*😊आहे की नाही मजेशीर*🤣🤣
*चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते. आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.*
*🍃चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे, आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात.*
*🍃 चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.*
*🍃 चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे. आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.*
*🍃चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखविण्यासाठी धडपडत असत. आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतात.*
*🍃चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करीत असतात.*
*चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी माणसे नाहीत.*
*प्रगती म्हणावी का अधोगती ह्या गोष्टींना..??*
*बघा कुठे आणि कसे पोहोचलो आपण....?
No comments:
Post a Comment