Saturday, 15 October 2022

गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प

 भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सर्वोत्तम,

 देशातील पथदर्शी असा ठरावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·       प्रकल्पासाठी जलसंपदापर्यटन विभागाचा सहकार्य करार होणार

 

            मुंबईदि. १४ : - भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा, देशातील सर्वोत्तम आणि पथदर्शी असा जलपर्यटन प्रकल्प साकारण्यात यावाअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समिती सभागृहात जलपर्यटन प्रकल्पाबाबत  बैठक आज झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकरजलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूरपर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजयभंडारा जिल्हाधिकारी संदीप कदममहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ-एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांच्यासहविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळलाभ क्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीया जलपर्यटन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या जनतेला मोठी रोजगार संधी उपलब्ध होईल. तसेच परिसरात अनेकविध संधी निर्माण होतील. त्यासाठी या परिसराला जोडूनच अन्य स्थळांशी असे पर्यटन सर्कीट विकसित करता येईल. जलपर्यटन असल्याने कोणत्याही परिस्थितीत कुठलेच प्रदुषण होणार नाहीयाची काळजी घ्या. चांगले आणि दर्जेदार काम करा. याठिकाणी सुविधा निर्मितीसाठी पीपीपी या तत्वावर अंमलबजावणी करा. पर्यटकांना स्वच्छता आणि दर्जेदार सेवा-सुविधा दिल्यास ते अशा पर्यटनस्थळांकडे आकर्षित होतील. रोजगारमहसूल आणि पर्यटकांसाठी आनंद-विरंगुळा यासाठी असे प्रकल्प महत्वाचे ठरतील. त्यादृष्टीने विविध विभागांनी समन्वयाने अंमलबजावणी करावीअसेही त्यांनी सांगितले.

            या प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि पर्यटन विभागाचा परस्पर सहकार्य करार करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

            एमटीडीसीच्या श्रीमती जोशी यांनी या जलपर्यटन प्रकल्पाविषयीचा आराखडा सादरीकरणाद्वारे मांडला. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोसीखुर्द प्रकल्पाचा हा जलाशय विविध पर्यटन संधी आणि त्यातील सुविधांसाठी उत्तम पर्याय आहे. त्याबाबतची प्रकल्प व्यवहार्यता आणि विकास संधी यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. जलाशयातील बेटाचाही पर्यटनासाठी वापर करता येणार आहे. या पर्यटनस्थळाच्या पन्नास ते १०० किलोमीटर्स परिघात ताडोबानागझिराउमरेडकरांढला व्याघ्र प्रकल्पकोका अभयारण्य अशी पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ आहेत. या स्थळांना जोडून घेऊन एक उत्तम टुरिस्ट सर्कीट विकसित करता येणार आहे. नागपूर आणि भंडारा शहरांसह हे स्थळ अन्य ठिकाणांनाही रस्तेमार्गाने जोडलेले आहे. यामुळे लगतच्या राज्यांतूनही पर्यटकांना आकर्षित करता येणार आहे. याठिकाणी जलपर्यटनातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येणार आहेत. रात्रीची जलसफरबोट हाऊसभंडारा ते पवनीमधील पर्यटनस्थळे जोडण्यासाठी जेट्टी व्यवस्थासंगीत कारंजेबोटींगसर्फींग यासाठीच्या सुविधामरिना आणि रॅम्परॉकपूलहो-हो बोटबंम्पर राईडफ्लाईंग फिशजेटाव्हेटरपॅरासेंलींग आदी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधांचा विकास केला जाईल. त्यासाठी सुमारे १०१ कोटी ३३ लाख रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.

            प्रकल्प सुरु झाल्यानंतर २ वर्षात पर्यटकांची संख्या दरवर्षी ७ लाखापर्यंत जाईलअशी अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर हॉटेलउपहारगृह आणि इतर पर्यटन निगडीत उद्योगात गुंतवणूक वाढेल. प्रकल्पामुळे सुरुवीताच्या २ वर्षात १५० स्थानिक युवकांना प्रत्यक्षपणे रोजगार तर पुढे ४ वर्षात पाच हजार रोजगार संधी निर्माण होतील आणि या क्षेत्रातील उलाढाल १०० कोटीवर पोहचेल असा अंदाज आहे.

००००

 


 



समृध्द मराठी भाषेचे महत्व

 समृध्द मराठी भाषेचे  महत्व नव्या पिढीपर्यंत

पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार

- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

            मुंबई दि.१४:  महाराष्ट्राला थोर संतविचारवंतप्रबोधनकारसामाजिक शास्त्रज्ञ  यांची  परंपरा लाभलेली आहे. यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला आहे.'पुस्तकांचे गावया सारखे उत्तम उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. समृध्द मराठी भाषेचे  महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे  मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात  आज 'वाचन प्रेरणा दिनाचेआयोजन करण्यात आले होतेअभिवाचनाच्या कट्ट्याचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाषा संचालक विजया डोनीकरभाषासंवर्धक ग्रंथसखा  श्यामसुंदर जोशी उपस्थित होते.

       मंत्री श्री. केसरकर म्हणालेसाहित्याची आवड ही वाचनातूनच होत असते. त्यामुळे शाळांमध्ये वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.जे लोक वाचन करतात त्यांनाच वाचनाचे महत्व कळत असते त्यामुळे शासनही त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वाचनाची  परंपरा समृद्ध आहे : भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी

            भाषासंवर्धक ग्रंथसखा श्री. श्यामसुंदर जोशी  म्हणालेपुस्तक वाचनातून समाज वाचनस्वभाव वाचनसंस्कृती वाचनलिपी वाचन करायला शिकता आले पाहिजे. वाचन संस्कृतीचा प्रवास भीमबेटकातील चित्रांपासूनशिलालेखांपासून तंजावुर मधील हस्तलिखितदोलामुद्रितांपर्यंत असा आहे. वाचनाची ही परंपरा समृद्ध आहे. आपली वाटचाल पेपरलेस ग्रंथालयांकडे जरी होत असली तरी वाचन संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही.शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. साहित्याची आवड वाचनातूनच निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये प्रयत्न केल जात आहेत असेही ते म्हणाले.

वाचनानेच मी घडले : जिल्हाधिकारी निधी चौधरी

       मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी. निधी चौधरी म्हणाल्यावाचनानेच मी घडले सध्या मी इ-फॉर्म किंवा डिजीटल स्वरूपामध्ये वाचन करते. वर्षभरात ३६५ पुस्तकं वाचायची असा संकल्प करून गेल्या वर्षभरात मी  ४१० पुस्तकं वाचली. सुप्रसिद्ध लेखक एस. एल. भैरप्पा यांचे उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले 'पर्वहे पुस्तक मी ३ ते ४ वेळा वाचले आहे. टॉलस्टॉयभैरप्पा वाचल्यावर दिवसभरात आलेला मानसिक थकवा जातो. आयुष्यात महाभारत मला खूप प्रेरक ठरले,असेही त्या म्हटल्या.

        जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवाचन कट्टयात सहभाग घेतला. एकूण २८ सहभागींना भाषा संचालनालयाकडून प्रमाणपत्र व पुस्तक भेट देण्यात आले भाषा संचालनालयाचे प्रकाशन असलेली भारताचे संविधानाची द्विभाषी प्रत देऊन मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले

००००


वाचनाच्या माध्यमातून माणूस

 वाचनाच्या माध्यमातून माणूस संस्कारक्षम बनविण्याचे काम

- विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

विधानमंडळ सचिवालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

            मुंबईदि. १४:  माणूस घडविण्याचे आणि संस्कारक्षम बनविण्याचे काम वाचनाने होते. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून ही वाचनाची सवय जोपासण्याचे काम होईलअशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.

            भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील मराठी भाषा समिती यांच्या विद्यमाने "वाचन प्रेरणा दिन" या कार्यक्रमाचे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते झाले. विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अनिल महाजनप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजाउपसचिव श्री. आठवले आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले कीमाजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या देशाला विकसित देश बनवण्याचा प्रयत्न केला. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता आहोत. अर्थात आपण शिक्षित झालो नाही तर विकसित देश बनवण्याच स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच वाचनसंस्कृती आणि या दिनाचे महत्व आहे. पूर्वीच्या काळी वाचन अधिक प्रमाणात होते. आता दूरदर्शनइंटरनेट आदी माध्यमामुळे ते कमी झाल्याचे दिसते आहे.  पाहिजे ती माहिती आता सहजगत्या या माध्यमावर उपलब्ध होत असल्यामुळे वाचनाची सवय कमी झाली असली तरी ती सवय जोपासणे आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहेअसे त्यांनी सांगितले.

            यावेळी कवयित्री नीरजा यांनी, 'सांस्कृतिक उभारणी आणि वाचन संस्कृती या विषयावर विचार मांडले. ग्रामीण भागात आजही वाचनाची भूक आहे. तेथील तरुण पिढी वाचनाकडे वळते आहेअसे त्या म्हणाल्या.

            वाचन हे तुम्हाला सुसंस्कृत बनवते. त्यामुळे विविधांगी विषयावर वाचन आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रात संत परंपरापरिवर्तनवादी चळवळपुरोगामी साहित्याने पिढ्या न पिढ्या वाढल्या आहेत. सहिष्णू समाजाची निर्मिती करण्यासाठी वाचन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नव्या पिढीने अधिकाधिक वाचन करणे आणि लिहिते होणे आवश्यक आहे. आपले राज्य हे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे राज्य आहे. त्यामुळेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाचन चळवळीला बळ देण्याचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले.

            यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभ संदेश वाचून दाखविण्यात आले.

            दीप प्रज्वलन आणि ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सहसचिव श्री.महाजन यांनी केले. यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या मराठी भाषा समिती कक्षाची स्थापना आणि त्याद्वारे करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

            वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्त विधिमंडळ सचिवालयातील विविध अधिकारी, कर्मचारी यांनी सादरीकरण केले. यात मीरा सावंतविनय पाटीलसंगीता विधातेअन्नपूर्णा इंगळेअनुजा सावंतरवींद्र ठाकरे,सचिन बोरकर यांनी  त्यांचे वाचनानुभव सादर केले.

            सूत्रसंचलन सचिन बोरकर यांनी केले. आभार विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी मानले.  विधिमंडळ सचिवालयातील विविध अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 


गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांना पुनर्वसना

 गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांना पुनर्वसनाचा दिलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

 

            मुंबईदि. १४ : - भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकरजलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूरमदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ताभंडारा जिल्हाधिकारी संदीप कदमयांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळलाभ क्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गोसीखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्हातील ३४ गावे पुर्णतः व ७० गावे अंशतः गावठाण बाधित होतात. परंतू या व्यतिरिक्त वैनगंगा नदीच्या काठावरील उंचावर वसलेल्या अशा २६ गावठाणातील गावांना गोसीखुर्द जलाशयाच्या वाढणा-या जलपातळीमुळे जोखीम पत्करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा २६ गावांनी सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यावर या बैठकीत चर्चा झाली.

            या गावांच्या पुनवर्सनाबाबत नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नव्या पुनर्वसन धोरणानुसार निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी संबंधित गावातील नागरिकांना विश्वासात घेऊनतसेच त्यांना पुनर्वसनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने या गावांचे ठराव व त्या अनुषंगाने प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास सादर करावेत असे निर्देशही देण्यात आले.


भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे

 भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

       मुंबईदि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

          भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकरमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमहारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

       महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा रोड ते भंडारा शहर यादरम्यान अस्तित्वातील ११ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Feasibility Study Report) सादर केला आहे.

नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्स ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानकूलित बी. जी. (Broad Gauge) मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

       हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने केला आहे.

००००


निळवंडे कालबा

 अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

       मुंबईदि. १४: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

        निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडेमहसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरजलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेअहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन्ही कालव्याचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ८३ गावातील नागरिकांना पाण्याचा लाभ होणार असल्याचे खासदार श्री. लोखंडे यांनी सांगितले.

        अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात पाहणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनी बाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.

००००


चारो तरफ गोपीया


 

Featured post

Lakshvedhi