भारत-अमेरीका दरम्यान व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण - राजदूत तरणजित सिंह संधु
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे वॉशिंग्टन येथे शुभारंभ
स्वातंत्र्यदिन समारंभात ललित गांधी व शिष्टमंडळाला विशेष सन्मान
मुंबई ः भारत-अमेरीका दरम्यान द्विपक्षीय व्यापार वृध्दिसाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चा ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ महत्वपूर्ण भुमिका बजावेल असे प्रतिपादन अमेरीकेतील भारताचे राजदूत तरणजित सिंह संधु यांनी केले.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ तर्फे भारत-अमेरीका व्यापार वृध्दिसाठी ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ स्थापन करण्यात आली असुन या फोरम च्या बोधचिन्हाचे वॉशिंग्टन डीसी येथील इंडिया हाऊस येथे अनावरण करून या फोरम चा औपचारीक शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ललित गांधी, उमेश दाशरथी, भाऊसाहेब, कालवाघे, मयंक गुप्ता, नितिन इंगळे उपस्थित होते.
अमेरीकेतील भारतीय दुतावासातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभास ललित गांधी व महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात विशेष अतिथि म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
ललित गांधी यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध आहेत त्याचा अमेरीकेतील गुंतवणुकदार व उद्योजकांनी लाभ घ्यावा असे सांगुन अमेरीकेच्या राजधानीत भारतीय दुतावासात संपन्न होत असलेल्या भव्य स्वातंत्र्य दिन समारंभात सहभागाची संधी मिळणे हा विशेष गौरवपुर्ण सन्मान असल्याचे नमुद केले.
भारतीय राजदुत तरणजित सिंह संधु यांनी भारत एक नवसामर्थ्यशाली देश म्हणुन पुढे येत असुन भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था व स्थित प्रशासन यामुळे भारतात उद्योग वाढ वेगाने होत आहे. इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम च्या माध्यमातुन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’ च्या प्रयत्नांना भारतीय दुतावास व अमेरीकेतील सर्व कॉन्सुलेट जनरल कार्यालये सक्रीय सहकार्य करतील असे आश्वासन दिले.
फोटो कॅप्शन ः महाराष्ट्र चेंबरच्या ‘इंडिया-युएसए डेव्हलपमेंट फोरम’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करताना अमेरीकेतील भारतीय राजुदत तरणजित सिंह संधु सोबत ललित गांधी, उमेश दाशरथी, नितिन इंगळे, भाऊसाहेब कालवाघे, मयंक गुप्ता इ.
No comments:
Post a Comment