Thursday, 13 October 2022

जगभ्रमंती मोहिम

 रमिला लटपटे यांच्या जगभ्रमंती मोहिमेला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 13 : - दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. एक मराठमोळी तरूणी जगभ्रमंतीचे साहस करणार आहेतिची ही जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रोत्साहन ठरेलअशा शब्दांत त्यांचे कौतुकही केले.

            वर्षा शासकीय निवासस्थानी श्रीमती रमिला यांनी भेट घेऊनमुख्यमंत्र्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली. श्रीमती लटपटे या चिंचवड (पुणे) येथील आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात. त्यांनी रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार त्या ९ मार्च २०२३ पासून गेट-वे-ऑफ इंडियापासून त्यांच्या भ्रमंतीला प्रारंभ करणार आहेत. सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास त्या मोटरसायकलवरून पारंपरिक वेशभूषेत करणार आहेत. या प्रवासात जगभरातील चाळीस देशांना भेट देतील.

            श्रीमती लटपटे यांच्या या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्यांच्या या मोहिमेसाठी निधी संकलनातही योगदान दिले. यावेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi