Saturday, 20 August 2022

 महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2022 ची 8.90 टक्के दराने परतफेड

             मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.90 टक्के कर्जरोखे 2022 ची अदत्त शिल्लक रकमेचे परतफेड दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

             महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि. 14 सप्टेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 19 सप्टेंबर 2022 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 20 सप्टेंबर, 2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 20 सप्टेंबर 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.


            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


            तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.


            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.


            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, अशी माहिती वित्तीय सुधारणा विभागाच्या सचिव शैला ए. यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.


*****




राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या 17 पथके तैनात

            मुंबई, दि. 20 : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत.


                मुंबई (कांजूरमार्ग - 1, घाटकोपर - 1) - 2, पालघर - 1, रायगड - महाड - 2, ठाणे - 2, रत्नागिरी -चिपळूण - 1, कोल्हापूर - 2, सातारा - 1, सांगली - 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण 13 पथके तैनात आहेत.

           नांदेड - 1, गडचिरोली - 2, भंडारा - 1, अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील नुकसानीबाबतची सद्यस्थिती.

            राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे व 351 गावे प्रभावित झाली असून 117 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून 20 हजार 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 124 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 243 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 3 हजार 534 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

             मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.

0000



अशी ही रांगोळी स्पर्धा

 *गणपती उत्सव* निमीत्त आयोजित *राज्यस्तरीय रांगोळी स्पेधेत मुंबई गोवा हायवे रांगोळी प्रथम क्रमांक* 👍👌😛


कृष्णा विचार

 👏 *श्रीकृष्ण.... !* 🍁

कोण आहे *श्रीकृष्ण ?* 

पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे! शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे! *तो श्रीकृष्ण आहे.* 

*श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे.* 


जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावं लागलं! पालनकर्त्यांनाही  सोडावं लागलं! मित्रमंडळींना सोडावं लागलं! जिच्यावर प्रचंड प्रेम केलं तिलाही सोडावं लागलं! गोकुळ सोडलं! शेवटी मथुरा ही सोडली! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच अशी निर्माण झाली की काही ना काही सोडावं लागलं! पण काही सोडावं लागलं नसेल, तर ते आहे... *देवत्व! निर्मळ हास्य! प्रचंड मोठी सकारात्मकता!* श्रीकृष्ण जाणून घेणे म्हणजे जीवनाचा सार जाणून घेणे! *कृष्णनीती* म्हणजे यशस्वी- समाधानी जीवनाचा मार्ग! ज्याला कृष्ण समजला तो आयुष्यात कधीही पराभूत होऊ शकत नाही!

*श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खुप शुभेच्छा !* 

     💫✨🍁🌼🍁🚩

┈┉┅━━❀ω❍ω❀━━┉┅┈

T माहात्म्य

: ह्यासाठी सकाळी T घ्यायचा असतो time वर 


r

सुप्रभात

 






कृष्णा चा मारुती बघा

 


Featured post

Lakshvedhi