Thursday, 13 October 2022

सेवेच्या ठायीं तत्पर

 दिवाळीसाठी एसटीच्या 1500 जादा बसेस

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती

 

            मुंबईदि. 13 :  दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल१ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

            दि. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेतअशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत दि.२९ सप्टेंबर२०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावाअसे आवाहनही श्री. चन्ने यांनी केले आहे.

            दरम्यानएसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिकयोजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे.  तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन श्री.  चन्ने यांनी केले आहे.

            दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावीधार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.  सध्या औरंगाबाद विभागातून ३६८मुंबई २२८नागपूर १९५पुणे ३५८नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतीलअसे श्री.  चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावाअसेही श्री. चन्ने यांनी सांगितले.

0000

दिलखुलास

 दिलखुलास’ कार्यक्रमात संजय आवटे यांची उद्या मुलाखत

            मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात लेखक, संपादक संजय आवटे यांची वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर, शनिवार दि. 15 ऑक्टोबर आणि रविवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत लेखक संजय आवटे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात वाचन संस्कृतीबाबत विस्तृत मांडणी केली आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी पोषक वातावरण महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे

जगभ्रमंती मोहिम

 रमिला लटपटे यांच्या जगभ्रमंती मोहिमेला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 13 : - दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. एक मराठमोळी तरूणी जगभ्रमंतीचे साहस करणार आहेतिची ही जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रोत्साहन ठरेलअशा शब्दांत त्यांचे कौतुकही केले.

            वर्षा शासकीय निवासस्थानी श्रीमती रमिला यांनी भेट घेऊनमुख्यमंत्र्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली. श्रीमती लटपटे या चिंचवड (पुणे) येथील आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात. त्यांनी रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार त्या ९ मार्च २०२३ पासून गेट-वे-ऑफ इंडियापासून त्यांच्या भ्रमंतीला प्रारंभ करणार आहेत. सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास त्या मोटरसायकलवरून पारंपरिक वेशभूषेत करणार आहेत. या प्रवासात जगभरातील चाळीस देशांना भेट देतील.

            श्रीमती लटपटे यांच्या या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्यांच्या या मोहिमेसाठी निधी संकलनातही योगदान दिले. यावेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.


https://in.docs.wps.com/l/sIHn5-4qkAfHGn5oG?sa=03&st=0,

गौ उत्पादने





 

Featured post

Lakshvedhi