*झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही.. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते.. तसेच आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ असतो...!!*
*🙏 शुभ सकाळ 🙏*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही.. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते.. तसेच आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ असतो...!!*
*🙏 शुभ सकाळ 🙏*
सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी आपण सर्व उभे राहू.
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ध्येयपूर्ती राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण.
मुंबई दि. 5: नूतन गुळगुळे या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुलांना आधार देण्याचे महत्वाचे काम केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत आपण सर्व नागरिक दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी येथे आयोजित सातव्या 'ध्येयपूर्ती पुरस्कार' कार्यक्रमांतर्गत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात अपूर्व आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. या सोहळ्यास 'नानावटी मॅक्स हॉस्पिटल'चे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ.संजय दुधाट, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे उप-व्यवस्थापकीय संचालक आनंद पेजावर, कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या संचालक आम्रपाली साळवे व नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, समाजात अशा अनेक सेवाभावी संस्था समाजसेवचे काम करीत आहेत. त्या संस्थांना प्रेरणा देण्याचे काम नूतन गुळगुळे फाउंडेशन करीत आहे. आज कर्तृत्ववान दिव्यांगांच्या कार्याचा या संस्थेने गौरव केला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी या संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. शासनाच्या वतीने दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात एसबीआय जनरल तर्फे 30 लाख रूपयांचा तसेच कोचीन शिपयार्ड लिमिटेड तर्फे 50 लाख रूपयांचा धनादेश सीएसआर निधीतून नूतन फाउंडेशन संस्थेला देण्यात आला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला.
रोहयो अंतर्गत सिंचन विहिरींची कामे जलद गतीने पूर्ण करणार - संदिपान भुमरे.
मुंबई, दि.5 :राज्यातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामासाठी प्रमाणित संचालन प्रक्रिया (एसओपी) तयार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ही कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.
मंत्री श्री.भुमरे म्हणाले,महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावरच केला आहे. काळपरत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलेला आहे. अलीकडेच वैयक्तिक कामांमध्ये किमान 60 टक्के राशी खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारकडून प्राप्त झाले आहे. अर्थात मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.
मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचे ठरविलेले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहिरी खोदणे शक्य आहे. मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबांचे जीवनमान उंचावेल, पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल असे मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.
मंत्री श्री.भुमरे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करताना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये लाभधारकाची निवड, विहिरींसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती, अर्जासोबत जोडायची कागदपत्रे, ग्रामपंचायतनिहाय विहिरींची कामे मंजूर करताना विचारात घ्यावयाच्या बाबी, सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी तसेच
सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्वेही समाविष्ट करण्यात आली आहेत. विहीर कोठे खोदावी, कोठे खोदू नये, जिल्हास्तरावरील सेमिनार, आर्थिक मर्यादा, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींबाबत कार्यान्वयीन यंत्रणा, विहीर कामांच्या पूर्णत्वाचा कालावधी, विहिरीच्या कामांची सुरक्षितता, विहिरीच्या कामांची गुणवत्ता याबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया तयार करण्यात आली आहे.
00000000
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
*मराठी आहात! मग ह्या गोष्टी लक्ष्यात असुद्या!*
*1) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.*
*2) रशिया, ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.*
*3) हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.*
*4) कराचीत (पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.*
*5) मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.*
*6) मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.*
*7) संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.*
*8) महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.*
*9) देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.*
*10) सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.*
*11)पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते. तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व हिंदी तृतीय क्रमांकावर होती. आज मराठीचे स्थान दहावे आहे.*
*मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल!*
*मित्रांनो तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो कि या पोस्टला अभिमानाने शेअर करा!*
*जय हिंद! जय महाराष्ट्र!*
*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.*💫💫🚖🚖💫💫
यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि मराठी पत्रकार परिषद मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://kutumbapp.page.link/DGa7MoWs4iziKN3z7