सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 25 July 2022
Sunday, 24 July 2022
कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विशेष कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण.
मुंबई, दि. २४: मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक साहित्य प्रतिभा लाभलेल्या कवियित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने "हे शब्द रेशमाचे" या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २३ जुलै, २०२२ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विलेपार्ले मतदार संघाचे आमदार श्री पराग अळवणी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीधर फडके, पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव, विद्या वाघमारे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक श्री. पांडे श्रीराम यांची उपस्थिती होती.
मराठी साहित्य विश्वात शांता शेळके यांनी लेखिका, कवयित्री, अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका इत्यादी माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके यांच्या विपुल व बहुआयामी साहित्यनिर्मितीचा मागोवा घेत त्यांच्या अलौकिक कार्याच्या स्मरणार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सादर करण्यात आला . शांता शेळके यांच्या काही कविता व उतारा अभिवाचन अभिनेते पुष्कर श्रोत्री व अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले. शांताबाईंनी लिहलेल्या गीतांची सुरेल प्रस्तृती या स्वरसोहळयातून, श्रीधर फडके, प्राजक्ता रानडे, जय आजगांवकर, अर्चना गोरे, नचिकेत देसाई, सावनी रवींद्र, बालकलाकार काव्या खेडेकर व शराण्या साखरदांडे यांनी केली. प्रशांत लळीत यांचे संगीत संयोजन तसेच वैशाली पोतदार यांच्या कथक नृत्याने प्रत्येकांची मने जिंकली. विनीत गोरे यांनी या कार्यक्रमासाठी संयोजन केले. या कार्यक्रमास भरभरून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.
0000
द्रौपदी
पूर्वी एक द्रौपदी अपमानित होती
आज एक द्रौपदी सन्मानित आहे
पूर्वी एक द्रौपदी अगतिक होती
आज एक द्रौपदी जागतिक आहे
पूर्वी एक द्रौपदी अबला होती
आज एक द्रौपदी सबला आहे
पूर्वी एक द्रौपदी द्युतात हरली
आज एक द्रौपदी मानाने जिंकली
रवींद्र कानिटकर, सांगली २२/७/२०२२
माहेरची साडी
🙏🙏 *जिवंतपणी तिला मिळावी माहेरच्या साडीची ऊब*🥰🥰
ऑफिसमध्ये असताना मला आईचा अचानक फोन आला. "पटकन घरी ये आत्या गेली,आपल्याला चिपळूणला जायचे आहे" माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. डोळ्यातील पाणी पुसत मी कशीबशी घरी पोहचले. गाडी दारात उभी होती. घरात न जाता थेट गाडीत बसले आणि आम्ही निघालो. पुढच्या चौकात गेल्यावर आईने एका साड्यांच्या दुकानापाशी गाडी थांबवली. तेव्हा मला काही कळेना. प्रसंग काय आणि ही करतेय काय हा विचार मनात असतानाच तिने एक साडी पिशवीत घालून आणली. पाच मिनिटात खरेदी केलेली ही पहिली साडी असेल पण ती अशावेळी आईने का घेतली हे विचारल्यावर तिने सांगितले, "लेक गेल्यावर तिला माहेरची साडी नेसवली जाते." ती गेल्यावर तिच्या अंगावर घातलेल्या साडीचं सुख तिला मिळणार आहे का ? हा प्रश्न घेऊन आत्याच्या चितेवर शेवटची "माहेरची साडी" चढवली.
या गोष्टीला आज पंधरा दिवस झाले मात्र अजूनही माझ्या डोक्यातून ही माहेरची साडी गेली नव्हती. आपल्या रीती आणि परंपरा सुद्धा कशा आहेत ना. माणूस जिवंत असताना आपण त्याची ख्यालीखुशाली विचारत नाही. पण तो गेल्यावर त्याच्या आवडीचा नैवेद्य तयार करतो. का तर कावळा शिवावा म्हणून . ही प्रथा तर मला माहित होती. मात्र माहेरची साडी आपण आत्याला ती मेल्यावर देण्यापेक्षा ती जिवंत असताना प्रत्येक सणावाराला दिली तर काय हरकत आहे. माहेरपणाला येणाऱ्या लेकीची तुमच्याकडून काय अपेक्षा असते हो, त्यांना तुम्ही दोन शब्द गोड बोलावे, बास झालं. त्यातच एखादी साडी मिळाली की माझ्या भावाने घेतली म्हणून गावभर मिरवणाऱ्या या मुली किती आनंदून जातात. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुम्हाला त्या गेल्यावर नेसवलेल्या माहेरच्या साडीत मिळणार आहे का?
लग्नात मुलीला नेसवली जाणारी माहेरची साडी तिच्या कपाटात आयुष्यभर असते. कारण त्या साडीत तिच्या माहेरपणाची उब असते. कितीतरी आठवणी तिने त्या साडीशी जोडलेल्या असतात. कधी एखादा दुःखाचा प्रसंग आला, सासरी काही बिनसले तर हीच साडी तिला धीर देते.
कित्येक ठिकाणी मुलीला माहेरी गेल्यावर ही हक्काची साडी मिळतच नाही. जोपर्यंत आईवडील असतात तोवर त्यांना या साडीच सुख लाभतं. भावांच्या राज्यात मात्र चार दिवस पाहुण्यांसारखं येऊन जावं लागतं. त्यामुळे आजकाल त्या माहेरच्या साडीचं विशेष राहिलेलेच नाही. ज्या नणंदेला कधी वारभर कापड भावजयीने घेतलेलं नसतं. ती सुद्धा नणंदेच्या मयतीला जाताना न विसरता माहेरची साडी घेऊन जाते. का तर लोकांनी नावं ठेवायला नको म्हणून. म्हणजे इथे सुद्धा काही लोकांचा कसा स्वार्थ आहे बघा.
माहेरी गेल्यावर माहेरची साडी मिळणार म्हंटल्यावर त्या मुलीच्या मनात वेगळाच आनंद निर्माण होतो. कारण त्यांच्यासाठी ती फक्त साडी नसते तर एक भावना असते. माहेरच्या माणसांशी जोडली जाणारी सुंदर नाळ असते. कधी आपल्या भावाच्या आठवणीत ती साडी मुलगी नेसते. तर कधी आईने प्रेमाने घेतली म्हणून सगळ्यांना हौशीने दाखवते. तुमच्या एका साडीवाचून तिचं काहीच अडत नाही हो. पण एक भाबडी आशा तिच्या मनाला असते की आपल्या माहेरहून आपल्याला कोणी साडी द्यावी आणि ती नेसून आपण मिरवावे. श्रीमंत घरातल्या मुलींना देखील त्या माहेरच्या साडीची आस असते. मग ती किती भारी आहे की हलकी हे त्या पाहत नसतात. त्यातील प्रेम त्या माहेरवाशिणींपर्यंत आपोआप जाते.
मुलगी गेल्यानंतर तिच्या चितेवर माहेरची साडी तुम्ही ठेवता. पण तिच्या अग्नीत ती साडी देखील राख होऊन जाते मग त्याचा उपयोग काय. माहेर सोडताना आनंदाने नेसवलेली माहेरची साडी ते जग सोडून जाताना साश्रू नयनांनी तिच्यावर चढवलेली माहेरची साडी यात किती फरक आहे. जड अंतःकरणाने आणि थरथरत्या हाताने तिच्या देहावर शेवटची साडी ठेवताना काहीजणांना आपण बहिणीसाठी उभ्या आयुष्यात साडी घेऊ शकलो नाही याची खंत असते. मग तिची माफी मागत आपले कर्तव्य पूर्ण करणारे भाऊ ही सल मनात घेऊन जगतात. अशी वेळ आपल्यावर येऊ नये वाटत असेल तर आपल्या घरच्या माहेरवाशिणींना "माहेरची साडी" देण्यासाठी त्यांच्या मरणाची वाट बघू नका. तर त्या जिवंत असतानाच त्यांच्या अंगावर ही लाखमोलाची साडी नेसवण्याचे भाग्य नक्कीच मिळवा.🙏🙏🙏😊
राज्यात पूरपरिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडी एसडीआरएफच्या 14 टीम तैनात.
मुंबई,दि.24 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.
मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ टीम तैनात आहेत.
नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती.
राज्यात एक जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत.४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे
राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...







