Friday, 21 October 2022

महाराष्ट्र शासनाच्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के

 महाराष्ट्र शासनाच्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के दराने21 नोव्हेंबर रोजी परतफेड

 

             मुंबईदि. 21 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची 8.90 टक्के दराने दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी परतफेड करण्यात येणार आहेअसे वित्त विभागाने कळविले आहे.

             महाराष्ट्र शासनच्या वित्त विभागाच्या अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.16 नोव्हेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 20 नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. 21 नोव्हेंबर2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील तारखेस सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 21 नोव्हेंबर2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम2007 च्या उप - विनियम 24(2) व 24(3) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप -कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2022 च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरित्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित  बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करीलअसे वित्तीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव शैला ए यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

आली दिवाळी

 आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास *आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

        

          *🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*२१ऑक्टोबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!

*२१ ऑक्टोबर २०२२- वसुबारस !*

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास

लाभो !

*२२ ऑक्टोबर २०२२- धनत्रयोदशी !*

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

*२३ ऑक्टोबर २०२२- नरकचतुर्दशी !*

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

*२४ ऑक्टोबर २०२२- लक्ष्मीपूजन !*

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त

होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य

आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

*२५ ऑक्टोबर २०२२- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

*२६ ऑक्टोबर २०२२- भाऊबीज !*

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट

राहू दे !

*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*

*आंनदाची आणि भरभराटिची जावो*

💐👏🍅🍎🍏🍊🍋🥭🍲🍛🍥

देशातील पहिल्या ‘महाराष्ट्र स्थलांतर निरीक्षण प्रणाली’चे

 देशातील पहिल्या महाराष्ट्र स्थलांतर निरीक्षण प्रणालीचे

महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबईदि. 21 : स्थलांतरित गर्भवती महिलास्तनदा माता आणि बालकांची अद्यावत माहिती तात्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध करणा-या देशातील पहिली स्थलांतर निरीक्षण प्रणालीचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महिला व बालविकास विभागाने देशातील पहिली महाराष्ट्र विकसित (महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम) केली  आहे.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले कीविभागाने वैयक्तिक विशिष्ट ओळख क्रमांकांद्वारे असुरक्षित हंगामी स्थलांतरित लाभार्थ्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वेबसाइट-आधारित मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम (MTS) तयार केली आहे. या प्रणालीमुळे हंगामी स्थलांतरित महिला व बालकांची माहिती तात्काळ उपलब्ध होईलयामुळे लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देणे सहज होणार आहे.

              मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमात महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदनमहिला व बाल विकास आयुक्त श्रीमती आर. विमलाएकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती रुबल अग्रवालमहीला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशीसहसचिव श्री. अहिरेउपसचिव व्ही.ठाकूरउपायुक्त विजय क्षिरसागरराजमाता जिजाऊ मिशनचे संचालक संजीव जाधवअवर सचिव जहांगीर  खानकार्यक्रम अधिकारी तिक्षा संखेदिग्विजय बेंद्रीकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.          

पथदर्शी प्रकल्प मार्गदर्शक

            प्रधान सचिव श्रीमती आय.ए. कुंदन म्हणाल्या कीगतवर्षी नोव्हेंबरमध्ये  पथदर्शी स्वरुपामध्ये चंद्रपूरअमरावतीजालनापालघरनंदुरबार आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर या प्रणालीच्या मदतीने वेबसाईट आधारित अॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरवात केली होती. महिला व बालकांच्या स्थलांतरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या मदतीने मोबाईल अॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यात आली होती.  स्थलांतरित लाभार्थ्यांना त्या ठिकाणी (डेस्टिनेशन) अंगणवाडीच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रक्रियेतील आलेल्या आव्हानांचा अभ्यास करून  अॅपमध्ये तशा प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. आता राज्यभर स्थलांतरित लाभार्थींची नोंद घेण्याची प्रक्रिया या मोबाईल अॅपमध्ये यानिमित्ताने सुरु होणार आहे.

राजमाता मिशनचे कार्यक्रम अधिकारी यांनी विकसित केली प्रणाली

            राजमाता मिशन चे कार्यक्रम अधिकारी तिक्षा संखेशिवानी प्रसाददिग्विजय बेंद्रीकर शिंदे  यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.https://mahamts.in/login हे संकेतस्थळ असून गुगल प्ले स्टोअरमध्ये MahaMTS हे ॲप उपलब्ध आहे.यामध्ये जिल्हा,आय सीडी एस प्रकल्प निवड बिट निवड अशी माहिती अगदी सहजरित्या विभागातील अधिकारीअंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना भरता येणे शक्य आहे.

विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी होणार उपयोग

             MahaMTS  अॅप आणि  https://mahamts.in/login मध्ये माहिती  आहार वाटपलसीकरणअमृत आहार योजनाआरोग्य तपासणी इ. प्रभावीपणे राबवता येवू शकते. गर्भवती महिलास्तनदा महिला,  शून्य ते तीन वर्षे वयोगटातील मुलेतीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले व 6-18 वर्ष वयोगटातील बालके यांचा मूळ पत्ता हंगामी स्थलांतरित होण्याची कारणे याची संपूर्ण माहिती मिळू शकते.

वसुबारस


 

शौर्य पुरस्कार द्या तिला


 

भटक्या कुत्र्यांनी उच्छाद .

 मुंबई शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी उच्छाद आणला आहे. सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करण्यात अडथळा आणणाऱ्याांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश नुकतेच प्रशासन यंत्रणेला दिले आहेत. या निर्देशाची तत्काळ अंमलबजावणी करून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम तीव्र करावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. तसे पत्र आ. भातखळकर यांनी आयुक्तांना दिले आहे.


याबाबत आ. भातखळकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांना स्वत:च्या घराशिवाय इतरत्र कोठेही खाद्य पुरवले जाऊ नये, तसे झाल्यास दंड आकारण्याची मुभा न्यायालयाने प्रशासनाला दिली आहे. कोणत्याही नियमाने किंवा निवाड्याने भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणतेही बंधन नसल्याचे न्यायालयाने खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तेव्हा न्यायालयाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून लहान मुले, महिला, वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण बनले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. आता तर न्यायालयानेच त्यांना या कारवाईबाबत स्पष्ट निर्देश दिले असल्याने कारवाईत अडथळा येण्याचा प्रकार घडणार नाही. त्यामुळे आपण पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे आ. भातखळकर म्हणाले. 

Featured post

Lakshvedhi