*चलो कोलाड*
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांच्या मानवी साखळी आंदोलनात सहभागी व्हा!
🙏🙏🙏
*नमस्कार मित्रहो,*
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पत्रकारांनी आंदोलन उभे करीत चौपदरीकरण करण्यास शासनाला भाग पाडले. मात्र आज ११ वर्षे काम सुरु होऊन उलटून गेल्यानंतर या महामार्गाची दुरवस्था कायम आहे. चौपदरीकरणाचे काम देखील अपूर्णच आहे. *पेण ते इंदापूर दरम्यान महामार्गावर भले मोठे खड्डे* पडले आहेत. या खड्डयांमुळे महामार्गच गायब झाला आहे. त्यामुळे सदर महामार्गावर पुन्हा मोठया प्रमाणावर अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने या महामार्गाची दुुरुस्ती करण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी अनेकदा आश्वासने दिली आहेत. मात्र महामार्गाची दुर्दशा कायमच आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुुरुस्ती व्हावी या मागणीसाठी *रायगड प्रेस क्लबच्या* वतीने कोकणासह रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे *बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता कोलाड* ता.रोहा येथे महामार्गावर शांतता आणि लोकशाही मार्गाने मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार *मा.श्री.एस.एम.देशमुख सर* यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात *मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा.श्री.किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे* यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या आंदोलनासाठी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार सदस्यांसह वेळेवर आंदोलनाला उपस्थित राहून आपल्या एकजूटीची ताकद पुन्हा एकदा निद्रीस्त शासन आणि प्रशासनाला दाखवून देऊ. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान दहा ते पंधरा सदस्यांनी उपस्थिती रहावे असे आवाहन करत आहोत.
कळावे.
*बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२*
*सकाळी १०:३० वाजता*
*कोलाड ता.रोहा*
निमंत्रक :-
*रायगड प्रेस क्लब कार्यकारिणी व सर्व सदस्य.*
No comments:
Post a Comment