👏 *श्रीकृष्ण.... !* 🍁
कोण आहे *श्रीकृष्ण ?*
पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे! शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे! *तो श्रीकृष्ण आहे.*
*श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे.*
जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावं लागलं! पालनकर्त्यांनाही सोडावं लागलं! मित्रमंडळींना सोडावं लागलं! जिच्यावर प्रचंड प्रेम केलं तिलाही सोडावं लागलं! गोकुळ सोडलं! शेवटी मथुरा ही सोडली! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच अशी निर्माण झाली की काही ना काही सोडावं लागलं! पण काही सोडावं लागलं नसेल, तर ते आहे... *देवत्व! निर्मळ हास्य! प्रचंड मोठी सकारात्मकता!* श्रीकृष्ण जाणून घेणे म्हणजे जीवनाचा सार जाणून घेणे! *कृष्णनीती* म्हणजे यशस्वी- समाधानी जीवनाचा मार्ग! ज्याला कृष्ण समजला तो आयुष्यात कधीही पराभूत होऊ शकत नाही!
*श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खुप शुभेच्छा !*
💫✨🍁🌼🍁🚩
┈┉┅━━❀ω❍ω❀━━┉┅┈
No comments:
Post a Comment