Monday, 29 August 2022

अभिवादन


 

व्यापार वृध्दी

 भारत-अमेरीका दरम्यान व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण - राजदूत तरणजित सिंह संधु


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे वॉशिंग्टन येथे शुभारंभ

स्वातंत्र्यदिन समारंभात ललित गांधी व शिष्टमंडळाला विशेष सन्मान

मुंबई ः भारत-अमेरीका दरम्यान द्विपक्षीय व्यापार वृध्दिसाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चा ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण भुमिका बजावेल असे प्रतिपादन अमेरीकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधु यांनी केले.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ तर्फे भारत-अमेरीका व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ स्थापन करण्यात आली असुन या फोरम च्या बोधचिन्हाचे वॉशिंग्टन डीसी येथील इंडिया हाऊस येथे अनावरण करून या फोरम चा औपचारीक शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ललित गांधी, उमेश दाशरथी, भाऊसाहेब, कालवाघे, मयंक गुप्ता, नितिन इंगळे उपस्थित होते.
अमेरीकेतील भारतीय दुतावासातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभास ललित गांधी व महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विशेष अतिथि म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
ललित गांधी यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध आहेत त्याचा अमेरीकेतील गुंतवणुकदार व उद्योजकांनी लाभ घ्यावा असे सांगुन अमेरीकेच्या राजधानीत भारतीय दुतावासात संपन्न होत असलेल्या भव्य स्वातंत्र्य दिन समारंभात सहभागाची संधी मिळणे हा विशेष गौरवपुर्ण सन्मान असल्याचे नमुद केले.
भारतीय राजदुत तरणजित सिंह संधु यांनी भारत एक नवसामर्थ्यशाली देश म्हणुन पुढे येत असुन भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था व स्थित प्रशासन यामुळे भारतात उद्योग वाढ वेगाने होत आहे. इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम च्या माध्यमातुन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ च्या प्रयत्नांना भारतीय दुतावास व अमेरीकेतील सर्व कॉन्सुलेट जनरल कार्यालये सक्रीय सहकार्य करतील असे आश्‍वासन दिले.

फोटो कॅप्शन ः महाराष्ट्र चेंबरच्या ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करताना अमेरीकेतील भारतीय राजुदत तरणजित सिंह संधु सोबत ललित गांधी, उमेश दाशरथी, नितिन इंगळे, भाऊसाहेब कालवाघे, मयंक गुप्ता इ. 


पाहुणे येती घरा



 सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

            मुंबई, दि. 29 : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटन मंत्री बेदू सिंग पंथ हे देखील उपस्थित होते. तमांग यांनी राज्यपालांना सिक्कीमच्या प्रसिद्ध थांका चित्रशैलीचे पेंटिंग भेट दिले.

००००

Sikkim Chief Minister meets Maha Governor

            Chief Minister of Sikkim Prem Singh Tamang (Golay) met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Tamang was accompanied by Sikkim's Tourism Minister Bedu Singh Panth. CM Tamang presented to the Governor Sikkim's traditional Thangka painting.

0000


विकास टप्पा

 मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश.

            मुंबई, दि. 29 : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात. विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट ट्रेन) संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय 30 सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील वॉर रूम मधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

            प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो त्याचप्रमाणे लोकांना सुविधा मिळण्यास देखील उशीर होतो. केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.

आजच्या बैठकीत रेल्वे, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडॉर, तुळजापूर, पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. 

बुलेट ट्रेन : भूसंपादन, मोबदला विषयक कामांना गती द्या

            मुंबई ते अहमदाबाद असा 508.17 कि.मी. लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) असून यासाठी एक लाख 8 हजार कोटी खर्च आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण 12 स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील 4 स्थानके आहेत. मुंबईतील 1 स्थानक वगळून उर्वरित तीनही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. यासाठी जपान सरकारने कर्ज दिले असून 50 टक्के खर्चाचा वाटा केंद्र सरकार तर 25 टक्के वाटा महाराष्ट्र आणि 25 टक्के गुजरात सरकार उचलणार आहे. यासाठी एमएमआरडीए मधील 4.8 हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी 30 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतरण या बाबी देखील पालघर तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो मार्गासाठी भूसंपादन वेगाने करा

            आजच्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-3, 4,5,6,9 आणि 11 यांचा त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग 2 ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व), यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-4 तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-5 या मार्गांसाठी भूसंपादन व हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.  

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग

            वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी प्रकल्पाची किंमत 1096 कोटी रुपये इतकी वाढली असून या संदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी आणावा असे आदेश देतानाच त्यांनी वन विभागाशी संबंधित प्रलंबित बाबींही तातडीने निकाली काढण्याच्या सूचना वन विभागास दिल्या. या रेल्वे मार्गासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा वाटा राज्य सरकारने यापूर्वीच दिला आहे. 

            शिवडी-वरळी जोड रस्ता तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याला देखील वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एमटीएचएलचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

जलवाहिन्यांच्या कामाला गती द्यावी.

            सूर्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होत आली असून पुढच्या वर्षीपासून नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होईल. मात्र यासाठी वसई-विरार महानगरपालिका तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेने तातडीने जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा व इतर प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा

            या बैठकीत पंढरपूर, तुळजापूर मंदिरांचा विकास आराखडा दोन महिन्यात सादर करावा, जेणेकरुन या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा देता येणे शक्य होईल. जिल्हाधिकाऱ्यांना पर्यटन विभागाशी समन्वयाने या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

पुणे-नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे

            या मार्गाला निती आयोगाने देखील एप्रिल 2022 मध्ये मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. यासाठी देखील खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय व वन जमिनीचे हस्तांतरण या बाबींना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

या व्यतिरिक्त पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो तसेच विमानतळ या कामांबाबत देखील या वॉर रुम बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले.

            या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नॅशनल हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद तसेच एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

खेळ खेळा

 व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा

- गिरीश महाजन

 

            मुंबईदि. 29 : मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉन बॉस्को विद्यालयात ऑलम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा या दिवशी जन्म झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ क्रीडा दिन साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचे देशातील हॉकी खेळासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला होता आणि हॉकीमध्ये तीन वेळा देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. क्रीडा दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती हे द्रोणाचार्यमेजर ध्यानचंद आणि अर्जुन पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करतात. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तीमत्त्व आहे. सरकारने ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्कार देवून गौरविले आहे.

राष्ट्रकुल आणि खेलो इंडिया स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रक्कमेत मोठी वाढ

            मंत्री श्री. महाजन म्हणालेदेशातील पंजाबहरियाणा या राज्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता देत असलेल्या बक्षिस रक्कमेच्या तुलनेत राज्य देत असलेली रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडुंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडुंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेच्या पदक विजेते आणि सहभागी खेळाडूंना पूर्वीपेक्षा तिप्पट रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. महाजन म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंशी थेट संवाद साधतात. तसेच पदक विजेत्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करतात. ते खेळांकडे गांभिर्याने बघतात.

अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा

            स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळउत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतातशरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो असे त्यांनी सांगितले.

            खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्त्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चर्च गेट येथील हॉकी मैदानात अभिवादन आणि हॉकी सामन्यास सुरूवात

            तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी चर्च गेट येथील हॉकी मैदानात सकाळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हाँकी सामना खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देवून सामना सुरू केला.

            या कार्यक्रमास शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सचिव रणजित सिंह देओल तसेच पुरस्कार प्राप्त खेळाडू एम. एम. सोमय्याकमलेश मेहताप्रदीप गंधेजय कवळी डॉन बास्को शाळेच मुख्याध्यापक फादर क्रीस्पियानो आदींची उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थींनींनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक उपसंचालक स्नेहल साळुंकेसूत्रसंचालन प्रियंका बुवा यांनी तर आभार मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार

            एम. एम. सोमय्या हॉकी ऑलिंपिक सुवर्णपदक प्राप्त खेळाडूकमलेश मेहता टेबल-टेनिस अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रदिप गंध बॅडमिंटन ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू, जय कवळी बाक्सिंग ऑलिंपिक स्पर्धा, हिमाजी परब अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्लखांब, शिवाजी पाटील फुटबॉल शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू, वर्षा उपाध्ये रिदमिक जिमनॅस्टीक्स शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक, प्रशांत मोरे कॅरम जागतिक विजेतेपद प्राप्त खेळाडू, अब्दुल हमिद खान - बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, नताशा जोशी - नेमबाजी डेफ ऑलिंपिक्स सहभाग, रिचा रवी बास्केटबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू, वैभवी इंगळे - तलवारबाजी जागतिक कॅडेट स्पर्धा, सौम्या परुलकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा सानिया कुंभार रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, मिहिका बांदिवडेकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, वैभवी बापट रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, सृष्टी पटेल रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, जान्हवी वर्तक रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, निश्का काळे रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा. या खेळाडूंचा सत्कार यावेळी क्रीडा मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

माखनचोर रखे अपने पास

 


आरोग्यं धन, संपदा

 *बीमार पड़ने के पहले ये काम केवल आयुर्वेद ही कर सकता है*

*1* --केंसर होने का भय लगता हो तो रोज़ाना कढ़ीपत्ते का रस पीते रहें

*2* -- हार्टअटेक का भय लगता हो तो रोज़ना अर्जुनासव या अर्जुनारिष्ट पीते रहिए

*3*--  बवासीर होने की सम्भावना लगती हो तो पथरचटे के हरे पत्ते रोजाना सबेरे चबा कर खाएँ

*4*-- किडनी फेल होने का डर हो तो हरे धनिये का रस प्रात: खाली  पेट पिएँ

*5* -- पित्त की शिकायत का भय हो तो रोज़ाना सुबह शाम आंवले का रस पिएँ

*6* -- सर्दी जुकाम की सम्भावना हो तो नियमित कुछ दिन गुनगुने पानी में थोड़ा सा हल्दी चूर्ण डालकर पिएँ

*7* -- गंजा होने का भय हो तो बड़ की जटाएँ कुचल कर नारियल के तेल में उबाल कर छान कर रोज़ाना स्नान के पहले उस तेल की मालिश करें

*8* - दाँत गिरने से बचाने हों तो फ्रिज और कूलर का पानी पीना बंद कर दें

*9* -- डायबिटीज से बचाव के लिए तनावमुक्त रहें,व्यायाम करें,रात को जल्दी सो जाएँ,चीनी नहीं खाएँ  गुड़ खाएँ

*10*--किसी चिन्ता या डर के कारण नींद नहीं आती हो तो रोज़ाना भोजन के दो घन्टे पूर्व 20 या 25 मि. ली. अश्वगन्धारिष्ट ,200 मि. ली. पानी में मिलाकर पिएँ

           

*किसी बीमारी का भय नहीं हो तो भी 15 मिनिट अनुलोम विलोम  15 मिनिट कपालभाती 12 बार सूर्य नमस्कार करें*

 *स्वयं के स्वास्थ्य के लिए इतना तो करें*

*स्वस्थ रहने के लिए धन नहीं लगता,थोड़ी स्फूर्ति,थोड़ी जागरूकता व थोड़ा परिश्रम लगता है*


🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi