सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 25 October 2022
Monday, 24 October 2022
सुदिन
दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने काम करणार अधिकारी व कर्मचारी
मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी विविध संस्था आणि खात्यांचे कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक; तर अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांना केले ३ नोव्हेंबर २०२२ रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २३:- "आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी" या कवि - संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या समर्पक शब्दांनी व्यक्त होणाऱ्या दिवाळीला "सणांचा राजा" असंही म्हटलं जातं. याच दिवाळीनिमित्त अनेक मुंबईकर आपापल्या गावी जाऊन दिवाळी साजरी करतात. तर अनेक जण आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात. मात्र, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व विधानसभा' मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचा-यांपैकी अनेक याला अपवाद ठरले आहेत. निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत असणा-यांपैकी अनेक अधिकारी व कर्मचारी हे यंदाच्या दिवाळीतील सर्व दिवशी निवडणूक कर्तव्यार्थ समर्पित भावनेने काम करणार असल्याची माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हर' यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे.
निवडणूक विषयक विविध स्तरीय प्रक्रिया पार पाडण्याकरिता यंदाच्या पोटनिवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, म्हाडा, महावितरण, कामगार आयुक्तालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य शासनाचे विविध विभाग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक विविध बाबी व प्रक्रिया करण्यासाठी असलेला कालावधी पुरेसा आहे. मात्र, असे असले तरी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचारी हे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी देखील कार्यरत राहून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देत यंदाची दिवाळी एका वेगळ्या अर्थाने अधिकाधिक प्रकाशमय करणार आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी 'अंधेरी पूर्व' मतदारसंघात सुटी घोषित करण्यात आली आहे, मात्र ती सुट्टी हे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे; हे लक्षात घेऊन सर्व संबंधित मतदारांनी अधिकाधिक संख्येने आवर्जून मतदान करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
000
पोटनिवडणुक
दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने काम करणार अधिकारी व कर्मचारी.

Sunday, 23 October 2022
दीपावली निमित्त
दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा
मुंबई,दि.२३:-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळी निमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता व उत्तम आरोग्य घेऊन येवो तसेच आपले राज्य विविध क्षेत्रात प्रगतीची शिखरे सर करो, ही मंगल कामना करतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
0000
Maharashtra Governor wishes people Happy Diwali.
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended greetings to the people on the occasion of Diwali. In his message, the Governor has said:
"I send my heartiest greetings and good wishes to all on the auspicious occasion of Diwali. May the festival of light and happiness bring peace, prosperity and good health to all and may our beloved State scale new peaks of progress in various walks of life. Happy Diwali".
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...