Wednesday, 19 October 2022

शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार

 शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार

- अन्ननागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण

 

            मुंबईदि. १८ :- राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. १९ व २० ऑक्टोंबर पर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईलअशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

            चार वस्तूंचा पुरवठा रेशनिंग दुकानांवर योग्यपध्दतीने होण्याच्या दृष्टीने मंत्री श्री. चव्हाण स्वत: लक्ष घालत असून त्यांनी आज राज्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.  दिवाळीपूर्वी चार वस्तूंचा शिधाजिन्नस संच हा पात्र शिधावाटप पत्रिकाधारकांपर्यंत योग्य पद्धतीने लवकरात लवकर कसा वितरीत होईल याचे नियोजन करावेअसे निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी या बैठकीत दिले. या प्रसंगी अन्ननागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारेनियंत्रक शिधावाटप व संचालकनागरी पुरवठा कान्हुराज बगाटे,  उपस्थित होते. तसेचव्हीसीच्या माध्यमातून सर्व उपायुक्त पुरवठा,  सर्व जिल्हा पुरवठा अधिकारीसर्व अन्नधान्य वितरण अधिकारीसर्व उपनियंत्रक शिधावाटप तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले कीराज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लक्षप्राधान्य कुटुंबातील 1.37 कोटी व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्हयांतील एपीएल (केशरी) मधील सुमारे 9 लक्ष शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण १ कोटी ७१ लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना सदर शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. सदर शिधाजिन्नस संच पात्र शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे १०० रु. या दिवाळीसाठीच्या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहेअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            दिवाळी सणानिमित्त 1 किलो रवा1 किलो चणाडाळ1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तू प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन रेशनिंग दुकानांपर्यंत अथवा रेशनिंग गोदामात पोहोचणार आहेत. आणि शिधावाटप धारकांना त्यांचे एकत्रित वितरण केले जाणार आहे.  या योजनेचा लाभ  अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधावाटप पत्रिका धारकांना तसेच पात्र एपीएल (केशरी)शेतकरी शिधावाटप पत्रिका धारकांना दिवाळी निमित्त या योजनेचा लाभ मिळणार आहेअसेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

            राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली. 

ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

 नोव्हेंबर मध्ये दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन

 

          मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी प्राथमिक आढावा बैठक घेतली.

            मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ साठी जिल्हा समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकडशिक्षण उपनिरीक्षक रंजना रावमनपा शिक्षक ग्रंथालयांच्या ग्रंथपाल साधना कुदळेअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळेबृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद खानोलकरप्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे, कार्यवाह सुनिल कुबलकार्यवाह उमा नाबर आदी उपस्थित होते.

             जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयदादर  यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडीचर्चासत्रपरिसंवादव्याख्यान असे दर्जेदारप्रबोधनात्मकमनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य जगतातील लेखकसाहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॅाल उभारले जाणार आहेत. वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध असणार आहेअशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

चौकट :

      आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलामुलींमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेवून लोकसहभाग वाढवावा. ग्रंथोत्सव हा लोकोत्सव’ व्हावाअशा सूचना उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी बैठकीत दिल्या.

०००००

गुलाब चे फुला


 

हसले रे क्षण माझे


 

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरण

 साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे

मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधान मंत्र्यांना विनंती

 

        मुंबई, दि. १८ : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.

            आपल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, २०२१-२२ मध्ये साखर निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारने खुले धोरण स्वीकारल्याने जगात साखर निर्यातीत भारत मोठा निर्यातदार ठरला.  यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि परकीय चलन सुद्धा वाढले.

            यंदापासून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे असे कळते.  मात्र, ही पद्धत आपल्या कारखानदारांना तोट्याचीच आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, मार्चपर्यंत देशातला गळीताचा हंगाम संपतो.  १ एप्रिलपासून ब्राझील मधील हंगाम सुरु होतो आणि स्पर्धा निर्माण होऊन इतर साखर निर्यातदार देशांना त्याचा लाभ होतो.  शासनाला साखर निर्यातीसाठी कोणतेही अर्थसहाय करावे लागत नाही.  कोटा पद्धतीमुळे ज्या कारखान्यांना निर्यातीत रुची नाही ते देखील प्रत्यक्ष निर्यात न करता पैसा कमविण्यासाठी त्यांचा कोटा इतरांना हस्तांतरित करू शकतात.  कोटा पद्धतीमुळे अनावश्यकरित्या प्रशासकीय अडथळे निर्माण होतील तसेच पारदर्शकता राहणार नाही.  तसेच निकोप व्यवसायाची संधी राहणार नाही

परमार्थ सेवा रत्न पुरस्कार

 डॉ. राजेंद्र बडवेडॉ. शैलेश श्रीखंडे परमार्थ सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाश साबळेला

परमार्थ खेल रत्न प्रदान

 

            मुंबई, दि. 18 : टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना त्यांच्या कर्करोग उपचारशल्यक्रिया व संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी 'परमार्थ रत्नपुरस्कार प्रदान करण्यात आला.

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे उभयतांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक विजेत्या अविनाश साबळेला राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ खेल रत्नपुरस्कार देण्यात आला.  परमार्थ सेवा समिती या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 'दिपावली स्नेह संमेलनया कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. 

            पाश्चात्य देशातील कर्करोगाच्या तुलनेत भारतात कर्करोगाचे प्रमाण कमी आहेही समाधानाची बाब असली तरी वाढत्या शहरीकरणासोबत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या ४० टक्के जास्त असल्यामुळे सन २०३५ पर्यंत तंबाखूची शेती पूर्णपणे बंद केल्यास कर्करोगावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी केले.

            लठ्ठपणामुळे १९ प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता राखल्यास तसेच अन्न संरक्षण शास्त्रीय पद्धतीने केल्यास आणखी १५ टक्क्यांनी कर्करोगाचे प्रमाण कमी करता येईल, असे डॉ.बडवे यांनी सांगितले. 

            टाटा रुग्णालय दरवर्षी देशभरातून साडेचार लाख रुग्ण उपचारासाठी येतात असे सांगून वाराणसीगुवाहाटीविशाखापट्टणमपंजाब व खारघर येथे कर्करोग उपचारासाठी इस्पितळे उभारली गेली असली तरी देखील टाटा रुग्णालयात येत्या काही वर्षात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दहा लाख इतके असेलअसे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. कर्करोगाच्या प्रभावी उपचारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्करोग विशेषज्ज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.    

            तंबाखू शिवाय युवकांमध्ये अंमली पदार्थांचे वाढते व्यसन चिंतेची बाब असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.  रुग्णसेवा करणे हा सच्चा परमार्थ असल्याचे सांगून देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी लोकांनी क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांचा पोषण आहार खर्च वहन केल्यासतो देखील परमार्थ ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

            परमार्थ सेवा समिती टाटा रुग्णालय येथे ५० कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र किमोथेरपी केंद्र बांधून देणार असून या केंद्राच्या माध्यमातून दररोज ५०० रुग्णांना मदत होईल असे परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला बिर्ला समूहाच्या संचालक राजश्री बिर्लापरमार्थ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मनमोहन गोयंकामहिला समितीच्या प्रमुख शारदा बुबना व सूत्रसंचालक अनिल त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.

००००


 

Maharashtra Governor presents Parmarth Ratna Awards to Stalwarts in Cancer Care

      Mumbai, 18th Oct : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Parmarth Ratna' Awards for the year 2022 to the Director of Tata Memorial Hospital Dr Rajendra Badwe and Deputy Director Dr Shailesh Shrikhande at Raj Bhavan Mumbai on Mon (17 Oct). The awards were presented to the two stalwarts in recognition of their excellence in cancer surgery, research and management at the 'Diwali Sneh Sammelan' organised by the Parmarth Seva Samiti.

      The Governor also presented the 'Parmarth Khel Ratna Award to Avinash Sable, the Silver medallist in the 3000 metre steeplechase event at the Commonwealth Games 2022. The Committee announced extending financial support to the Tata Memorial Hospital for the construction of a dedicated Chemotherapy Centre at a cost of Rs.50 crore.

         Director of the Birla Group Rajashree Birla, Chairman of the Parmarth Seva Samiti Laxminarayan Biyani, President Manmohan Goenka, Mahila Samiti President Sharda Bubna and Master of Ceremony Anil Trivedi were present.

0000

 

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य

 गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळवलेआता सुराज्याकडे वाटचाल करूया

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

 

            मुंबईदि. १८ : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवलेआता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा यंदा प्रथमच राज्य शासनाने घेतली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यस्तरीय तीन आणि प्रत्येक जिल्ह्यातून एका सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले.

            समाजात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळाचा गौरव करणे हाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ असणे आवश्यक आहेअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीलोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केलीयामागचा उद्देश हा समाजातील एकात्मता टिकून राहावी असाच होता. आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबर समाजाला दिशा आणि विचार देण्याचे काम करीत आहेत. देशभक्तीराष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आणि या स्पर्धेत राज्यातील ३५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहभाग घेतला.

            आज राज्यभरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आज उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या देखाव्यातून समाजातील समस्या मांडण्याबरोबर सामाजिक प्रबोधन करण्याचे काम अविरत करत असतात. यावर्षी सुद्धा नदी संवर्धनशिक्षणपर्यावरण यासारखे विषय मांडून समाजाला दिशा दिली असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

            अकोला जिल्हयातील पातूर येथील श्री. खडकेश्वर म. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथमअहमदनगर जिल्हयातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार यावेळी देण्यात आले.

याशिवाय जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव

अमरावती : एकविरा गणेशोत्सव मंडळ औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ बीड जय किसान गणेश मित्र मंडळ भंडारा आदर्श गणेश मंडळ बुलढाणा सहकार्य गणेश मंडळतालुका चिखली चंद्रपूर न्यु इंडिया युवक गणेश मंडळभानापेठ वार्ड धुळे श्री. संत सावता गणेश मित्र मंडळसोनगीर गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळआरमोरी गोदिया नवयुवक किसान गणेश मंडळदेवरी 10 हिंगोली श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळएनटीसी 11 जळगांव जागृती मित्र मंडळभडगांव 12 जालना संत सावता गणेश मंडळपरतूर 13 कोल्हापूर श्री. गणेश तरुण मंडळढेंगेवाडी 14 लातूर बाप्पा गणेश मंडळ 15 मुंबई शहर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळना.म.जोशी.मार्ग 16 नागपूर विजय बाल गणेशोत्सव मंडळकिराडपुरा 17 नांदेड अपरंपार गणेश मंडळ 18 नंदुरबार क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ 19 नाशिक अमरज्योत मित्र मंडळसातपूर

20 उस्मानाबाद बाल हनुमान गणेश मंडळ 21 पालघर साईनाथ मित्र मंडळनालासोपारा 22 परभणी : स्वराज्य गणेश मंडळदेवनांदरा 23 पुणे : जयजवान मित्र मंडळनानापेठ 24 रायगड : संत रोहीदास तरुण विकास मंडळमहाड 25 रत्नागिरी : पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळमंडणगड 26 सांगली : तिरंगा गणेशोत्सव मंडळविटा 27 सातारा : सार्वजनिक क्रिडा गणेशोत्सव मंडळसावली 28 सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा 29 सोलापूर : श्रीमंत मनाचा कसबा गणपती 30 ठाणे : धामणकर नाका मित्र मंडळभिवंडी 31 वर्धा : बाल गणेश उत्सव मंडळसमुद्रपूर 32 वाशिम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ 33 यवतमाळ नवयुग गणेश मंडळ

            गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

            यावेळीसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विद्या वाघमारेपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडेआदी उपस्थित होते.

००००

Featured post

Lakshvedhi