Sunday, 14 August 2022

Maa तुझे सलाम




 

मा तुझे सलाम


 मा. आमदार महेंद्र दळवी

World field तिरंदाजी

 एस्टोनिया (युरोप) येथे 5 ते 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत जागतिक फील्ड तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा पार पडली, या स्पर्धेत भारतासह 47 देशांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत कुर्डुस(अलिबाग) येथील आर्चरी खेळाडू सर्वेश थळे (रौप्य पदक) तर बाळू ढेबे शिरवली (माणगाव) यांचा वरिष्ठांमध्ये सहभाग. या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


International आर्चरी

 



Saturday, 13 August 2022

देशभक्ती गायन

 🕉️ ऍक्टिव्हिटी 09🕉️

🚩सेलिब्रेशन ऑफ फेस्टिव्हल्स 🚩

दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी

मुरुड पोलीस ठाणे यांच्या साठी

माळी समाज हॉल मुरुड येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करून सर्व पोलिस बांधव व नागरिकां सोबत स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

श्रीबाग लायन्स क्लब प्रेसिडेंट लायन ऍड कला पाटील ,तसेच व्हाईस प्रेसिडेंट लायन संजय रावळे यांनी गीते सादर केली.

 धन्यवाद : पोलीस ठाणे मुरुड व ज्येष्ठ समाजसेविका सौ वासंती उमरो



ठकर

हसू किती हसू किती

 विरंगुळा.....


🥱🤔-------


गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो कशाला लावतात ?

गणेश - खिळ्याला 😀

गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले.

😂😂😂😂😂😂

😱👌मास्तर :- अशी कोणती बाई आहे, तीला १००% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??ू

गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!!

😁😂😬😠


 शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝

"सापाच्या शेपटीवर पाय देणे "

गण्या 🙋🏻‍♂: बायकोला माहेरी जाण्यापासून 

रोखणे 🤗

शिक्षकांनी गण्याला मिठी मारली 

😂😂😂😂😂😂😂

गुरुजी : "मी उपाशी आहे"

या वाक्यात कोणता काळ आहे?.

बंड्या : दुष्काळ

कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला..

😝😝😝😂😂😂

ekdam new....

गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?

विद्यार्थी - नाही गुरुजी 

गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!!!!!

--- गुरुजी अजून वर्गात आले नाहीत.

😜🌝😆

🔘 पुणेरी विनोद 🔘

😂🤣एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.

तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?

नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...

मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!!

🔷🔷🔷🔷🔷🔷


😂🤣एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."

१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

😂🤣स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


😂🤣स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)

पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर:- ३ लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


स्थळ : पुणे 

एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!! 

मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...? 

मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.

पुणेरी एकदम तिखट....

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


😂🤣पाहुणा : अहो camp ला जायला कुठली बस पकडू ?

पुणेरी : २० number ची पकडा.

पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?

पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


😂🤣पुण्याला डेक्कनच्या चौकात cctv कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:

"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


पुणेरी स्पेशल 

चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे. 

बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी... 

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


😂🤣**पुणेरी स्पेशल 

बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?

नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


��** भन्नाट पुणेरी 

बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?

जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?

बाळूः हो 

जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..

नवरा: प्यायला पाणी आण ग?

बायको: तहान लागली आहे का ?

नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


🤣😂पुणेरी राँग नंबर 

अः देशपांडे आहेत का? 

बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप ? 


अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. मेलात तरी चालेल!!!!? 


😆😆😜


🤣😂😜😝😅😅


खळखळुन हसा निरोगी रहा,

मित्रांनो आपणही हसा, आणि दुसऱ्यांनाही हसवा😃हे फक्त पुण्यातच पिकत व सगळीकडे प्रसारीत केल जात म्हणून म्हणतात पुण ते पुणं, आलं का लक्षात!!!

            

😀😄😄😄😄😄

स्वराज स्वातंत्र्य लढा

 स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा'‘दूरचित्रवाणी’ वर रविवारपासून प्रसारीत

        नवी दिल्ली, दि. 13 : ‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ ही मालिका दूरचित्रवाणीवर दर रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित होणार आहे. या मालिकेचा पहिला भाग उद्या 14 ऑगस्ट 2022 प्रसारित होणार आहे.

            'स्वराज - द होल स्टोरी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल' ही एक मेगा ऐतिहासिक लघुपट मालिका आहे. 15 व्या शतकापासून ते 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्भीड, गौरवशाली इतिहास दूरदर्शनच्या माध्यमातून दाखविला जाईल.

            ही मालिका केवळ इंग्रजांनी केलेल्या अन्यायावर नसून तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज वसाहतवाद्यांच्या विरोधात आवाज उठविलेल्या 75 ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, मॅडम भिकाजी कामा, गणेश सावरकर, विनायक दामोदर सावरकर, नाना साहेब, बाजीराव पेशवे, तसेच राणी आबक्का, बक्षी जगबंधू, तिरोत सिंग, सिद्धो कांथो मुर्मू तसेच शिवाप्पा नायक, कान्होजी आंग्रे, राणी गैदिनलिऊ, तिलका मांझी यांसारख्या स्वातंत्र्यावीरांच्या गाथांचा समावेश असणार आहे.

            चित्रपट अभिनेता मनोज जोशी यांनी या मालिकेत सूत्रधाराची भूमिका बजावली आहे.

‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा’ 20 ऑगस्टपासून मराठीत प्रसारित

            20 ऑगस्टपासून सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरुन ‘स्वराज - भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वसमावेशक कथा ’ही मालिका मराठीत प्रसारित होणार आहे. मराठीसह इंग्रजी , तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, बंगाली, उडिया आणि आसामी अशा 8 प्रादेशिक भाषांमध्येही 20 ऑगस्टपासून रात्री 8 ते 9 वा. यावेळेत प्रसारित केली जाईल.

000


 


  

Featured post

Lakshvedhi