Monday, 19 September 2022

भरती माझगाव डॉक

 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती (Mazagon Dock Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे संपूर्ण जाहिरात वाचून जाणून घ्या.

  पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): (नॉन एक्झिक्युटिव्ह)

Skilled-I (ID-V)

1) AC रेफ. मेकॅनिक – 04

2) कॉम्प्रेसर अटेंडंट – 06

3) ब्रास फिनिशर – 20

4) कारपेंटर – 38

5) चिपर ग्राइंडर – 20

6) कम्पोजिट वेल्डर – 05

7) डिझेल क्रेन ऑपरेटर – 03

8) डिझेल कम मोटर मेकॅनिक – 09

9) ड्रायव्हर – 01

10) इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर – 34

11) इलेक्ट्रिशियन – 140

12) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 45

13) फिटर – 217

14) गॅस कटर – 04

15) मशिनिस्ट – 11

16) मिलराइट मेकॅनिक – 14

17) पेंटर – 15

18) पाइप फिटर – 82

19) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – 30

20) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) – 22

21) हिंदी ट्रांसलेटर – 02

22) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) – 10

23) ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) – 03

24) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) – 01

25) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 32

26) पॅरामेडिक्स – 02

27) फार्मासिस्ट – 01

28) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) – 31

29 ) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 07

30 ) रिगर – 75

31) सेफ्टी इन्स्पेक्टर – 03

32) स्टोअर कीपर – 13

Semi-Skilled-I (ID-II)

33) मरीन इन्सुलेटर्स 50

34) सेल मेकर 01

35) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 70

36) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 04

Skilled-II (ID-VI)

38) इंजिन ड्रायव्हर/ 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर 02

Special Grade (ID-VIII)

39) लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 02

Special Grade (ID-IX)

40) लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर – 01

41) मास्टर I क्लास – 02

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): खालील जाहिरात वाचा.

  संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): https://drive.google.com/file/d/1lL1eNqaMy-L_vS9w4M-v6HXXf24-LUEj/view?usp=drivesdk

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://mazagondock.in/Career-Non-Executives.aspx

  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

परीक्षा (Online): 05 नोव्हेंबर 2022 रोजी तारीख जाहीर केली जाईल.

  फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

वयाची अट (Age Limit): 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

बदल समाज चा

 *😊आहे की नाही मजेशीर*🤣🤣

*चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते. आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.*


*🍃चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे, आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात.*


*🍃 चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.*


*🍃 चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे. आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.*


*🍃चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखविण्यासाठी धडपडत असत. आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतात.*


*🍃चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करीत असतात.*


*चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी माणसे नाहीत.*

 

*प्रगती म्हणावी का अधोगती ह्या गोष्टींना..??*

 *बघा कुठे आणि कसे पोहोचलो आपण....?

जीवन ऐसे नाव

 *सुंदर सुविचार* 


*माणूस कितीही आपल्या बुध्दिनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी* 


 *नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्विकारावा लागतो* 


      *😊शुभ सकाळ😊*

सुप्रभात

 *झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही.*

*ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते.*

*तसच* *आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून, नवीन काय मिळवू शकतो, याचा विचार करा...* 

*यातच जीवनाचा अर्थ असतो!*

         ☘️ *शुभ सकाळ* ☘️

सुप्रभात





 

कलाकारांचे प्रश्न

 कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात  मार्ग काढू

            - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
            मुंबईदि. 18 : राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

          सह्याद्री अतिथीगृहात आज ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटेदिग्दर्शक जब्बार पटेल तसेच अभिनेत्री अलका कुबल यांनी  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची

यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत चर्चा झाली. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीने काम करण्यास सांगितले. या सर्व समस्यांचे  लवकर निराकरण करण्यात येईल. राज्य शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

00000

इको पार्क पेण

 जागतिक दर्जाचा इको पार्क उभारण्यासंदर्भात वन मंत्री यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा

निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार

        - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई,  दि.18: पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

            रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वन जमिनीवर इको पार्क तयार करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीनिसर्ग पर्यटन महामंडळाचे व्यवस्थपकिय संचालक विकास गुप्तानिखिल गांधी यांच्यासह उपस्थित होते. 

            श्री. मुनगंटीवार म्हणालेवाढते प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संतुलन ही सामाजिक जबाबदारी आहे असे समजून काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यात विपुल वनसंपदा असून या माध्यमातून काही नविनतम लोकोपयोगी प्रयोग करता येतील का असा सतत विचार मनात येतो त्यातूनच ही इको पार्क ची संकल्पना असून वन कायदा, अधिकार आणि इतर सर्व नियमांची शहनिशा करुनआवश्यक ती पूर्तता करुन जागतिक दर्जाचा इको पार्क महाराष्ट्रात व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रसंगी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानयाविषयातील अनुभवी तज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.

            मुंबई हे जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई आणि परिसरातील विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने काम करण्याची इच्छा श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

0

Featured post

Lakshvedhi