिवाणखाना असावा 


५) मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असव्यात 


६) या जागी संडास असल्यास रुधय रोग, रक्तविकार, उष्णज्वर, शिरोरोग होतात असे अनुभव आहेत.


 ७) या जागी फिक्का गुलाबी, क्रीम, पांढरा , असे रंग असावे.


८) या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत.


 ९) या दिशेला कुंपण इतर दिशे पेक्षा कमी उंचीचे असावे.


१०) राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा.




   *आग्नेय दिशा*


१) या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते.


२) या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विचेची मोटार अश्या वस्तू असाव्यात.


 ३) आग्नेय दिशेला विहीर कुपनलिका पाण्याची टाकी असल्यास शत्रूंचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात.


 ४) या दिशेला वाहनतळ करू शकता.


५) हा कोपरा दुषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो. 


६) या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा. 


७) या दिशेला दार असल्यास संबधित तज्ञाकडून उपाय करून घ्यावेत अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात.


 ८) या दिशेला हलका गुलाबी फिक्कट केसरी रंग देऊ शकता.


९) अग्नेयेचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात.


    *दक्षिण दिशा*


१) या दिशेला दार अशुभ आहे. या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो आजारपण असते.


 २) हि दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असव्यात.


 ३) या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृत्यू होतात.


 ४)दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लाऊ नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे.


 ५) या दिशेला उंच झाडे लावावीत.


 ६) या दिशेला निळा भुरका रंग चालेल.


 ७)या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कलह असतो.


८) दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते.


 ९) या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण असते.


 १०) या दिशेला जिना शुभ फळ देतो.


 ११) या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात.



    *नैऋत्य दिशा*


१) हि दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी.


 २) या दिशेला घरातील मोठ्यांचे बेड रूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी.


 ३)या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये.


 ४) हि दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो.


 ५) या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल.


 ६) या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अति उत्तम


७) जी व्यक्ती घरात या जागच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते.


 ८) या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा.


 ९) या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकीर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात तसेच संकटांची मालिका चालू राहते असा अनुभव आहे.




     *पश्चिम दिशा .*


१) या दिशेला नेहमी संडास, बाथरूम असावे.


२) या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते.


३) हि दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते.


४) या दिशेला सेप्टिक टैंक चालेल.


५) प्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी.


६) ईशान्य दिशे पेक्षा जास्त उतार असल्यास दुख भोगावे लागेल.


७) गडद सर्व रंग चालतील.




     *वायव्य दिशा*


१) या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेड रूम असावे.


२) या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ 


३) या दिशेला विहीर कुपनलिका, जमिनीच्या खालचा पाण्याचा साठा पक्षाघात वेडेपणा कावीळ असे रोग दर्शवतात


 ४) या दिशेला जिना शुभ


 ५) ज्यांचे विवाह जमत नाही अश्या व्यक्तींनी या दिशेला झोपावे.


६) व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो.


 ७) या दिशेला संडास चालेल.




    *उत्तर दिशा .*


१) साक्षात कुबेराची हि दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसे कमी पडत नाही 


२) या दिशेला नेहमी उतार असावा…


३) या दिशेला पाण्याचा साठा शुभ


 ४) या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी.


५)हि दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी.


६) या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी.


७) महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी. 


८) या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी 


९) या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते 


१०) मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे.

Featured post

Lakshvedhi