Monday, 24 October 2022

सुदिन











दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने काम करणार अधिकारी व कर्मचारी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी विविध संस्था आणि खात्यांचे कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुकतर अंधेरी पूर्व परिसरातील मतदारांना केले ३ नोव्हेंबर २०२२ रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन

 

                    मुंबईदि. २३:- "आली दिवाळी मंगलदायीआनंद झाला घरोघरी" या कवि - संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या समर्पक शब्दांनी व्यक्त होणाऱ्या दिवाळीला "सणांचा राजा" असंही म्हटलं जातं. याच दिवाळीनिमित्त अनेक मुंबईकर आपापल्या गावी जाऊन दिवाळी साजरी करतात. तर अनेक जण आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात. मात्रमुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व विधानसभामतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचा-यांपैकी अनेक याला अपवाद ठरले आहेत. निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत असणा-यांपैकी अनेक अधिकारी व कर्मचारी हे यंदाच्या दिवाळीतील सर्व दिवशी निवडणूक कर्तव्यार्थ समर्पित भावनेने काम करणार असल्याची माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

 

                    मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्वविधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षणयंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणेमतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारीमतदान केंद्राध्यक्षसहाय्यक मतदान केंद्राध्यक्षमतदान अधिकारीपोलीस कर्मचारीकेंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हरयासह समन्वय अधिकारीविविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे.

 

                    निवडणूक विषयक विविध स्तरीय प्रक्रिया पार पाडण्याकरिता यंदाच्या पोटनिवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकाबेस्टम्हाडामहावितरणकामगार आयुक्तालयमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणराज्य शासनाचे विविध विभाग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक विविध बाबी व प्रक्रिया करण्यासाठी असलेला कालावधी पुरेसा आहे. मात्रअसे असले तरी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व अधिक चांगल्या प्रकारे व्हावीयासाठी यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचारी हे धनत्रयोदशीनरक चतुर्दशीलक्ष्मीपूजनदिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी देखील कार्यरत राहून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देत यंदाची दिवाळी एका वेगळ्या अर्थाने अधिकाधिक प्रकाशमय करणार आहेत.

 

                    दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी 'अंधेरी पूर्वमतदारसंघात सुटी घोषित करण्यात आली आहेमात्र ती सुट्टी हे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहेहे लक्षात घेऊन सर्व संबंधित मतदारांनी अधिकाधिक संख्येने आवर्जून मतदान करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

000

                                                                                                                                                     





 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi