Tuesday, 23 August 2022

क्रीडा पदे

 राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे पंधरा दिवसात भरणार.

               - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. 23 : राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे 15 दिवसाच्या आत भरली जातील अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

            राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना क्रीडा मंत्री श्री महाजन बोलत होते.

            क्रीडा मंत्री श्री. महाजन म्हणाले , महाराष्ट्र शासनाने 2003 च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणत्मक निर्णय घेतला असून राज्यात 380 तालुका क्रीडा संकुले मंजूर आहेत. सद्य स्थितीत राज्यात 100 क्रीडा अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून यापैकी फक्त 20 टक्के पदे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात नागरी सेवा मंडळाची तातडीने बैठक घेऊन 44 पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 पदांची मुलाखत प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण होईल. अशी 69 पदे उपलब्ध होणार असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले.

            राज्यातील जुन्या आणि नवीन तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांना देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचेही श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

            राज्यामध्ये क्रीडा धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सी एस आर’ च्या माध्यमातून क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहिर, राम शिंदे, संजय आजगावकर, सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.

000000



 सीएमआयए वतीने एमआयडीसी अधिकार्‍यांसमवेत उद्योग संघटना प्रतिनिधींची बैठक

• औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कटिबद्ध: एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी
• चिकलठाणा वसाहतीसाठी नवीन पाईपलाईनचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करणार: कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी

औरंगाबाद : एमआयडीसी अधिकारी आणि उद्योग/उद्योग संघटना प्रतिनिधींची बैठक सोमवार, दि.२२ ऑगस्ट २०२२ रोजी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) येथे आयोजित करण्यात आली होती. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री राजेंद्र जोशी आणि कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी  स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. वाळूज, रेल्वे स्थानक, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील सीएमआयए सदस्यांनी उद्योगविषयक विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, पाणी पुरवठा, ट्रक तर्मिनाल्ची गरज, मोठ्या वाहनांची पार्किंग आणि त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक समस्या, उद्योग वसाहतीमधील मुरूम चोरी आणि इतर गुन्हे आदी विषयाचा समावेश होता.   यावेळेस बोलतांना एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, कार्यकारी अभियंता गिरी यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देतांना एमआयडीसी कार्यायाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना या बाबत सविस्तर मांडणी केली. याप्रसंगी बोलतांना सीएमआयएचे माजी अध्यक्ष कमलेश धूत यांनी या बैठकी मागची संस्थेची भूमिका मांडली तसेच आगामी काळात अधिकारी आणि उद्योजक यांच्यामध्ये दुवा बनण्याचे काम संस्था करेल अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमात बोलतांना प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी म्हणाले एमआयडीसी कार्यायाकडून कोरोन नंतरच्या काळात औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, स्टोर्म वॉटर डक्ट, ड्रेनेज आणि इतर  पायाभूत सुविधाच्या विकासाकरिता सुमारे ३२ कोटी खर्च करण्यात आले, आगामी काळात ४२ कोटीचे काम हाती घेण्यात आले असून यामध्ये प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, लिंक रोड विस्तारीकरण, आणि पावसाचे पाणी साचू नये याकरिता व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. वाळूज येथे कार्बन तंत्रज्ञानावर आधारित त्रिटमेंट प्लांट विकसित करून त्यामधून 5 MLD पाण्याचा पुनर्वापर करण्याकरिता शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिकलठाणा वसाहतीसाठी नवीन पाईपलाईन
 चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जल वाहुनीला ३0-३५ वर्षे झाली असून अनेक ठिकाणी ती जीर्ण झाली आहे. यामुळे उपसा क्षमता ५०% पर्यंत कमी झाली. मागील काळात एकीकडे उद्योगाला कमी पाणी उपलब्ध असतांना मानवतेच्या दृष्टिकोनामधून मान्पाकरिता २-३ एमएलडी पाणी देण्यात आले. यावरउपाय म्हणून वाहन क्षमता कमी झालेली जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती एमआयडीसी कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी  यांनी दिली. एकूण 22 किमी लांबीची नवीन पाईपलाईनटाकण्यात येईलयापैकी १५किमी लाम्बिंचे पाईपउपलब्ध झाले असून, ६ किमी लांबीचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

जळगाव एमआयडीसी धर्तीवर सेवा

याप्रसंगी प्रश्न मांडतांना चिकलठाणा वसाहती मधील उद्योजकांनी एमआयडीसी आणि मनपा यांच्याकडे सेवा विखुरल्या गेल्या असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यक्त केले. यावर बोलतांना एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ही वषात मनपाकडे हस्तांतरित केली असल्यामुळे पाण्याव्यतिरिक्त इतर सेवा मनपाच्या वतीने पुरवण्यात येत असल्याचे सांगितले. जर उद्योजकांची तयारी असेल तर सेवा हस्तांतरित करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र द्यावे, जळगाव एमआयडीसीच्या धर्तीवर सेवा देता येऊ शकतील असे मत व्यक्त केले.

सीएमआयएच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या समन्वयक बैठीकीबद्दल एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संस्थेचे आभार मांडले. या वेळेस सीएमआयएतर्फे एमआयडीसी संस्थेने ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अधिकार्यांचा विशेस सत्कार केला. याप्रसंगी माजी अध्यक्ष कमलेश धूत, दीपक तोष्णीवाल आणि इतर सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती

Photo 1 : डावीकडून एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेद्र जोशी, कार्यकारी अभियंत आर. डी. गिरी, उद्योजक कमलेश धूत
Photo 2: उपस्थित उद्योजक सदस्य



जिंदगी


 

आरोग्य गायींचे


 

कोनी गणेश घ्या कोणी गजानन


 मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

            नवी दिल्ली, 22 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे.

            महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मूर्तींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात 3० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो.

            महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पुजेचे साहित्य खरेदीसाठी पहिल्याच दिवशी लोकांची वर्दळ सुरु झाली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कोविड-१९ महामारीच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या गणेशमुर्तींची कमाल उंची ३ फूट आहे. येथील नंदा एस्कोर्टस, त्रिभोवनदास झवेरी, उद्योजक, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह गणेश मंडळांनी गणरायाच्या मोठ्या मूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत.

            ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २४ वर्षांपासून ‘मऱ्‍हाटी’ एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण 1000 गणेशमूर्ती आहेत. या सर्वच मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या अर्थात पर्यावरणपूरक आहेत.6 इंच ते 3 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून 500 रूपयांपासून ते 30 हजार रूपयांपर्यंत या मूर्तींची किंमत आहे.

           महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहितीकरिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

००



विदर्भ विकास

 विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध

- उद्योग मंत्री उदय सामंत.

            मुंबई, दि. 22 :- विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासनाकडून प्रोत्साहन व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

             सदस्य अभिजित वंजारी यांनी विदर्भातील औद्योगिक विकासाविषयीची लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. विदर्भातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागपूर व अमरावती अशा दोन महसूली विभागाअंतर्गत एकूण ११ जिल्ह्यांमध्ये सुमारे १६६३२.४२ हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे. त्यामध्ये प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे ५२ औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आले आहेत. अमरावती येथे ४४ औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. ही दोन्ही प्रादेशिक कार्यालय मिळून आजपर्यंत विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये भुखंडाचे वाटप करण्यात आले आहे.

            विदर्भातील विकसित करण्यात आलेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या असून त्यावर सुमारे १३३६ कोटी रु. खर्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्राकरीता विदर्भात औद्योगिकरणास उत्तेजन देण्याच्या दृष्टीने उद्योगाकरिता पाणीपुरवठा दर अत्यल्प ठेवण्यात आले आहे. मागील ९ वर्षापासून पाणीपुरवठ्याच्या दरामध्ये दरवाढ करण्यात आलेली नाही. विदर्भ क्षेत्रात सेवाशुल्कामध्ये सुध्दा २००८ पासून कुठलीही दरवाढ लागू करण्यात आलेली नाही. लघु औद्योगिक क्षेत्राकरीता हा दर आणखी सवलतीच्या दरात म्हणजे १.५० प्रती चौ.मी. प्रती वर्ष आकारण्यात येत आहे. लवकरच या भागाचा दौरा करून आढावा घेणार असल्याचेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य डॉ.परिणय फुके, प्रवीण दटके, एकनाथ खडसे, डॉ.रणजित पाटील यांनी भाग घेतला.


००००



HIV बाधित मुले

 एचआयव्ही’ बाधित मुलांच्या सादरीकरणाने राज्यपाल भारावले.

· अनुराधा पौडवाल यांच्या सामाजिक कार्याचे राज्यपालांकडून कौतुक

· सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी.

            मुंबई, दि. 22 : ईश्वराने दीन - दु:खी व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे. निराश्रित व्यक्तीची सेवा करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत करण्याचा गुण मनुष्याला मिळाला आहे. त्याचा वापर करून प्रत्येकाने किमान एका गरजु व्यक्तीला तरी जीवनात मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. या दृष्टीने ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपालांनी काढले.    

            औसा, लातूर येथील 'सेवालय बालगृह' या संस्थेने ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीच्या कोनशिलेचे प्रातिनिधिक अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  

            कार्यक्रमाला पार्श्वगायिका तसेच सुर्योदय फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा पौडवाल, एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी व प्रवीण छेडा, 'सेवालय'चे संस्थापक रवी बापटले यांसह सेवालय संस्थेतील निवासी एचआयव्ही बाधित मुले उपस्थित होते.

            सेवालय संस्थेच्या 'हॅपी इंडियन व्हिलेज' (एचआयव्ही) या उपक्रमाचे कौतुक करून राज्यपालांनी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

            यावेळी एचआयव्ही बाधित मुलांनी सादर केलेले सीमेवरील जवानांचा जीवनपट दाखविणारे लघुनाट्य पाहून राज्यपालांसह सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. 

            सूर्योदय फाउंडेशन तसेच एम्पथी फाउंडेशन या संस्थांच्या आर्थिक सहकार्याने सेवालय बालगृहाच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

            यावेळी कविता पौडवाल यांनी सूर्योदय फाउंडेशन तसेच सुगल व दमाणी उद्योग समूहाच्या एम्पथी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.

००००

Governor Koshyari unveils foundation stone of Hostel building for HIV positive children

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari unveiled the foundation stone of the first floor of a Hostel building for HIV positive children of an organisation 'Sevalaya' at a function held at Raj Bhavan Mumbai. The Hostel building is part of the project Happy



Featured post

Lakshvedhi