Wednesday, 19 October 2022

परमार्थ सेवा रत्न पुरस्कार

 डॉ. राजेंद्र बडवेडॉ. शैलेश श्रीखंडे परमार्थ सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रकुल पदक विजेत्या अविनाश साबळेला

परमार्थ खेल रत्न प्रदान

 

            मुंबई, दि. 18 : टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना त्यांच्या कर्करोग उपचारशल्यक्रिया व संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी 'परमार्थ रत्नपुरस्कार प्रदान करण्यात आला.

            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे उभयतांना हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक विजेत्या अविनाश साबळेला राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ खेल रत्नपुरस्कार देण्यात आला.  परमार्थ सेवा समिती या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 'दिपावली स्नेह संमेलनया कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. 

            पाश्चात्य देशातील कर्करोगाच्या तुलनेत भारतात कर्करोगाचे प्रमाण कमी आहेही समाधानाची बाब असली तरी वाढत्या शहरीकरणासोबत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या ४० टक्के जास्त असल्यामुळे सन २०३५ पर्यंत तंबाखूची शेती पूर्णपणे बंद केल्यास कर्करोगावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी केले.

            लठ्ठपणामुळे १९ प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता राखल्यास तसेच अन्न संरक्षण शास्त्रीय पद्धतीने केल्यास आणखी १५ टक्क्यांनी कर्करोगाचे प्रमाण कमी करता येईल, असे डॉ.बडवे यांनी सांगितले. 

            टाटा रुग्णालय दरवर्षी देशभरातून साडेचार लाख रुग्ण उपचारासाठी येतात असे सांगून वाराणसीगुवाहाटीविशाखापट्टणमपंजाब व खारघर येथे कर्करोग उपचारासाठी इस्पितळे उभारली गेली असली तरी देखील टाटा रुग्णालयात येत्या काही वर्षात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दहा लाख इतके असेलअसे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. कर्करोगाच्या प्रभावी उपचारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्करोग विशेषज्ज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.    

            तंबाखू शिवाय युवकांमध्ये अंमली पदार्थांचे वाढते व्यसन चिंतेची बाब असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.  रुग्णसेवा करणे हा सच्चा परमार्थ असल्याचे सांगून देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी लोकांनी क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांचा पोषण आहार खर्च वहन केल्यासतो देखील परमार्थ ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

            परमार्थ सेवा समिती टाटा रुग्णालय येथे ५० कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र किमोथेरपी केंद्र बांधून देणार असून या केंद्राच्या माध्यमातून दररोज ५०० रुग्णांना मदत होईल असे परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी यांनी सांगितले.

            कार्यक्रमाला बिर्ला समूहाच्या संचालक राजश्री बिर्लापरमार्थ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मनमोहन गोयंकामहिला समितीच्या प्रमुख शारदा बुबना व सूत्रसंचालक अनिल त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.

००००


 

Maharashtra Governor presents Parmarth Ratna Awards to Stalwarts in Cancer Care

      Mumbai, 18th Oct : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Parmarth Ratna' Awards for the year 2022 to the Director of Tata Memorial Hospital Dr Rajendra Badwe and Deputy Director Dr Shailesh Shrikhande at Raj Bhavan Mumbai on Mon (17 Oct). The awards were presented to the two stalwarts in recognition of their excellence in cancer surgery, research and management at the 'Diwali Sneh Sammelan' organised by the Parmarth Seva Samiti.

      The Governor also presented the 'Parmarth Khel Ratna Award to Avinash Sable, the Silver medallist in the 3000 metre steeplechase event at the Commonwealth Games 2022. The Committee announced extending financial support to the Tata Memorial Hospital for the construction of a dedicated Chemotherapy Centre at a cost of Rs.50 crore.

         Director of the Birla Group Rajashree Birla, Chairman of the Parmarth Seva Samiti Laxminarayan Biyani, President Manmohan Goenka, Mahila Samiti President Sharda Bubna and Master of Ceremony Anil Trivedi were present.

0000

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi