Monday, 18 July 2022

दुर्घटना

 मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना

मृत्युमुखी प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाचे आर्थिक सहाय्य.

            मुंबई दि 18 : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

            आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिकरी यामधील नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळली.

            बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी संवाद साधून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटने संदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

            जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७-२२२३१८० आणि ०२५७-२२१७१९३ असा आहे.

००००



हर घर तिरंगा

 मागील पानावरून....अभियानाची पूर्तता होणार आहे.  अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी. 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. गावांमध्येतालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात यावी. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळ्या माध्यमातून राज्यांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुध्दा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीलातरुण वर्गाला समजावेमाहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हा उपक्रम देशभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुध्दा प्रयत्न यामध्ये होणार आहे. ‘संकल्प से सिध्दी’ या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहे. कृषीउत्पादनसेवासहकार शिक्षणपायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री श्री. शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

            आजादी का अमृतमहोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्र्य मिळविताना अनेक संकटांचा सामना केला, मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. येत्या 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होणार असून प्रत्येक राज्याने सुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावरफेसबुकट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर याबाबत प्रचार आणि प्रसिध्दी सुरू करावी. ‘हर घर तिरंगा’ याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रेइलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांचासुध्दा यामध्ये वापर करण्यात यावा, असेही श्री. शहा यावेळी म्हणाले.

***


हर घर तिरंगा

 ‘हर घर तिरंगा’ अभियानातूनराष्ट्रीयता, एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार.

                   - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

        मुंबई, दि. 17: केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे राज्यातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यविरांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

            आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओ, आसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

            या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

            ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे. आपल्यामधील राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोबरच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळ्या सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यविराची आठवण आपण ठेवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणारे हे अभियान राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

‘हर घर तिरंगा’ अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

            आज भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील 25 वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

            श्री. शहा म्हणाले की, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हे अभियान केंद्र शासनाचे जरी असले तरी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा आणि लोकसहभागाशिवाय हे अभियान अपूर्ण आहे. हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची

राष्ट्रपती निवडणूक

 राष्ट्रपती निवडणूक २०२२राष्ट्रपती निवडणूक 

निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल यांनी केली

निवडणूक तयारीची पाहणी

विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे दिली भेट

मुंबई, दि. १७ : राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी निवडणूक तयारीची माहिती घेतली.

श्री. अग्रवाल यांनी आज सकाळी ही भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधीमंडळाचे उपसचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, कोव्हीड अधिकारी तथा आयुक्त (आरोग्य सेवा)

डॉ. रामास्वामी एन, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. अग्रवाल यांनी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती घेतली. मतदारांच्या आगमनापासून त्यांची नोंदणी, प्रत्यक्ष मतदान इत्यादी प्रक्रियेसंदर्भात इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर श्री. अग्रवाल यांनी स्ट्राँग रुमला भेट देऊन मतपेटी आणि निवडणूक साहित्याची पाहणी केली.

श्री. अग्रवाल यांनी या पाहणीनंतर विधानभवन येथे बैठकीत संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना संबोधीत केले. राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने संबंधीत विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती जाणून घेतली. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षा, मतपेटीची विमानाद्वारे होणारी वाहतूक अशा विविध अनुषंगाने यावेळी माहिती देण्यात आली.

या बैठकीस श्री. देशपांडे, श्री. भागवत, श्री. कुडतरकर, डॉ. रामास्वामी एन, श्री. पारकर, श्रीमती बोरकर यांच्यासह आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, पोलीस उपायुक्त राजीव जैन, वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी प्रज्ञा रोडगे, विधानभवन सुरक्षाचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, शासकीय मुद्रणालयाचे अधिकारी मनोज वैद्य यांच्यासह अग्निशमन विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आदी संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००



जया अंगी मोठपण

 


निसर्ग राजा, गुपित कललेरे

 सुरवंटातुन फुलपाखरू होण्याचा सुंदर क्षण .


Made इन india

 


Featured post

Lakshvedhi